' या दहा शक्तिशाली शासकांचा झालेला अतिशय दुर्दैवी अंत आजही अंगावर काटा आणतो – InMarathi

या दहा शक्तिशाली शासकांचा झालेला अतिशय दुर्दैवी अंत आजही अंगावर काटा आणतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलद्यातकः ॥

या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा की घोडा नाही, हत्ती नाही, वाघ नाही पण यज्ञामध्ये बळी हा बकऱ्याचाच दिला जातो, कारण दुर्बलाचे रक्षण साक्षात देवही करत नाही. म्हणजेच ह्या जगात दुर्बलाचे काही खरे नाही कारण हे जग अतिशय निर्दयी व क्रूर आहे. ते दुर्बलाला पायदळी तुडवून पुढे जाते.

म्हणूनच प्रत्येक माणूस शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा, शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याचे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

इतिहासात बघितले तर शक्तीच्या, सत्तेच्या हव्यासाने झपाटलेल्या लोकांनी एकदा सत्ता हातात आल्यावर लोकांचे शोषण सुरु केले. पण ते विसरले होते की काळ आणि नशीब कधीही पालटू शकते.

काळ ही एक अशी गोष्ट आहे जी भिकाऱ्याला राजा व राजाला भिकारी बनवू शकते. काळापुढे कोणाचे काहीही चालत नाही.

 

mussolini-terror-marathipizza

 

महाभारतात विदुर म्हणतो,

कालः पचति भूतानि, कालः संहरते प्रजाः |
कालः सुप्तेषु जागर्ति, कालो हि दुरतिक्रमः ||

म्हणजेच काळ सर्व भूतमात्रांना पचवतो, काळ प्रजेचा म्हणजेच जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाचा संहार करतो (जो जन्माला येतो तो मरतोच), काळ झोपलेल्याला जागं करतो.

खरंच काळाला कोणीही हरवू शकत नाही. म्हणजेच काळ आणि वेळ दोन्ही जुळून आल्यावर माणूस कितीही शक्तिशाली असला तरी तो काळाच्या तावडीतून सुटू शकत नाही.

म्हणूनच आपण बघतो की काही शक्तिशाली, सत्तेच्या शिखरावर असलेल्या अनेक व्यक्तींचा शेवट मात्र अतिशय दयनीय झालेला आहे.

हाच काळ अनेक वर्ष निद्रितावस्थेत असलेल्या शोषण चाललेल्या समाजामध्ये क्रांती उत्पन्न करतो आणि हुकुमशहांचे अस्तित्वच पुसून टाकतो.

आज आपण अशाच काही शासकांबद्दल जाणून घेणार आहोत जे सत्तेच्या शिखरावर असले तरी त्यांचा शेवट वाईट झाला किंवा आयुष्यात कधीतरी त्यांना काळाने आपला महिमा दाखवून दिला.

बायझेड १ ( Bayezid I)

 

Bayezid-I-marathipizza

 

Bayezid हा ओटोमन –तुर्की शासक होता. त्याने १६ जून १३८९ ते ८ मार्च १४०३ मध्ये राज्य केले. त्याला लोक ‘The Thunderbolt’ ह्या नावाने ओळखत असत.

त्याचा जन्म १३६० साली किंवा १३५४ साली झाला असा अंदाज आहे. त्याच्या वडिलांचे नाव मुराद होते तर आईचे Gülçiçek Hatun होते.

त्या काळातल्या सर्वात मोठ्या व शक्तिशाली सैन्यापैकी एक त्याची सेना होती. कॉन्स्टान्टिनपल Constantinople शहर काबीज करण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला होता असे म्हणतात.

त्याच्या शासनाने अन्टोलिया मध्ये एक प्रकारची एकता निर्माण झाली होती. मेहमद आणि सुलेमान ह्यांच्या नंतर जर कोणत्या शासकाचे नाव घेतले जाते तर ते बायझेड १ चे होय.

