जीवनात असं काहीतरी घडलं की आता ती थेट स्मशानभूमीवर करतीये आगळीवेगळी सेवा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या देशात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या देखील खूप वाढत आहे. स्मशानभूमी कमी पडत असून, नातेवाईक आपल्या आप्तांच्या अंतिमसंस्कारासाठी नंबर लावून बसले आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे तर मृत लोकांना स्मशानभूमीपर्यंत न्यायला वाहनांची कमतरता जाणवत आहे, काही लोकांनी तर त्यांच्या मृत झालेल्या स्वकीयांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक बेवारस मृतदेह रुग्णालयात आणि रुग्णालयाबाहेर पडून आहेत.
अशा लोकांसाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने अशा मृत लोकांना शेवटचा सन्मान मिळवून देण्यासाठी एक स्त्री पुढे आली आहे. बेवारस मृतदेहांची हेळसांड न होता मरण पावलेल्या लोकांना स्मशानभूमीपर्यंत पोहचवून त्यांचे अंतिमविधी योग्य पद्धतीने पार पडण्याची जबाबदारी वर्षा वर्मा या महिलेने घेतली आहे.
==
हे ही वाचा : कोरोना योद्ध्यांसाठी या लहानग्या मुलीने जे केलंय ते पाहून थेट व्हाईट हाऊसने दिलीये शाबासकी
==
उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये राहणाऱ्या वर्षा वर्मा या कोरोना महामारीच्या काळात रात्रंदिवस कोरोनाने मृत झालेल्या बेवारस लोकांच्या मृतदेहांवर अंतिमसंस्कार करत आहेत. वर्षा वर्मा आणि त्यांच्या टीमने हे महत्वाचे आणि अतिशय धोकादायक कार्य हाती घेतले आहे.
तीन वर्षांपूर्वी वर्षा यांनी सामाजिक कार्य करण्यासाठी ‘दिव्या सेवा फाउंडेशन’ची स्थापना केली होती. या फाउंडेशनच्या अंतर्गत मोफत हे अंतिमसंस्काराचे कार्य केले जाते. शिवाय त्यांनी ‘एक कोशिश ऐसी भी’ संस्था सुद्धा सुरु केली आहे. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय वर्षा यांचे हे कार्य खूप स्तुत्य आहे.
ज्या काळात लोक एकमेकांच्या जवळ जायला घाबरत आहेत, अशा वेळी वर्षा स्वतःहून पुढे येऊन लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंतिम संस्कारांसाठी मदत करत आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल सांगताना वर्षा म्हणतात, की तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मित्राच्या मृत्यूनंतर अशाप्रकारचे काम करायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे हे कार्य पाहून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. मात्र मागच्या वर्षीपासून त्यांच्या फाउंडेशनचे काम पाहून अनेक लोक स्वतःहून आमच्यासोबत जोडले जात आहेत.
या महामारीच्या काळात आपल्या जवळच्या माणसाला गमावल्यानंतर एकटे वाटत असताना ही संस्था त्यांना मदत करण्यासोबतच भावनिक आधारही देत आहे.
त्यांना परिवाराचा सुद्धा चांगला पाठिंबा मिळाला आहे. त्यांचे पती आणि १४ वर्षाच्या मुलीसोबत त्या राहतात. त्यांचे पती राकेश सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजीनियर असून, वर्ष यांच्या कामाला त्यांचा पूर्ण पाठिंबा असतो.
वर्षा म्हणतात की राकेश त्यांना नेहमीच प्रोत्साहित करतात. त्यांना माझी काळजी वाटते हे खरं असलं, तरी त्यापेक्षा अधिक त्यांना माझ्याविषयी अभिमान आहे.
==
हे ही वाचा : कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे ही आगळीवेगळी भिंत, वाचा
==
वर्षा यांनी त्यांच्या कामासाठी लोक आर्थिक मदत देत आहेत, पण त्यांचे हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना लोकांच्या साहाय्याची गरज आहे. आर्थिक मदतीपेक्षाही जास्त मनुष्यबळ आवश्यक आहे. कोरोनामुळे त्यांचं काम खूप वाढलं आहे. त्यासाठी कोणीही स्वतःहून पुढे येत नाही. कुणी टीमसोबत काम करू इच्छित नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात.
वर्षा आणि त्यांची टीम पीपीई किट सोबतच इतर सर्व काळजी घेऊन हे काम करत आहेत. त्यांना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदतीची मागणी होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्कारामुळे त्यांच्यातील भीती संपुष्टात आली असून, आतापर्यंत त्यांनी २५० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंतिमसंस्कार केले आहेत.
==
हे ही वाचा : कोरोनाबद्दल या एका अघोरी उपायाने शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत; स्वतःला वाचवा!
==
सोबतच वर्षा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील सक्रिय असून, त्या मुलींना सेल्फ डिफेन्सचे आणि ज्यूडोचे ट्रेनिंग देतात.
खरंच वर्षा वर्मा सारख्या लोकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्या सर्वांकडून अशा लोकांना मानाचा सलाम.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.