या ‘एका झाडाची’ रक्षा करायला २४ तास पोलीस राबत असतात…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मोठ मोठ्या नेत्यांना, उद्योगपतींना, सिनेस्टारना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली असल्याच्या बातम्या आपण खूपदा ऐकतो. एकदम सुदृढ आणि पिळदार शरीर यष्टीचे लोक त्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात असतात.
चकचकीत गाड्यांची ओळ, मागे पुढे बंदूकधारी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या मधून जाणारी ती आसामी, हे दृश्य लोकांना किती भारी वाटत असतं.
काही कार्यक्षेत्रं अशी आहेत, की त्या पदावर कार्यरत असलेल्या लोकांना सिनेस्टारपेक्षा जास्त ग्लॅमर आहे. रुबाबदार पोलिस कर्मचारी, मिलिटरीमध्ये असणारे आपले सैनिक हे खरेखुरे हिरो. पण या लोकांनाही कधी कधी खूप वेगळं काम मिळतं. समाजाची, देशाची सुरक्षा हेच लोक जपतात. ते आहेत म्हणून आपण सुखाने जगू शकतो.
===
हे ही वाचा – दिग्दर्शकाची तंद्री लागली आणि सुपरहिट ठरलेल्या ‘या’ डायलॉगची निर्मिती झाली…!!
===
एक अशीही जागा आहे, जिथे पोलिसांवर खूप वेगळ्या संरक्षणाची जबाबदारी आलेली आहे. काय आहे ही आगळीवेगळी जबाबदारी? बारा महिने तेरा काळ कशाचं संरक्षण करायचं करतात पोलिस? तर एका झाडाचं!!!
असंही झाडांचं पर्यावरणाच्या दृष्टीने असलेलं महत्त्व सर्वांनाच माहित आहे. त्यासाठी सरकार, सेवाभावी संस्था, निसर्ग प्रेमी वृक्षारोपण करतातच. जेनेट यज्ञेश्वरन यांनी तर बेंगलोरचा टापू झाडं लावून हिरवागार करुन टाकला आहे. मग या झाडात असं काय विशेष आहे, वेगळं आहे की या झाडाची विशेष काळजी घेतली जाते?
सलामतपूर या भोपाळ आणि विदिशा या मध्यप्रदेशातील दोन गावांच्या मध्ये डोंगरावर असलेल्या या एका झाडाला खास पोलिस संरक्षण देण्यात आलेलं आहे.
काय आहे या झाडाचं वैशिष्ट्य?
ज्याच्या संरक्षणासाठी सरकार सतत तिथं पोलिसांना नियुक्त करतं, झाडाचं वैशिष्ट्य काय आहे, याचा विचार करताय ना? त्याआधी आणखी काही गमतीशीर गोष्टी जाणून घ्या.
या झाडासाठी वर्षभराचा जवळपास १५ लाख रुपयांचा खर्च सरकार करत आहे!!!
चार ते पाच पोलीस कर्मचारी या झाडाच्या संरक्षणासाठी तैनात केले आहेत. सांची नगरपरिषद या झाडासाठी पाण्याचा टँकर पाठवते. दर आठवड्याला कृषी अधिकारी येऊन या झाडाची तपासणी करुन जातात. असं काय विशेष आहे या झाडात? हे झाडं कशाचं आहे?
हे झाड आहे पिंपळाचं. याला बोधिवृक्ष असेही म्हणतात. २०१२ साली श्रीलंकेचे अध्यक्ष महींद राजपक्षे यांनी भारताला भेट दिली होती तेव्हा त्यांनी हे झाड लावलं होतं. गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली तो वृक्ष पिंपळाचा. त्यामुळे बौद्ध धर्म पिंपळाच्या झाडाला खूप मानतो.
ख्रिस्तपूर्व ५३१ मध्ये गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ती पिंपळाच्या झाडाखाली. त्या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणतात. हा बोधिवृक्ष बिहारमध्ये गया येथे आहे. या झाडाला खूप महत्त्वाचं मानतात.
===
हे ही वाचा – नेपाळचे असूनही गौतम बुद्ध हे भातीयांना “आपले” वाटतात – त्यामागे ही आहेत कारणं!
===
अर्थात, खूपदा हे झाड नष्ट करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते झाड कधी नष्ट झालं नाही. परत परत उगवून आलेलं दिसलं.
१८८० साली ब्रिटिश अधिकारी कनिंगहॅम याने श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाची फांदी आणून गया येथे लावली आणि तेव्हापासून आजवर हा बोधिवृक्ष सळसळतो आहे.
अनुराधापूरच का?
ख्रिस्तपूर्व काळात तिसऱ्या शतकात सम्राट अशोक याने कलिंगाच्या लढाईत विजय मिळवला. पण त्यावेळी झालेला प्रचंड नरसंहार पाहून व्यथित झालेल्या सम्राट अशोकाने ‘युध्द नको मज बुद्ध हवा’ म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
मनःशांती करीता त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचा प्रसार जगभर व्हावा यासाठी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी या बोधिवृक्षाची फांदी घेऊन पाठवलं होतं.
श्रीलंकेतील अनुराधापूर येथे महेंद्रने ही फांदी लावली. मूळ बोधिवृक्षाचा हा वंशज आजही श्रीलंकेत आहे. म्हणूनच कनिंगहॅमने त्या वृक्षाची फांदी आणून बुद्ध गयेत लावली. आज त्याचा मोठा वृक्ष झाला आहे.
त्याच बोधिवृक्षाची फांदी आणून सलामतपूर येथेही लावली आहे. आणि त्या वृक्षाची खूप काळजीपूर्वक जोपासना केली जाते. शांतीचा संदेश देणाऱ्या या बोधिवृक्षाची जोपासना ज्या तळमळीने केली जाते, त्याच तळमळीनं माणुसकीची जोपासना केली तर जगात कशाची कमी राहील?
सगळे पंथ, संप्रदाय एकच गोष्ट सांगतात जगा आणि जगू द्या.. बोधिवृक्षाची जोपासना करुन जणू काही हेच सांगितलं जात आहे. धार्मिक दंगे, उच्च नीच हे सारे भेदभाव टाळून आपण किमान चांगलं माणूसपण निभावूया.
===
हे ही वाचा – गच्चीवरील झाडांची अनोखी किमया! उन्हाळ्यातही भासत नाही पंख्याची गरज…!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.