' रावण आणि त्याच्या पित्याने इथे केली होती तपस्या! तिथे आज उभं आहे शिवकालीन मंदिर – InMarathi

रावण आणि त्याच्या पित्याने इथे केली होती तपस्या! तिथे आज उभं आहे शिवकालीन मंदिर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा अनेक मिथकांंचा, कथांचा, रहस्यांचा आणि निरनिराळ्या देवी देवतांच्या उपासकांचा, निरनिराळ्या पंथांचा देश आहे. शिव आणि विष्णू या प्रमुख देवतांंची उपासनापद्धती रूढ होती. आदिदेव शिव हे लोकदेव म्हणूनही ओळखले जात. त्यांची उपासना करणारा पंथ हा शैव पंथ म्हणून ओळखला जातो.

शिव हा उर्जेचा निर्माता असे मानून शिवाची उपासना केली जाते. अशी अनेक शिवक्षेत्रे भारतभर दिसून येतात. त्यापैकी दिल्ली-गाझियाबाद जवळ विश्रवास क्षेत्र आहे. ज्याचा उल्लेख लंंकापती रावणाचे जन्मस्थान असा केला जातो.

 

ravana-inmarathi

 

महान ऋषी पुलत्स्य हे शिवभक्त होते. त्यांचे पुत्र विश्रवा हे ही शिवभक्त होते. त्यांनी वसवलेले नगर हे विश्रवास जे आज बिसरख या नावाने ओळखले जाते.

आजही उत्खनन केल्यावर इथे शिवलिंग सापडतात. विश्रवास हे शिवालिक टेकड्यांमधे उगम पावणाऱ्या यमुनेची उपनदी असलेल्या हरनदी/हरनंदी/हिंडन नदीकाठ क्षेत्रात वसले आहे.

याच नदीकाठी विश्रवा ऋषींनी शिव उपासना केली होती त्यानंतरच रावणाचा जन्म झाला होता. या ठिकाणी मान्यता आहे की भगवान शिव स्वतः स्वयंभू रुपात प्रगट झाले होते..

===

हे ही वाचा इथं दसऱ्याच्या दिवशी चक्क रावणाचं ‘श्राद्ध’ केलं जातं! सविस्तर वाचा!

===

हे स्थान म्हणजेच आजच्या गाझियाबाद जिल्ह्यातील दुधेश्वर किंवा दुग्धेश्वर मठ मंदिर होय.

 

dudheshwar inmarathi

 

या शिवलिंगाचे नाव दुग्धेश्वर पडण्यामागे ही रंजक कथा आहे ती अशी की, शेजारच्या कैला गावातील गायी चरण्यासाठी या जागी आल्यानंतर इथल्या टेकडीसदृश्य जागी आल्या की त्यांच्या कासेतून दूध गळायला लागत असे.

ही घटना गावकऱ्यांना समजल्यावर त्यांनी त्या जागी खोदले असता महादेवाचे स्वयंभु लिंग त्यांच्या दृष्टीस पडले. तेच हे दुग्धेश्वर महादेव मंदिर. यालाच हिरण्यगर्भ ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. शैवपंथामध्ये हे महत्वाचे स्थान आहे.

दुसरी एक कथा अशीही प्रचलीत आहे की आपल्या तपसाधनेची सुरवात या शिवलिंगाची उपासना करून केली होती. असे म्हणतात की रावणाचे गाव विश्वरसपासून हिंडन नदीकाठी येण्यासाठी एक भुयार होतं जे काळाच्या ओघात बुजले आहे.

ही देखील मान्यता आहे की उपासनेदरम्यान याच लिंगासमोर रावणाने आपले मस्तक अर्पण केले होते. म्हणून आजही आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दुग्धेश्वर महादेवासमोर मस्तक झुकवून प्रार्थना करण्याची पद्धत रूढ आहे.

 

dugdheshwar shivlinga inmarathi

 

मंदिरातील शिवलिंग स्वयंभु असून जमिनीत साडेतीन फूट खोल आहे. या शिवलिंगावर श्रावणी सोमवारी जल अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतात असे म्हणणात.

मंदिराचा मुख्य दरवाजा एका दगडावर कोरलेला असून मध्यभागी गणपती आहे. मंदिरावर आणि परिसरात काही जळण्याच्याही खूणा असून कालीच्या उत्पत्तीपासून धुमसत असलेल्या महादेवाचे त्या प्रतिक आहेत असे सांगितले जाते. मंदिर प्रा़ंगणात एक विहिर असून तिच्या पाण्याची चव कधीकधी दुधासारखी लागते.

ह्या मंदिराचा जीर्णोद्धार छ. शिवाजी महाराज यांनी केला असेही काहीजण सांगतात. सध्या तिथे गुरूकूल पद्धतीने चालणारी पाठशाळा असून दुग्धेश्वर विद्यापीठ या नावाने ती ओळखली जाते.

 

shivaji maharaj inmarathi

 

भारतभरातून विद्यार्थी तिथे वेदाध्ययन करण्यासाठी येतात. मंदिराच्या वतीने गरीब रुग्णांसाठी एक आयुर्वेदिक चिकीत्सालय देखील चालवण्यात येते..

दुग्धेश्वर भगवान यांच्या दर्शनाने अपार शांतीचा अनुभव येतो आणि मन चिदानंद रूपी महादेव चरणी लीन होते…

===

हे ही वाचा हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?