महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“प्राणीमात्रांवर दया करा” हे वाक्य आपण खूपदा वाचतो. कित्येक जण हे साध्य करण्यासाठी घरात मांजर, कुत्रा वगैरे पाळत असतात आणि त्या प्राण्याला घरातील नवीन सदस्य असल्याचा दर्जा देतांना आपण बघत असतो.
प्राण्यांचं प्रेम हे आपल्या बॉलीवूडच्या सिनेमातून सुद्धा आपण बघितलं आहे. त्यातील काही लोकप्रिय उदाहरण सांगायचे तर, ‘कबुतर जा…’ सारखं गाणं असेल जिथे कबुतरने एका पोस्टमनचं काम केलं होतं.
‘तेरी मेहेरबानीया’ मध्ये एका कुत्र्याने हिरो जॅकी श्रॉफ ला जगण्यासाठी, व्हिलन ला शिक्षा देण्यासाठी कुत्र्याने मदत केली होती.
‘मख्खी’ नावाच्या दक्षिणेच्या सिनेमात तर एक माशी हिरो आहे, जी व्हिलनला शेवटपर्यंत हैराण करून सोडते. पण एखाद्या प्राण्याने युद्धात योगदान दिल्याचं आपण कधी ऐकलं, बघितलं नसेल.
असं प्रत्यक्षात घडलं आहे. ‘वोजटेक’ नावाच्या एका अस्वलाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या सैन्यात सामील होऊन आपला सहभाग नोंदवला होता. इटली मध्ये लढत असताना या अस्वलाने यद्धभूमीवर सौनिकांना युद्धसामुग्री, अन्नपदार्थ पुरवण्याचं काम सुद्धा केलं होतं.
===
हे ही वाचा – नाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा
===
१९४२ ची ही गोष्ट आहे. आपल्या कंपूमध्ये एक गुप्तहेर आला आहे हे सुद्धा वोजटेकने पोलंडच्या सैन्याला सांगितलं होतं.
कुठे सापडला होता ‘वोजटेक’?
१९४१ मध्ये पोलंडच्या काही सैनिकांना रशियाने जेरबंद केलं होतं. जर्मनीने लक्ष घातल्यानंतर पोलंडच्या सैनिकांना रशियाने सोडलं होतं. हे सैनिक जेव्हा युरोपला परतत होते तेव्हा ते आखाती देशातून जात होते.
इराणमधून जात असतांना पोलंडच्या सैनिकांना ‘वोजटेक’ हे अस्वल सापडलं होतं. त्यांना असं कळलं होतं की, त्या अस्वलाच्या आईची शिकार करण्यात आली होती.
वोजटेकला तेव्हापासून पोलंडच्या २२ व्या ‘आर्टिलरी सप्लाय डिव्हिजन’ म्हणजेच युद्धसामुग्री सेवा पुरवण्याच्या काम करण्यासाठी सैन्यात भरती करण्यात आलं होतं. इराणमधून इजिप्तला जातांना सुद्धा वोजटेकने पोलंडच्या सैनिकांची साथ सोडली नाही.
१९४३ मध्ये पोलंडच्या सैनिकांची युरोपच्या जहाजात बसायची वेळ आली. सर्व सैनिकांना तोपर्यंत वोजटेकची इतकी सवय झाली होती की, त्यांना हे अस्वल आपल्या सोबतच असावं असं वाटत होतं.
सैनिकांसोबत अस्वल घेऊन जाण्यासाठी एक अट होती की, वोजटेक हा सैनिक नव्हता.
ही अट पूर्ण करण्यासाठी पोलंडच्या सैनिकांनी वोजटेकला एक सैनिक क्रमांक दिला आणि त्याच्या नावाचं ‘वेतन पुस्तक’ सुद्धा तयार करून घेतलं आणि मग त्यांना ‘वोजटेक’ला आपल्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती.
‘वोजटेक’ ची काळजी कोणी घेतली ?
कोणत्याही प्राण्याला सांभाळणं हे सोपं नसतं. पोलंडच्या सैनिकांनी वोजटेकला सांभाळण्यासाठी त्याची एखाद्या लहान बाळासारखी काळजी घेतली. वोजटेकला दुधाची बाटली देणे, त्याच्या सोबत खेळणे अशाप्रकारे पोलीश सौनिकांनी त्याची एखाद्या पालका प्रमाणे काळजी घेतली.
‘वोजटेक’ या नावाचा अर्थ ‘आनंदी सैनिक’ असा होतो. त्यामुळे हे नाव त्या अस्वलाला देण्यात आलं होतं.
वोजटेकच्या कथेवर १९८२ मध्ये ‘द स्नोमॅन’ हा ऍनिमेशन सिनेमासुद्धा तयार करण्यात आला होता. या सिनेमाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. ब्रिटिश टेलिव्हिजन वर हा सिनेमा दरवर्षी ख्रिसमसच्या दिवशी दाखवला जातो.
२०११ मध्ये हॉलीवूडच्या हार्वी नावाच्या दिगदर्शकाने ‘अ बेअर नेम वोजटेक’ हा सिनेमा तयार केला होता. या सिनेमासाठी पोलंडच्या सैनिकांनी सुद्धा अर्थसहाय्य केलं होतं.
