मंदिरात लाखो लिटर पाण्यानेही पूर्ण न भरणारा घडा, यामागे विज्ञान की अंधश्रद्धा?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येक मंदिराच्या निर्मितीमागे, आपल्या पूर्वजांचा एक संदेश किंवा एक विशिष्ट उद्देश होता. भारतातल्या असंख्य मंदिरांपैकी काही मंदिरं समानतेचा संदेश देतात, काही मनशुद्धी करून मनःशांती कशी मिळवावी हे सांगतात, काही मंदिरांमध्ये तंत्र विद्येची आजही उपासना केली जाते, काही मंदिराचं स्थापत्यशास्त्र डोळे आणि मस्तिष्क व्यापून टाकणारं असतं, तर काही मंदिरं कामशास्त्राची सुद्धा शिकवण देतात.
राक्षसांपासून, देवांपर्यंत सगळ्यांची मंदिर भारतात आहेत. ही मंदिरे किती पुरातन आणि विज्ञानाची सुद्धा परीक्षा पाहणारी आहेत हे प्रत्येक मंदिराच्या अलौकिक आणि चमत्कारिक अनुभव आणि गोष्टीच सिद्ध करतं.
आज आपण अशाच एका चमत्कारी मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्यापुढे वैज्ञानिकही नतमस्तक होताना दिसतात.
===
हे ही वाचा – भारतात या देवळांमध्ये चक्क केली जाते ‘राक्षसांची’ पूजा – वाचा एक ‘अजब’ सत्य!
===
राजस्थानच्या पाली जिल्ह्यात शितला मातेचे एक असे मंदिर आहे, ज्याचा घडा कितीही पाणी ओतले तरी भरत नाही. वाचून अचंबित झालात ना? विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे. हे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत.
शितला मातेची पूजा चैत्र सप्तमी म्हणजेच शितला सप्तमी आणि चैत्र अष्टमी म्हणजेच शितला अष्टमीला संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणावर केली जाते.
शितला माता हे देवी पार्वतीच्याच रूपांपैकी एक आहे, जे आपल्या भक्तांना सगळ्या रोग व्याधींपासून वाचवते असे मानले जाते. असेही म्हणतात देवीचा कोप झाला की कांजण्या, ताप, प्लेग, यांसारख्या साथी गावेच्या गावे उध्वस्त करतात.
याच शितालामातेला दरवर्षी शांत ठेऊन आशीर्वाद मिळवण्यासाठी ता २ तिथींना भक्तांची मोठी गर्दी होते. या दिवशी घरात चूल पेटत नाही. आदल्या दिवशी शिजवलेले अन्नच आपल्याला ग्रहण करावे लागते. या अन्नाचे एक वैशिष्ट्य असे, की गुणधर्माने शीतल असलेले पदार्थच बनवले जातात.
ऋतू बदलून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि आता अन्नात बदल व्हायला हवा हे दर्शवण्यासाठी हा सण असतो.
भारतात अनेक ठिकाणी देवीची मंदिरे आहेत, पण राजस्थानच्या पाली जिल्ह्यतील ८०० वर्षे जुन्या असलेल्या या शितलामातेच्या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.
===
हे ही वाचा – शिवलिंगाची पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!
===
या मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर एक जमिनीत रोवलेला घट आहे. तो घट फक्त अर्धा फूट खोल व अर्धा फूट रुंदीचा आहे. जेव्हापासून मंदिराच्या निर्मितीचे कार्य पूर्ण होऊन हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले तेव्हापासून या दोन तिथींना मंदिरातल्या घटात पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे.
ही प्रथा आजही सुरु असून आसपासच्या गावातले भाविक जल अर्पण करण्यासाठी मंदिरात येतात. कितीही पाणी ओतले तरी हा घट काही भरत नाही. लोकांच्या म्हणण्या नुसार त्यात आत्ता पर्यंत ५० लाख लिटरहून अधिक पाणी टाकण्यात आले असावे. तरी तो घट भरत नाही.
वर्षातून केवळ ३ वेळाच या घटावरचे झाकण उघडून भाविकांसाठी तो घट खुला केला जातो. भाविकांचे पाणी ओतून झाल्यावर मंदिरातील पुरोहित या घटात एक लहान कलशभर दूध अर्पण करतात. हे केल्यानंतर चमत्कार घडतो, तो असा की घट चक्क पूर्ण भरून जातो.
इतके पाणी ओतून सुद्धा घट भरत नाही, तर मग हे पाणी नेमके जाते कुठे याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकही तिथे उपस्थित असतात. पण कोणालाही आजपर्यंत हे कोडे काही उलगडलेले नाही.
गावकऱ्यांच्या मनात याबद्दल पिढ्यानपिढ्या एक दंतकथा चालत आलेली आहे. ती अशी की एकदा ८०० वर्षांपूर्वी या मंदिराच्या निर्मितीच्याही पूर्वी त्या गावात बाबरा नावाच्या एका राक्षसाने थैमान घातले होते. लोकांच्या हत्या करणे, जनावरे मारुन खाणे, रोग पसरवणे, घरे उद्धवस्त करणे ही त्याची नित्याची कामे होती.
लोकांनी या राक्षसापासून सुटका मिळावी म्हणून शितलामातेचे ध्यान केले. देवीने प्रगट होऊन या राक्षसाचा वध केला. आपल्यात प्राण सोडत असलेल्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची प्रथा आहे. असे म्हणतात प्राण त्यागताना कोणी पाणी पाजले तर आत्म्याला तृप्ती मिळते.
बाबराने देवीला शेवटची इच्छा म्हणून असेच एक दान मागितले, की त्याच्या मृत्यूनंतरही माझ्या आत्म्याच्या तृप्तीसाठी गावकऱ्यांनी त्याला जल अर्पण करावे.
देवीने, बाबराची ही इच्छा तथास्तु म्हणून मान्य केली आणि तेव्हापासूनच देवीच्या मंदिराचे निर्माण करून देवीसमोर एक घट बसवण्यात आला. लोकांच्या म्हणण्यानुसार राक्षसाने पाणी अर्पण करण्यास सांगितले होते, म्हणूनच कितीही पाणी टाकले तरी घट भरत नाही. कारण तो राक्षस ते पाणी पिऊन टाकतो. पण ज्या क्षणी दुधाचा त्या घटाला स्पर्श होतो, त्याक्षणी तो घट भरतो. कारण राक्षसाला दूध नको असते.
जो घट हजारो कलश पाणी ओतूनही भरत नाही, तो घट केवळ एक कलश दूध अर्पण केल्याने भरून जातो. त्यामुळे सगळ्यांचे पाणी अर्पण करुन झाले की पुरोहित एक कलश दूध अर्पण करून हा घट भरतात आणि त्यावर पुढील वर्षापर्यंत झाकण ठेवण्यात येते.
===
हे ही वाचा – या मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, नाहीतर…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.