त्याने बराच काळ शासन केल्यानंतर १४०२ साली अनकाराच्या युद्धात मंगोलियन साम्राज्याशी संबंध असलेल्या तैमुर शासकांनी व ओटोमन मधील काही लोकांनी मिळून Bayezid विरुद्ध कारस्थान केले व तो युद्ध हरला.

नंतर तैमुर शासकांनी त्याच्याकडून पराभवाबद्दल सह्या करून घेऊन त्याला बंदी बनवले आणि हा शक्तिशाली साम्राज्याचा शासक ८ मार्च १४०३ रोजी अत्यंत दयनीय अवस्थेत मरण पावला.

 

रिचर्ड ३

 

deathrichardiii-marathipizza

 

रिचर्ड ३ हा इंग्लंडचा राजा होता. त्याने १४८३ ते त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच १४८५ पर्यंत राज्य केले.

House of York मधील व Plantagenet राजवंशातील तो शेवटचा राजा होता. बोसवर्थ फिल्ड येथे Wars of the Roses ह्या युद्धात त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने इंग्लंड मधील मध्ययुगीन कालखंडाचा शेवट झाला.

रिचर्ड तिसरा ह्याचा जन्म २ ऑक्टोबर १४५२ साली झाला होता. त्याचा भाऊ किंग एडवर्ड चौथा ह्याचा १४८३ साली मृत्यू झाल्यानंतर रिचर्डला एडवर्ड चौथा ह्याचा मुलगा एडवर्ड पाचवा व भावी राजा ह्याचा Lord Protector करण्यात आले.

असे म्हणतात की, स्कॉटलंडच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर ह्याने एडवर्डच्या दोन्ही मुलांना संपवले.

(असेही म्हणतात कि एडवर्ड चौथा ह्याच्या मृत्यूस कारणीभूत रिचर्डच होता.) त्यानंतर त्याने २६ जून १४८३ रोजी सत्ता काबीज केली आणि थोड्याच दिवसात युद्धाला तोंड फुटले.

ह्या Bosworth Field च्या युद्धामध्ये त्याचा पराभव झाला आणि त्याला कैद करण्यात आले. असे म्हणतात की त्याच्या खाजगी अवयवांवर तलवारीने घाव घालण्यात आले.

संपूर्ण प्रजेसमोर त्याला अमानुषरित्या मारहाण करण्यात आली व नंतर तो वेदनेने तडफडत असतानाच त्याला जिवंत जाळून मारण्यात आले. २२ ऑगस्ट १४८५ रोजी वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी इतका भयानक शेवट ह्या राजाच्या वाट्याला आला.

 

 हॅन्री ४

 

Henry IV-marathipizza

 

Henry IV जो Henry of Bolingbroke म्हणून सुद्धा ओळखला जात असे तो इंग्लंडचा राजा होता.

त्याने ३० सप्टेंबर १३९९ पासून २० मार्च १४१३ पर्यंत शासन केले. १५ एप्रिल १३६७ रोजी जन्म झालेला हा राजा त्या काळी युरोपातील सर्वात शक्तिशाली राजा होता. लोक त्याचा सन्मान करीत होते. पण ह्या राजाचे काही कारणाने Pope Gregory VII शी वैचारिक मतभेद निर्माण झाले.

हे मतभेद पुढे आणखी बिघडले. हॅन्रीने पोप च्या सगळ्या मागण्या आणि बोलणे निराधार व अनावश्यक आहेत असे सांगितले आणि मागण्या मान्य करण्यास नकार दिला.

पण काही दिवसांनंतर त्याच्या लक्षात आले की, त्याचे निर्णय चुकत आहेत. तेव्हा तो ४५० मैल प्रवास करून पोपला भेटण्यास गेला तेव्हा पोपने त्याला भेटण्यास नकार दिला.

