सिमेंट काँक्रिट नव्हे तर चक्क प्लास्टिकचे रस्ते बांधले आहेत ते पण भारतातील या शहरात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्लास्टिक सहज मिळणारा आणि सहज विघटन न होणारा पदार्थ. मागे बातमी आलेली की प्लास्टिकचा कचरा आता माऊंट एव्हरेस्ट वर सुद्धा मिळायला लागला आहे.
गिर्यारोहणासाठी जाणारे गिर्यारोहक तिथेच कचरा सोडून परत येण्याचे प्रमाण वाढले आहे.गिर्यारोहण करणाऱ्या एका सामाजिक संस्थेने तब्बल १.५ टन प्लास्टिकचा कचरा आपल्या सोबत पायथ्याशी आणला होता.
प्लास्टिकने समुद्राचं तळ तर गाठलंच होत. आता पर्वताचे शिखर पण गाठायला सुरवात केली, अस म्हणायला वावगे ठरणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – पावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…
–
प्लास्टिकचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसे त्याचे दुष्परिणाम पण दिसायला लागले आहेत. मुंबई-ठाणे-डोंबिवली सारख्या शहरात तुमचं वास्तव्य असेल तर पावसाळ्यात होणारी परिस्थिती वेगळी सांगायला नको. तर या प्लास्टिकची विल्हेवाट करायची तरी कशी.?
मिशन मंगल चित्रपटात मंगल यानाचा थोडाफार भाग हा समुद्रातल्या टाकाऊ प्लास्टिक पासून बनवलेलं आपण पाहिलं होतं.पण ते एकूण टाकाऊ प्लास्टिकच्या किंचित भागापासून बनलेलं होत.शिवाय त्याची प्रोसेसिंगची प्रक्रिया सुद्धा किचकट आणि महाग आहे.
मग आता नेमकं करायचं तरी काय.?
शाळेत असताना टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पने आपण काही न काही तयार करून मार्क मिळवले असतील. इंजिनिअरिंगच्या कित्येक विद्यार्थ्यांनी फायनल इयर प्रोजेक्ट मध्ये प्लास्टिक पासून पेव्हर ब्लॉक,विटा सारख्या संकल्पना गुण मिळवायला मांडले. पण त्या संकल्पना प्रत्यक्षात किती उतरले हा वेगळा चर्चेचा विषय ठरेल.
या सगळ्याला छेद दिला तो तामिळनाडूच्या मदुराई येथील थियागराजर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर राजगोपाल वसुदेवन यांनी.
त्यांनी संशोधन करून चक्क प्लास्टिक पासून डांबर स्वरूप पदार्थ तयार करून शेकडो किलोमीटरचे रस्ते तयार केले आहेत. आणि विशेष म्हणजे वसुदेवन यांच्या या प्रयत्नामुळे भारत प्लास्टिक पासून रस्ते निर्माण करणारा जगातला तिसरा देश बनला.
वसुदेवन यांनी या आपल्या संशोधनाचे यशस्वी प्रयोग आपल्या कॉलेज कॅम्पस मध्येच केले होते. कॅम्पस मधले जवळपास रस्ते हे या प्लास्टिकच्या डांबर पासून तयार केले गेले.एवढंच नव्हे तर त्या रस्त्याचे खराब होऊन डागडुजी करण्याचे प्रमाण सुद्धा अर्ध्या वर आले.
प्लास्टिक असल्याने त्याच्यात पाणी झिरपून ते खराब होण्याचे प्रमाण शून्य झाले.म्हणून हे रस्ते जास्त टिकाऊ सिद्ध झाले.
वसुदेवन यांनी २००२ पासून आपल्या या प्रयोगाला मूर्त स्वरूप दिले.आणि जवळपास पूर्ण तामिळनाडू आणि त्याच्या शेजारच्या राज्यांनी त्यांचं हे तंत्रज्ञान अवलंबून आपापल्या क्षेत्रात प्लास्टिक पासून रस्ते निर्मितीला सुरवात केली. अन वसुदेवन हे भारताचे ‘प्लास्टिक मॅन’ म्हणून नावारूपाला आले.
वसुदेवन यांचे प्लास्टिक डांबर नेमके आहे तरी काय.?
प्लास्टिकच्या तुकड्याचे दीड ते अडीच एमएम एवढे बारीक तुकडे केले जाते.नंतर ग्रॅनाईटला एका विशिष्ट तापमानात गरम करून त्यामध्ये हे प्लास्टिक चे तुकडे टाकले जातात.गरम असलेल्या ग्रॅनाईट वर हे प्लास्टिकचे तुकडे पडताच ते चटकन वितळून एक थर तयार होतो.शिवाय बिटूमेन या खनिजाचा वापर करून तो प्लास्टिकचा थर अजून मजबूत केला जातो.
पुढे रस्ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खडीवर या प्लास्टिक डांबरचा कोट दिला जातो आणि ती प्लास्टिक कोटेड खडी थेट रस्ते बांधायला उपयोगात आणली जाते.
कालांतराने मदुराईचे रस्ते हे वसुदेवन यांच्या प्लास्टिक डांबरच्या साहाय्याने तयार होऊ लागले आणि बघता बघता हजारो किलोमीटरचा टप्पा हा या प्लास्टिक डांबरच्या रस्त्याने गाठला. प्लास्टिक रस्त्याचे आर्थिक गणित जेव्हा मांडले गेले तेव्हा तर प्रशासनाने सुद्धा तोंडात बोट घातली होती.
–
हे ही वाचा – १७ वर्ष जिद्द आणि चिकाटीने लढून, माणसाने ‘निसर्गावर’ मिळवलेल्या विजयाची साक्ष!
–
पावणे चार मीटर रुंद आणि एक किलोमीटर लांब एवढा रस्ता तयार करण्यासाठी तब्बल एक टन प्लास्टिक वापरले गेले.म्हणजे जवळपास १० लाख प्लास्टिकच्या पिशव्या.आणि तेवढ्यासाठी १ टन बिटूमेन वापरले गेले. एक टन बिटूमेनची किंमत ५० हजार तर एक टन प्लास्टिकची किंमत ही ५ हजार एवढी होती.
एकूणच पावणे चार मीटर रुंद आणि एक किलोमीटर लांब रस्ता बनवायला फक्त ५५ हजार रुपयांचे मटेरियल लागले होते.
आता विचार करा आपल्या गल्लीतल्या जवळपास २००-२५० मीटर रस्त्यासाठी लाख भरचं कॉन्ट्रॅक्ट हे दिल जात.त्यामानाने हे प्लास्टिकचे रस्ते आर्थिकदृष्ट्या किती यशस्वी आहे. मदुराई मधल्या रस्त्यांना मागच्या पाच वर्षात डागडुजीची गरज अजून तरी लागलेली नाही. यावरून हे रस्ते किती टिकाऊ आहेत याची कल्पना येईल.
वसुदेवन यांच्या पर्यावरणाच्या क्षेत्रात दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचा भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव केला आहे. मदुराई मधले रस्ते प्लास्टिकचे होत गेले तसे दक्षिणेतले एक एक शहर हे प्लास्टिक पासून तयार होत गेले.
महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी सुद्धा वसुदेवन यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते निर्मितीच्या प्रयोगावर काम सुरू केले आहे. प्लास्टिकचा वापर जसा वाढत आहे तसा त्याचा निचरा व्हायचे मार्ग सुद्धा शोधले गेले पाहिजे.
प्रोफेसर वसुदेवन हे या बाबतीत अग्रस्थानी असतील हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.