' संजीवनी आणताना इथे थांबले होते हनुमान… आजही दिसतात त्यांच्या पाऊलखुणा…!! – InMarathi

संजीवनी आणताना इथे थांबले होते हनुमान… आजही दिसतात त्यांच्या पाऊलखुणा…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखल्या जणाऱ्या श्री हनुमानाच्या अनेक कथा आपण ऐकून आहोत. अगदी लहान वयात सूर्याला आंबा समजून खायला निघणे ते समुद्र लांघून घेतलेली सीतामाईंची भेट अशा अनेक रोमांचक कथा आपण ऐकल्या आहेत.

हनुमान हे भगवान शंकराचे अंश मानले जातात. ते सूर्यदेवांचे शिष्य, कपिक्षेत्र नरेश केसरीचे पुत्र व पवन देवाचे धर्मपुत्र होते. त्यांच्या स्तूती आजही गायल्या जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

भीमरूपी, महारुद्र, वज्र हनुमान मारुती, महाबळी अशा अनेक नावांनी भक्त आजही त्यांची मनोभावे सेवा करतात. पुराणानुसार जगातील सप्त चिरंजीवांपैकी एक श्री हनुमान आहेत.

 

chiranjiv hanuman inmarathi

 

आजही मेहेंदीपूर बालाजी सारखी अनेक हनुमानाची अलौकिक मंदिरं भारतात आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू पूजेसाठी जातात. यामागचं कारण असं की आजही श्री हनुमानाचा तिथे प्रत्यक्ष वास आहे असं म्हटलं जातं.

असंही म्हणतात की जिथे रामराक्षास्तोत्र, रामायण, अखंड रामायण पठाण होतं तिथे आजही ते आपल्या प्रभूंची स्तुती ऐकायला अदृश्य रूपाने प्रगट होतात. आज श्री हनुमानाच्या अनेक अशाच कहाण्यांपैकी एक कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

===

हे ही वाचा – हनुमानाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या या तळ्याची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे

===

तुम्हाला ती गोष्ट ठाऊकच असेल, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांचे धाकटे बंधू लक्ष्मण घायाळ होऊन मूर्च्छित झालेले असताना, श्री हनुमान त्यांच्यासाठी संजीवनी आणायला थेट हिमालयात गेले. येताना त्यांनी थेट द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला…

या लांबच्या प्रवासात, असे काही प्रसंग आले जेव्हा त्यांना थांबणं भाग पडलं. परतीच्या वाटेवर एकदा भरताने अडवल्यामुळे आणि एकदा हिमालयाकडे जाताना जाखू पर्वतावर ते थांबले होते.

या जाखू पर्वतावर आजही हनुमानजी थांबल्याच्या पाऊलखुणा आहेत. जगभरातून भक्त तिथे दर्शनास येत असतात, आणि तिथे आलेल्या प्रत्येकाची मनोभावे मागितलेली इच्छा पूर्ण होते.

 

jakhu hanuman temple inmarathi

 

संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालयाकडे आकाशमार्गाने जात असताना, एका पर्वतावर त्यांना यक्ष ऋषी तपश्चर्या करताना दिसले. विश्रामासाठी आणि यक्ष ऋषींकडून संजीवनीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, द्रोणागिरीवर पोहचून उगाच आपली तारांबळ नको म्हणून हनुमान त्या पर्वतावर उतरले.

माहिती प्राप्त झाल्यावर त्यांनी यक्ष ऋषींना ‘परतताना आपण इथूनच जाऊ’ असे आश्वासन दिले आणि आपली वाट बघण्यास सांगितले.

प्रत्येक मनुष्याला ज्याप्रमाणे जीवनात आपले कोणतेही कार्य पूर्ण करण्याआधी परीक्षा द्यावी लागते, अनेक अडथळे पार करावे लागतात, तसेच मनुष्याचा अवतार घेतलेल्या देवांना सुद्धा करणे भाग होते. ते सुद्धा कर्मचक्रातुन स्वतःला सोडवू शकले नाहीत.

वाटेत अनेक अडथळे पार करत श्री हनुमान आपले लक्ष गाठणार इतक्यात कालनेमी नामक राक्षसाशी त्यांचा सामना झाला. त्या राक्षसाशी युद्ध करून, हनुमानाने त्याला पराजित केलं. पण त्यांच्या अमूल्य वेळ या कामात वाया गेला. त्यामुळे त्यांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून एका वेगळ्या आणि जवळच्या मार्गाने परतीचा प्रवास करायचं ठरवलं.

