' ‘फॅशन स्टेटमेंट’ असणारा काळा चहा कोरोना काळात ठरू शकतो महत्त्वपूर्ण…. – InMarathi

‘फॅशन स्टेटमेंट’ असणारा काळा चहा कोरोना काळात ठरू शकतो महत्त्वपूर्ण….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना काळात आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रोगांपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरून बघितले. हळद पाणी, दूध हळद, औषधी वनस्पतींचा काढा, सगळं करुन बघितलं. काहींच्या चवी फार उत्तम तर काही काढे अगदी बेचव.

सर्दी खोकला होऊ नये यासाठी कोमट पाणी सुद्धा आपण सगळ्यांनी दिवसातून २-४ वेळा नक्कीच घेतलं असेल. पण या सगळ्यांशिवाय आणखी एक असा पदार्थ आहे, जो आपलं आरोग्य सुदृढ ठेऊन आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवू शकते. तो म्हणजे काळा चहा…

 

black tea inmarathi

 

परिस्थिती कशीही असो चहा मात्र नेहमीच आपल्या मदतीला अगदी तत्पर असतो. कोव्हिडच्या काळातही चहा पुन्हा एकदा आपल्या मदतीला आलाय कसं ते आज पण जाणून घेणार आहोत.

काळा चहा कोरोनासारख्या आजारांवर गुणकारी ठरण्यामागची कारणं

तैवान आणि चीनच्या संशोधकांच्या संशोधनावरून असं लक्षात आलं आहे, की चहात असलेल्या polyphenol ह्या अँटिऑक्सिडंट्समुळे, काळा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवून SARS- CoV2 म्हणजेच कोरोना व्हायरस आणि ह्या सारखा श्वसनासंबंधी अजारांवर मात करण्यास उपयुक्त ठरतो आहे.

भारत, श्रीलंका, इथे केलेल्या संशोधनावरून सुद्धा असे आढळून आले आहे, की काळा चहा हा हृदयासाठी उपयुक्त असतो. तो इम्युनिटी बूस्टरसारखं कार्य करतो.

ब्लॅक टी, अर्थातच काळ्या चहाचे हे फायदे इम्युनिटी वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. मग जाणून घेऊया काय आहेत हे फायदे…

 

black tea and kettle inmarathi

===

हे ही वाचा – मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे!

===

१. रक्तातील साखर नियंत्रणात येणे

जेवणानंतर ४५ मिनिटांनी काळ्या चहाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. यासाठी चहात एक लहान चमचा गूळ घालणे अधिक फायदेशीर ठरते. दूध घातलेला चहा फार उपयुक्त नसतो. केवळ काळा चहाच आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो.

 

cutting tea cups inmarathi

 

२. टॅनिन आणि alkylamine

चहात टॅनिन असते ज्यामुळे डायरिया, इन्फ्लुएंझा, डिसेंट्री आणि हिपॅटायटीस ह्यांसारख्या अजारांशी लढण्यास मदत होते. alkylamine मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आपण सुदृढ राहतो.

 

immunity inmarathi

 

३. फिट टाळण्यास मदत

ज्या रुग्णांना फिट येणाचा त्रास आहे, त्यांनी आपल्या आहारात काळ्या चहाचा समावेश करून घ्यायलाच हवा. काळ्या चहात असलेल्या कंपाउंड्समुळे, फिट आणि शरीर बधिर करणारे इतर आजार टाळले जाऊ शकतात.

 

fits inmarathi

 

४. हृदयविकारांवर उपयुक्त

काळ्या चहामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्तदाब सुरळीत होतो. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनी दर चार तासाच्या अंतराने १ कप, असे दिवसातून ३ कप काळ्या चहाचे सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.

 

heart-attack-inmarathi

===

हे ही वाचा – चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय…थांबा हे गंभीर परिणाम आधी वाचाच!

===

५. पचन सुधारते

काळा चहा आपल्या शरीरात, पचनासाठी उपयुक्त असलेले बॅक्टरीयाना वाढवण्यास मदत करतो. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि  अपचनामुळे होणारे समस्त आजार आपल्यापासून लांब राहतात.

पचन हे आपल्या आरोग्याशी थेट संबंधित असून, जितकं पचन चांगलं तितकी आपली तब्येत चांगली राहते आणि आपण सुदृढ राहतो.

 

 

digestion inmarathi

 

६. एकाग्रता वाढते

काळ्या चहात असलेल्या कॅफिनमुळे आपला मेंदू तीक्ष्ण होतो आणि आपली एकाग्रता वाढते. आपण एखादं काम लक्ष विचलित न होता एकाग्रचित्ताने करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी दिवसातून एक कप काळा चहा घ्यायलाच हवा.

 

concentration inmarathi 1

 

७. तरतरी आणणे

जर सतत मरगळ येत असेल, काम करायला स्फूर्ती मिळत नसेल, आळस वाढत असेल तर आपल्या आहारात कळ्या चहाचा समावेश करून पहा. अति झोपेचा त्रास दूर होऊन तरतरी येते व कार्यक्षमता वाढते.

 

sleeping girl InMarathi

 

८. कॅन्सरवर गुणकारी

काळा चहा आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सचा खातमा करून कॅन्सर होण्याच्या संभाव्यतेला मोठ्या प्रमाणात कमी करतो. फक्त चहा गुळ घालून, बिन दुधाचा काळाच घ्यावा, तर फायदा होतो.

 

black tea 1 inmarathi

===

हे ही वाचा – वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….

===

टीप

१. ज्यांना मुळात अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हा काळा चहा घेऊ नये. अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हा चहा घेऊ शकता.

२. रिकाम्या पोटी काळा चहा घेऊ नये. त्यामुळे अॅसिडिटी वाढण्याचा धोका वाढतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?