त्याने तीन दिवस व तीन रात्री इतकी वाट बघितली. कडाक्याच्या थंडीत तो पोप भेटतील ह्या आशेवर वाट बघत राहिला. अखेरीस जेव्हा पोपने त्याला आत घेतले तेव्हा त्याने पोपचे पाय धरून माफी मागितली. इतक्या मोठ्या राजासाठी हे अतिशय अपमानास्पद होते.

आयुष्याच्या अखेरीस तो त्वचेच्या गंभीर आजाराने त्रस्त होता आणि त्याला इतर सुद्धा आजार बळावले होते. अखेरीस २० मार्च १४१३ रोजी एका अनामिक आजाराच्या अटॅकने त्याचा मृत्यू झाला.

 

मुअम्मर अल- गद्दाफी

 

gaddafi-death-marathipizza

 

मुअम्मर मोहम्मद अबू मिन्यार गद्दाफी हा लिबियाचा नेता होता. त्याचा कार्यकाळ १ सप्टेंबर १९६९ ते २० ऑक्टोबर २०११ होता.

४० वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या देशातल्या लोकांवर राज्य करणाऱ्या ह्या राजकारण्याचा अंत मात्र अतिशय वाईट झाला. लिबियाच्या सिव्हील वॉर नंतर गद्दाफीची सत्ता धोक्यात आली.

त्याने त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जाहीर फाशी दिली. त्याच्या राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावला होता. वैद्यकीय सेवा सुद्धा निकृष्ट दर्जाच्या होत्या. त्याच्या राज्यात कोणालाही त्याच्याविरुद्ध बोलण्याचे किंवा ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य नव्हते.

ह्या सगळ्या विरुद्ध ज्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले त्यांच्यावर गद्दाफीने गोळीबार करवला होता. ह्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोक त्याची निंदा करू लागले. अखेर त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.

जेव्हा लोकांनी त्याला पकडले तेव्हा त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. त्याच्यावर अनेक जण थुंकले आणि त्याला लोकांच्या हवाली केले.

लोकांनी त्याला खूप मारले आणि शेवटी एका माणसाने त्याच्यावर गोळी चालवून त्याला ठार केले. त्यानंतर त्याच्या मुलाला मुतस्सिमला सुद्धा ठार मारण्यात आले. इतक्या लोकप्रिय नेत्याचा अंत मात्र भयावह झाला!

 

वेलेरियन

 

valerian-marathipizza

 

Publius Licinius Valerianus Augustus उर्फ Valerian the Elder हा एक रोमन शासक होता.

त्याचा कार्यकाल इसवी सन २५३ ते २६० मानला जातो. त्याचा जन्म इ.स. १९३ ते २०० च्या काळात झाला. हा रोमन शासकांमधील सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक मानला जातो.

ह्याचे युद्ध पर्शियन लोकांशी झाले. परंतू युद्धाच्या आधी आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांच्या सेनेचे खूप नुकसान झाले. अखेर त्यांनी पर्शियन्स समोर हार मानली व समर्पण केले.

त्यानंतर Sassanian Persian king Shapur I ने त्याला The Battle of Edessa हरल्यानंतर कैद केले. तो पराभव होऊन कैद होणारा पहिला रोमन शासक ठरला. त्याच्या अटकेमुळे रोमन साम्राज्यात खळबळ माजली. त्याला सांगण्यात आले होते की कैदेत असताना सुद्धा चांगली वागणूक मिळेल पण असे झाले नाही.

त्याला अतिशय टोकाच्या तिरस्काराचा सामना करावा लागला. त्याच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. त्याच्या मृत्युनंतर सुद्धा त्याचे शरीर एका मंदिरात ठेवण्यात आले जेणे करून लोकांना कळेल की त्याच्यावर किती अत्याचार झाले होते.