वोजटेकला लावलेल्या माणसांच्या सवयी :
इजिप्त मध्ये असतांना उष्ण वातावरणामुळे वोजटेकला शीतपेय पाजण्यात आले होते. काही दिवसांतच, ‘वोजटेक’ इतका माणसाळला होता की, पोलंडच्या सैनिकांनी त्याला माणसांप्रमाणे सिगारेट ओढण्याची आणि दारू पिण्याची सवय सुद्धा लावली होती.
युद्धभूमीवर कमी तापमानात राहण्यासाठी वोजटेकला पहिल्यांदा दारू पाजण्यात आली होती. काही सैनिकांनी असं संगीतलं होतं की, “वोजटेक हा एका वेळी एक दारूची बाटली सहज संपवून टाकायचा. “
४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं. ३५२२ हा त्याचा सैनिक क्रमांक होता. माणसांसोबत छान जुळवून घेणाऱ्या वोजटेकचं सैन्यातील इतर पाळलेल्या अस्वल आणि माकडांसोबत अजिबात पटायचं नाही.
सैनिकांसाठी मात्र तो त्यांच्या घरातील सदस्यांसारखा झाला होता. वोजटेक हा सर्वांच्या हसायचं कारण होता. घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या मानसिकतेसाठी असा प्राणी, पक्षी हा आवश्यक असतो असं काही सैनिकांचं मत होतं.
ब्रिटिश सैनिकांना सुद्धा ‘वोजटेक’ या सहा फूट उंच अस्वलाला युद्ध सामग्री, हत्यारं घेऊन पोलंड सौनिकांकडे जातांना बघून नेहमीच आश्चर्य वाटायचं.
===
हे ही वाचा – कुत्र्यावरून युद्ध? कल्पनाविलास वाटेल, पण हा आहे अक्षरशः खरा इतिहास…! वाचाच
===
वोजटेकच्या पोलंड च्या सैन्याला दिलेल्या योगदानाचा मान राखून पोलंड मधील ‘क्रिको’ या ठिकाणी त्याची एक प्रतिकात्मक मूर्ती सुद्धा उभारण्यात आली आहे.
वोजटेकचा युद्धातील सहभाग :
मोंन्टे कसीनोच्या लढाईत वोजटेकला युद्धभूमीवर बंदुकीच्या गोळ्या घेऊन पाठवलं जायचं. तो स्वतःला वाचवत बरोबर सांगितलेल्या सैनिकाकडे जायचा आणि बंदुकीत गोळ्या लोड करेपर्यंत तिथेच थांबायचा आणि रिकामे झालेले प्लास्टिकचे क्रेट्स परत जागेवर नेऊन ठेवायचा.
१९४५ मध्ये इटली मधील ‘बोलगाना’ या शहरात झालेल्या युद्धात वोजटेकने फक्त बंदूक चालवण्याचं काम सोडून सगळे काम केले होते.
वोजटेकच्या कामाचा व्यवस्थीतपणा हा माणसांना लाजवणारा होता. पोलंडच्या सिनिकांनी त्याला हिरो मानून त्याचा फोटो सैन्याच्या चिन्हावर लावण्याचा निर्णय घेतला होता.
वोजटेकचं निवृत्ती नंतरचं आयुष्य :
पोलंडच्या ज्या युनिटने वोजटेकची इतकी काळजी घेतली त्यांना स्कॉटलंडला पाठवण्याची योजना त्यांच्या सरकारने केली होती. त्यावेळी पोलंडच्या सैनिकांनी वोजटेकला एडिनबर्गच्या प्राणी संग्रहालयात नेऊन सोडलं होतं.
वोजटेकला लहानपणी खेळवणारे सैनिक हे त्याला एडिनबर्गच्या प्राणी संग्रहालयात सुद्धा भेटायला जायचे. १९६३ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी वोजटेकचा मृत्यू झाला.
‘नरेब्सकी’ या पोलंड च्या सैनिकाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “वोजटेकसोबत माझं नातं इतकं दृढ झालं होतं की तो मला मोठ्या भावासारखा वाटायचा. मी त्याला कधीच विसरू शकणार नाही.”
राजेश खन्ना यांचा ‘हाथी मेरे साथी’ हा एक सिनेमा आपण काही वर्षांपूर्वी बघितला आहे. हत्तीने या सिनेमात दाखवल्याप्रमाणेच किंबहुना त्याहून अधिक योगदान वोजटेक या अस्वलाने प्रत्यक्ष आयुष्यात देऊन प्राण्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं तर ते काय करू शकतात हे दाखवून दिलं आहे.
आपणही त्यांची काळजी घेऊया, नाही तर पुढच्या पिढीला प्राणी फक्त जंगल बुकसारख्या कार्टूनमध्येच बघायला मिळतील.
===
हे ही वाचा – मालकाच्या निष्ठेखातर थेट मुघलांना भिडणाऱ्या इमानदार कुत्र्याची शौर्यगाथा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.