आजपर्यंत या गावात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही ..कारण ऐकून थक्क व्हाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आज कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. जिथे कोरोना हा शब्द माहिती नव्हता तिथे आज कोरोना जाऊन पोहचला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाची दयनीय अवस्था करून ठेवली आहे.
एकीकडे अमेरिका, इस्रायल, सिंगापूर हे कोरोनमुक्त होते आहेत मात्र आपल्याकडे मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यातच लसींची कमतरता जाणवत आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्हयानजिक चिखलार वनक्षेत्र आहे. हे चिखलार अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिले आहे. मग ते 5 हजार आदिवासींनी एकत्र येवून केलेला जंगल सत्याग्रह असो , की स्वतंत्रता संग्रामात फुंकलेले रणशिंग असो.. अगदी सततची होणारी अवैध वृक्षतोड असो, चिखलार कायमच लाईम लाईट मध्ये राहिले आहे.
आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने फारसा विकासही नाही असे चिखलार देशी दारू किंवा कच्ची दारू विक्रीसाठी बदनाम झाले आहे. खरेतर चिखलार ला स्वातंत्र्यसंग्रामची पार्श्वभूमी आहे. सेठ दीपचंद गोठी यांच्या नेतृत्वाखाली 5 हजार ग्रामीण आदिवासिंनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून तुरुंगवास ही भोगला होता. त्याची कहाणी मध्यप्रदेशाच्या इतिहासात ठळक लिहिली गेली आहे.
बैतुल जिल्ह्यात झालेला पहिला जंगल सत्याग्रह हा चिखलार ला झाला होता. सातपुडा पर्वतरांगेतील चिखलार निसर्गरम्य तर आहेच पण जवळच असलेल्या झर्यामुळे पर्यटक देखील चिखलार ला भेट देतात. चिखलारमध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात गोविंदराव लव्हाटे यांचे नाव विशेष उल्लेखाने घेतले जाते.
–
हे ही वाचा – या गावात लोक चालताना, आंघोळ करताना अचानक गाढ झोपतात, त्यांच्याही नकळत…
–
गावांगावात जावून ग्रामीण लोकांना स्वातंत्र लढ्याचा परिचय करून देणे, त्यांना स्वसंरक्षणासाठी लाठी चालवायला शिकवणे आदि गोष्टी गोविंदरावांनी मोठ्या हिरहिरीने केली होती. स्वातंत्र्य लढ्याचे अभ्यासक आणि लेखा असलेले ‘कमलेश सिंह’ यांनी लिहीलेल्या ‘ सतपुडा के गुमनाम शहीद ‘ या पुस्तकात या चिखलार गावातील जंगल सत्याग्रहाचा उल्लेख आला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर चिखलारची अवस्था देखील देशातील इतर खेड्यांसारखीच झाली. राज्यमहामार्गापासून जवळ असूनही चिखलार चा म्हणावा तसा विकास झाला नाही उलट देशी किंवा कच्च्या दारूच्या निर्मितीसाठी चिखलार बदनाम झाले. पण गेल्या काही दिवसांपासून हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते वेगळ्याच कारणामुळे..
काय असावे बारे ते कारण? ते आहे, गावाने कोरोंना म्हणजेच कोविड – 19 वर मिळवलेल्या विजयाचे. असे काय घडले ज्यामुळे गावातून कोरोंना हद्दपार झाला? गावात एकही कोरोंनाबाधित रुग्ण नाही. चला जाणून घेऊ.
मागील वर्षी कोरोंना महामारीने सार्या जगाला विळखा घातला. कोणत्याच लहानथोरांना त्याने सोडले नाही. लहान मोठ्या देश, शहरांपासून लहान सहान खेडेगावांपर्यंत कोरोंनाचा कहर बरसू लागला.
सारे जन जीवन विस्कळीत झाले.. अर्थ, विकास यांना खीळ बसली. पण कोरोंना काही कमी व्हायचे नाव घेईना. याच कठीण प्रसंगात चिखलार गावच्या महिलांनी ती गोष्ट करून दाखवली तीही अशा नियोजनपूर्वक की मोठ्या मोठ्या यंत्रणा करून दाखवू शकल्या नाहीत.
या महिलांनी एकत्र येवून ठरवले की गावातून कोरोंनाला हद्दपार करायचे. तसेच नव्याने कोणी कोरोंना संक्रमित होवू नये यासाठी प्रयत्न करायचे. त्यानुसार योजना आखली गेली. आणि हे ध्येय सध्या करण्याची जबाबदारी गावातील महिलांनी स्वत:कडे घेतली.
त्यानुसार योजना प्रत्यक्षात राबवायला सुरवात झाली. कोरोंना संक्रमणाच्या वाढत्या धोक्यामुळे देशात सगळीकडे जनता कर्फ्यू व नंतर लॉकडाऊन करण्यात आले.
मध्यप्रदेशातही कोरोंना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर चिखलार गावच्या महिलांनी गाव कोरोंना मुक्त करायचा घेतलेला निर्णय हा निश्चितच धाडसी आणि कौतुकास्पद आहे.
गावातील महिलांनी सर्वात आधी गावातले रास्ते बंद केले. ज्यामुळे गावातून कोणी बाहेर जावू शकणार नव्हते आणि बाहेरून कोणी गावात येवू शकणार नव्हते. त्यानंतर गावात जनता कर्फ्यू लावण्यात आला. व या महिला लढ्वैय्यांप्रमाणे हातात लाठी घेवून गावातील रस्त्यांवर व गावच्या वेशीवर गस्त घालतात.
–
हे ही वाचा – मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव
–
विनाउद्देश फिरणार्या लोकांना लाठीचा प्रसाद द्यायलाही या महिला मागेपुढे पहात नाहीत. गावातील युवा वर्गानेही महिलांना या नियोजनात मदत केली आहे. गावाबाहेरुन काही आणायचे असेल किंवा काही आवश्यकता असेल तर गावातील दोन तरुण गावाबाहेरील कामे करतात.
विशेष गोष्ट ही की गावाजवळून जाणार्या राज्य महामार्गावर देखील या महिला चौकीदारी करतात. गावच्या सीमा बांबूंचे बारीकेड्स लावून बंद केलेले आहेत. बाहेरच्यास गावात प्रवेश निषिद्ध आहे. या महिला आळीपाळीने दिवसभर चौकीदारी करून निगराणी करतात. आपल्या गावाला कोविडपासून लांब ठेवायचा प्रयत्न करतात. याचाच रिजल्ट म्हणजे आख्खा चिखलार गाव कोरोंना मुक्त झाला आहे.
आपल्यातील परंपरागत लढण्याच्या गुणाचा अंगीकार करत चिखलार गावातील महिलांनी कोरोंनावर विजय मिळवत आपला आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.