 

hanuman dronagiri inmarathi

===

हे ही वाचा – बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?

===

त्यांनी दिलेले आश्वासन ध्यानात असूनही त्यांना असं करावं लागलं. कारण लक्ष्मण प्रभूंचे प्राण वाचवण्याची मोठी जबाबदारी त्यांना पार पाडायची होती. ते त्या वेगळ्या मार्गाने लंकेकडे निघून गेले आणि यक्ष ऋषी त्यांची वाट बघत राहिले.

पुढे हनुमान प्रभूंनी यक्ष ऋषींना दर्शन दिले आणि आपण आश्वासन पूर्ण करू शकलो नाही याची खंत व्यक्त केली. श्री हनुमानाच्या द्विधा मनःस्थितीची यक्ष ऋषींना पूर्ण कल्पना होती.

त्यानंतर त्याच ठिकाणी श्री हनुमानाची एक स्वयंभू मूर्ती प्रगट झाली आणि यक्ष ऋषींनी तिथे हनुमानाच्या मंदिराचे निर्मिती केली.

आजही हे मंदिर शिमला पासून २ किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. असं म्हणतात जिथे हनुमंताने आपले चरण ठेवले होते तिथे त्यांच्या पायांचे ठसे उमटले. त्या ठश्यांना संगमरवरच्या दगडाचे आवरण घालून त्यांचे नीट संगोपन केले जात आहे.

आजही भाविक मोठ्या आस्थेने या पाऊलखुणांच्या दर्शनासाठी तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. इथली हनुमानाची मूर्ती १०८ फूट उंच असून शिमल्याच्या बऱ्याचशा परिसरातून आपल्याला ती दिसू शकते.

 

hanuman statue 108 feet jakhu temple inmarathi

 

पुरातत्व विभागाच्या संशोधकांच्या संशोधनानुसार हे मंदिर बरेच जुने आहे. अनेक शतकांचा इतिहास त्याला लाभला आहे. कोणत्याही राजाचा या मंदिराच्या जडणघडणीत, बांधकामात हस्तक्षेप आढळत नसल्यामुळे हे मंदिर त्याहूनही जुनं असल्याचं म्हटलं जातं. अनेक पुराणांनुसार आणि लोककथांनुसार या मंदिराची निर्मिती रामायणाच्या वेळी झाल्याचं समजतं.

हे मंदिर अत्यंत घनदाट वृक्षांच्या सानिध्यात असून, इथे वातावरण खूपच थंड आणि निसर्गरम्य आहे. असं म्हणतात जाव पर्वताचं खरं नाव, यक्ष ऋषींच्या नावावरून पडलं होतं.

पुढे याला यक्ष पर्वत म्हणून ओळखलं जायचं. पण यक्ष शब्दाचा अपभ्रंश होऊन यक्षचं याक, याकचं याकू व याकूचं जाखू पर्वत झालं. आज समस्त विश्वात इथे असलेल्या हनुमान मंदिराला जाखू पर्वत मंदिर म्हणूज ओळखलं जातं.

भारतात असलेल्या अनेक जागृत देवस्थानांपैकी जाखू पर्वत हनुमान मंदिर हे एक देवस्थान आहे. खऱ्या मनाने आणि निर्मळ भक्तीने मागितलेल्या सर्व इच्छा इथे स्वतः हनुमंत प्रभू पूर्ण करतात, असं मानलं जातं.

 

hanuman InMarathi

 

हनुमान जयंती आणि श्री राम नवमीच्या वेळी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मोठी यात्रा देखील भरते. शिमला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे व आपल्या बजेट मध्ये असलेले अनेक लॉज, हॉटेल, धर्मशाळा, तिथे सहज उपलब्ध होतात.

आपणही आपल्या प्रियाजनांबरोबर ह्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या सुंदर मंदिराला अवश्य भेटद्या व तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा, भक्तीचा मनमुराद आनंद घ्या.

===

हे ही वाचा – वाल्मिकींपेक्षाही श्रेष्ठ रामायण हनुमंताने लिहिलं होतं, पण या कारणाने ते नष्ट झालं

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?