 

अल् मुस्तासीम् (Al-Musta’sim)

 

Al-Musta-sim-death-marathipizza

हे ही वाचा – प्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा

Al-Musta’sim-Billah Abu-Ahmad Abdullah bin al-Mustansir-Billah हा बगदाद चा शेवटचा Abbasid खलिफा होता. त्याने ५ डिसेंबर १२४२ ते त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच २० फेब्रुवारी १२५८ पर्यंत राज्य केले.

मंगोलियन शासक Hulagu Khan ने त्याला धमकी दिली होती पण Al-Musta’sim ने त्याला भिक घातली नाही. तेव्हा मंगोलियन लोकांनी बघदाद वर आक्रमण केले.

मंगोलियन लोकांची एक धारणा होती. ते कुठल्याच शासकाला स्वत: मारत नसत. त्यांना ‘Royal blood’ सांडवायचे नव्हते. त्यांनी त्याला एका कार्पेट मध्ये बांधून त्यांच्या घोड्यांच्या पायदळी तुडवून मारले.

असेही म्हणतात की Hulagu Khan ने त्याला त्याच्याच खजिन्याच्या खोलीत अन्नपाण्याविना बंदिस्त करून ठेवले व “तुला तुझे धन इतकेच प्रिय आहे तर तू तेच खाऊन भूक भागव (eat of thy treasure as much as thou wilt, since thou art so fond of it.)” असे ऐकवले होते.

 

बेनिटो मुसोलिनी

 

mussolini-marathipizza

 

Benito Amilcare Andrea Mussolini हा इटालियन राज्यकर्ता, पत्रकार आणि National Fascist Party चा नेता होता आणि फासीस्टवादाचा प्रणेता होता.

ह्याने हुकुमशाही अनिवार्य केली. त्याला Il Duce (The Leader) असेही म्हणतात. त्याचा जन्म २९ जुलै १८८३ मध्ये झाला.

दुसऱ्या महायुद्धात मुसोलिनीने जर्मनीला सपोर्ट करून दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. पण नाझी जर्मन सैन्यासह इटालियन सैन्याला सुद्धा सगळीकडे पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर २८ एप्रिल १९४५ रोजी उत्तर इटली मधल्या Giulino di Mezzegra गावात मुसोलिनी आणि त्याच्या सहकारी नेत्यांना इटालियन कम्युनिस्ट लोकांनी पकडले आणि गोळी मारून ठार केले.

असं म्हणतात की Walter Audisio ह्या इसमाने मुसोलिनीला गोळी मारली.

ह्यानंतर त्याचे पार्थिव मिलानला आणले गेले आणि नंतर मिलान मध्ये त्याच्या पार्थिवाची अनेक लोकांनी वाईट तऱ्हेने विटंबना केली. त्याच्या मृत शरीराला सुद्धा ह्या विटंबनेची जाणीव झाली असेल.

 

Romanos IV Diogenes

 

Romanos IV Diogenes-marathipizza

 

Romanos IV Diogenes हा Romanus IV म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा Byzantine militaryचा सदस्य होता. त्याने Byzantine राजा Constantine X Doukas मृत झाल्यानंतर त्याच्या बायकोशी म्हणजेच Eudokia Makrembolitissa विवाह केल्यानंतर तो Byzantine चा शासक झाला.

त्याने इसवी सन 1068 ते 1071 राज्य केले. १०७१ साली Battle of Manzikert मध्ये Alp Arslan च्या तुर्की सैन्याशी लढताना त्यांच्या सेनेचा पराभव झाला.

ह्या युद्धात असा अंदाज होता की Byzantine चे सैन्य तुर्की सैन्याला सहज हरवू शकेल.पण काही देशद्रोह्यांमुळे तुर्की सैन्य हे युद्ध जिंकले. आणि Byzantine सैन्याने शरणागती पत्करली. Romanos ला सुलतानकडे नेण्यात आले, तिथे त्याला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली.

