आदर पूनावालांचं निवेदन: आम्ही भारतीयांची लस निर्यात केली नाही! गैरसमज दूर करा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या कोरोनाच थैमान हळूहळू कमी होताना दिसून येत आहे, मात्र देशभरात सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा गाजत आहे तो म्हणजे, लसीकरण. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे असे दुसऱ्या डोसची वाट बघत आहेत. तर काहीजणांना अजून पहिला डोस देखील मिळाला नाहीये, अनेक ठिकाणं लसींचा साठा नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहेत.
लसीकरणाची देशात सुरवात झाली तेव्हा अल्प प्रतिसाद मिळत होता मात्र लोक इतरांना बघून लस घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट देखील आली. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादले गेलेत.
आपण बघितलं असेल दुसऱ्या लाटेच्या आधी भारताने अनेक देशांना लसी पुरवल्या आहेत. त्यामुळे साहजिकच परराष्ट्रीय संबंध आणखीनच दृढ होणार, मात्र याच लसी परदेशात पाठवल्याने आज आप्तस्वकीयांना लसी मिळत नाहीत, म्हणून देशातील अनेकजण नाराज आहे.
नुकतीच स्पुटनिक ही रशियाची लस सुद्धा आता उपलब्ध होणार आहे त्याची किंमत ९९५ ठेवण्यात आली आहे. बाहेर पाठवलेली लस ही केवळ १५० रुपयात पाठवली यावरून सरकारला आणि पंतप्रधानांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
लसीकरण मिळत नसल्याने अनेकजण आज आपापल्या पद्धतीने निषेध नोंदवत आहे, लसीच्या डोसांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे त्यामुळे साहजिकच लोक संभ्रमात पडत आहे. पण लोकांना आज सोशल मीडियाचा आधार असल्याने त्यावरून ते माहिती घेत आहेत.
सध्या भारतात दोनच कंपन्या लसीच उत्पादन करीत आहेत ते म्हणजे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटयूट, त्यातीलच सिरमच्या मालकांनी काही दिवसापूर्वी विनंती केली होती की कृपया आम्हाला परकीय समजू नका सर्वात आधी आम्ही देशाचाच विचार करू.
सिरमवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाउंट वरून एक निवदेन जाहीर केले ज्यात त्यांनी मुद्देसूद मांडणी केली आहे.
–
हे ही वाचा – या वेबसाईट्स आणि अँप्सने मिळते लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती
–
निवदेनामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, जानेवारी २०२१ पासून आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला सुरवात केली आहे,अनेक तज्ञांना आश्र्चर्य वाटले की भारतात लसीकरण सुरूर झाले तसेच ओढवलेली आपत्ती ही संपूर्ण जगात असल्याने सरकारच्या परवानगीने, ‘आम्ही लसी इतर देशांना पाठवल्या, त्याबदल्यात तंत्रज्ञानाची आणि आरोग्यसेवेची देवाणघेवाण होईल हा उद्देश होता’.
भारतासारख्या मोठ्या देशात केवळ २,३ महिन्यात लसीकरण पूर्ण होणे हे शक्य नाही कारण त्यामध्ये अनेक अडचणी उदभवतात, दोन मोठ्या देशात सुरू असलेल्या लसीकरणमध्ये आपल्या देशाचा नंबर लागत आहे.
आता पर्यंत आम्ही २०० mn एवढे डोस दिले आहेत. तसेच प्रामुख्याने भारतात लसीकरण झाले पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि वर्षाच्या शेवटी इतर देशांना आम्ही लसी पुरवू आणि अभिमानाची बाब म्हणजे लसीच्या उत्पादनामध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकावर येत आहोत.
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी स्पष्ट केला आहे ज्यावरून त्यांना ट्रोल केले जात आहे ते म्हणजे भारतीयांची लस परदेशात पाठवली जात आहे, यावर ते असं म्हणतात की, कोणत्याही भारतीयाला मिळणारी लस आम्ही इतरांना पाठवली नाही.आम्ही कायमच पूर्ण देशाला लस पुरवण्यासाठी अग्रेसर राहू.
–
हे ही वाचा – जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस या भारतीयाने निर्माण केली आहे
–
पूनावाला परिवार लंडनमध्ये गेला असताना त्यांच्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा माध्यमात सुरू होत्या, तसेच आदर पुनावाला यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी मला धमक्यांचे फोने येत आहेत, असे सांगितले होते.
एकूणच देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितिमुळे सवर्सामान्य लोक फक्त वाट बघू शकतात, सरकारमधील आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरूच राहणार, आरोग्य व्यवस्थेचे अनागोंदी कारभार रोज समोर येतच आहेत आपण फक्त लस कधी मिळेल याकडे डोळे लावून बसले पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.