पण नंतर त्याला सोडून देण्यात आले. नंतर त्याच्याच लोकांनी त्याला धोका दिला आणि अत्याचार केले. त्याला आंधळे करून एका आश्रमात सोडून देण्यात आले जिथे त्याच्या जखमांत इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

Maximilien Robespierre

 

Maximilien Robespierre-marathipizza

 

Maximilien François Marie Isidore de Robespierre हा एक फ्रेंच वकील आणि राज्यकर्ता होता. फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यामध्ये घडलेल्या भयानक शासनकाळाशी त्याचा फार जवळचा संबंध आहे. Maximilien Robespierre चा जन्म ६ मे १७५८ रोजी झाला. फ्रेंच राज्यक्रांती नंतर फ्रांस मधील राजकारणाचे चित्र बदलू लागले होते.

त्याने लोकांना ऑगस्ट १७९२ मध्ये लोकांना तत्कालीन King Louis XVI ह्या हुकुमशहा असलेल्या शासकाविरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त केले. २७ जुलै १७९३ मध्ये तो Committee of Public Safety मध्ये निवडून आला.

ह्या कमिटीचे काम सरकार वर लक्ष ठेवणे असे होते. काही तणावाच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर मध्ये सरकारने Reign of Terror सुरु केले. ह्यात सरकारविरुद्ध कारवाई किंवा उठाव करणाऱ्यांचा किंवा सरकारला ज्याच्याबद्दल संशय आहे अशा सगळ्यांचा शिरच्छेद करण्यात येई. ह्यात ३०,००,००० लोकांना अटक करण्यात आली आणि १७,००० हून जास्त लोकांचा शिरच्छेद करण्यात आला.

ह्यात सत्तेने आंधळ्या झालेल्या Robespierre ने कारवाईच्या नावाखाली आणखी काही लोकांचा वध करून त्याचे सगळे राजनैतिक शत्रू संपवले. १७९४ पर्यंत हे सत्र सुरु राहिले.

पण नंतर अनेकांना त्याच्या हेतूंबद्दल संशय येऊ लागला. अनेकांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला आणि १७९४ मध्ये अखेर त्याला अटक करण्यात आली. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्याचाकडून स्वतःच्या जबड्यावर गोळी चालवली गेल्याने त्याचा जबडा अक्षरश: तुटून खाली पडला.

पण लोकांनी त्याच्यावर उपचार न करता त्याला टोमणे मारणे व त्रास देणे सुरु ठेवले. जेव्हा उपचारांसाठी डॉक्टर आले तेव्हा तो तडफडत मरणाची वाट बघत होता. काही लोक असे म्हणतात की त्याला Charles-André Merda नावाच्या इसमाने गोळी मारली. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले व नंतर त्याच्या केस चा तपास न करता त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

 

Charles VII

 

Charles_VII-marathipizza

 

Charles VII ह्याला The Victorious किंवा the Well-Served असेही म्हटले जाते. तो House of Valois चा शासक होता. त्याने फ्रांस राजा म्हणून १४२२ ते १४६१ पर्यंत राज्य केले. १४५८ मध्ये तो आजारी पडल्यानंतर त्याच्याकुटुंबातील लोकांनी त्याची काळजी घेणे बंद केले.

त्याच्या पायाला जखम झाली होती पण उपचार न मिळाल्यामुळे ते इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरले. शेवटी उपासमारीने २२ जून १४६१ रोजी ह्या राजाचा अंत झाला.

यावरून हेच लक्षात येते की कितीही शक्तिशाली माणूस असो, ग्रह फिरले की नशिबापुढे कोणाचे काहीही चालत नाही. काळ बदलला की राजाचा रंक होतो आणि हातातली सत्ता गेल्यावर खूप करुण अंत होतो.

म्हणूनच ह्या जगात शाश्वत काहीच नाही व मृत्यू हेच एक अंतिम सत्य आहे हे समजून जगण्यातच प्रत्येकाचे भले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – रक्ताचं स्नान, तारुण्याचा ध्यास… इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?