' उद्धव ठाकरे सरकारच्या “ब्रेक द चेन” नियमांबद्दल कुठे संभ्रम तर कुठे खिल्ली! – InMarathi

उद्धव ठाकरे सरकारच्या “ब्रेक द चेन” नियमांबद्दल कुठे संभ्रम तर कुठे खिल्ली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काल मा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ब्रेक द चेन संदर्भातील नवीन नियमावली जाहीर केली. याआधी सुद्धा निर्बंध लावले होते त्यातच आता ते निर्बंध अधिकच कडक करण्यात आले आहेत. जनमानसात यावर अनेक टीकात्मक प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटर वरून अनेकजण टीका करताना दिसून येते आहे.

लावलेले  निर्बंध योग्य आहेत कि अयोग्य यावर अनेक स्तरावर चर्चा  होताना दिसून येते. खाली असलेल्या लेखामध्ये प्रत्येक नियमावर मुद्देसूद टीका करण्यात आली आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी नेमके काय ट्विट केले आहे पाहुयात ..

 

 

udc 33 inmarathi

 

 

udc 34 inmarathi

 

वरील ट्विटवर करण्यात आलेली टीका :

 

udc inmarathi

 

हे ही वाचा – मा. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याआधी “हा” साधा विचार करून पहावा

 

udc 2 inmarathi

 

udc 3 inmarathi

 

जशी ट्विटरवर टीका होताना दिसून येतेय तसेच फेसबुकवर सुद्धा मोठ्या प्रमाणवर टीका होताना दिसून येतेय. वेदकुमार यांनी मुद्देसूदपणे या नियमावली वर टीका केली आहे वाचा :

 

काल घोषित केलेली भन्नाट नियमावली –

★ सर्व सरकारी कार्यालये १५% उपस्थितीतच काम करतील. पण, मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यालयांसंदर्भात १५% पेक्षा जास्ती कर्मचारी हजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील. इतर सरकारी कार्यालयांसंदर्भात विभागप्रमुख जास्ती उपस्थितीबद्दलचा निर्णय परवानगी घेऊन घेऊ शकतील. काय समजलं?

★ इतर सर्व कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील!! पण आवश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांवर जाणार नाही हे बघावे.

थांबा! अजून झालं नाही. हे करत असताना किमान मनुष्यबळ वापरावे पण हे मनुष्यबळ १०० टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे म्हणे! ही नियमावली वाचताना हा माझ्यासाठी ‘कैना क्या चाते ओ’ मुमेंट होता!!

 

maariage inmarathi

 

★ लग्न करणे अत्यावश्यक सेवेत आहे हे मला कालच समजलं. असो. विवाहसमारंभ २ तासात संपवायचा आहे आणि त्यात २५ लोकं उपस्थित राहू शकतील. २६ किंवा जास्त लोकं आली तर कुटुंबांना ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. म्हणजे लग्नाचं बजेट ५० हजारने वाढवायची तयारी असेल आणि स्वतः गोत्यात येणार नाही एवढी हॉलवाल्याची ‘वर’ सेटिंग असेल तर किती पण लोकं येऊ शकतात.

★ खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील, पण उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. अरे पण जर गाडीत ५०%च प्रवासी असतील तर ते उभे का राहतील?

 

bus inmarathi

 

★ आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासी वाहतूक ‘अपेक्षित’ नाही. नियमावली बनवताना हे ‘अपेक्षा’ ठेवत आहेत! म्हणजे जायचं की नाही, हे तुम्ही ठरवा, जाऊ नये अशी अपेक्षा आहे.. पण ‘जायचं की नाही’ यावर काही नियम नाही.

★ प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापर्यंत प्रवास करू शकता असं म्हटलंय. म्हणजे मुंबईत राहता आणि गावी जाताय तर गावच्या पत्त्याचा आयडी दाखवा आणि जा. परत येताना मुंबईत राहता त्याचं प्रूफ द्या आणि निवांत या. फिरा बोंबलत..

★ बससेवा देणाऱ्यांनी शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा. म्हणजे त्या दोन ठिकाणी जत्राच भरणार. गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक प्रवाशाला त्याच्या घराजवळ, पण बसच्या रूटवर ड्रॉप केलं तर त्यांना त्या थांब्यापर्यंत येताना किंवा थांब्यापासून घरी जाताना टॅक्सी/रिक्षाचा प्रवास किंवा त्यांची पायपीट कमी होईल. तेवढे या रिस्कला कमी एक्सपोज होतील. पण त्यात एकच लोचा आहे – ती वर नमूद केलेली जत्रा कशी भरेल?

★ त्यावर म्हणतात की आगमनाच्या ठिकाणी रॅपिड एनटीजन टेस्ट करायची आहे! खूप चांगली गोष्ट आहे. पण बसमधून येताना पाच-पंचवीस सहप्रवाशांना कोविड देऊन येऊ नये म्हणून ही टेस्ट गाडीत बसायच्या आधी केली पाहिजे की उतरल्यावर? एखादा पॉजिटीव्ह रुग्ण प्रवास संपेपर्यंत अख्खी बसच पॉजिटीव्ह करायचा..

 

train inmarathi

 

★ शासकीय, वैद्यकीय कर्मचारी आणि उपचाराची गरज असलेल्या लोकांनाच लोकल ट्रेन, मोनो आणि मेट्रो ट्रेन व सार्वजनिक वाहतूक वापरता येणार पण लांब पल्ल्याच्या ट्रेन मात्र सुरू राहणार! रिजरव्हेशन सुरू आहे. म्हणजे, तुम्ही युपी, दिल्ली, मद्रास, कलकत्ताला कुठेही जाऊ शकता पण ती गाडी पकडायला मुंबई सेंट्रल/सीएसटी ला जाऊ शकत नाही.. बघा कसं जाता ते तुमचं तुम्ही!

बरं ही नियमावली जनतेसाठी आहे! सत्ताधारी राजकारणी लोकांसाठी कुठलीही नियमावली नाही..

मुंबईत शिवसेनेच्या एका नगसेविकेने भगवती रुग्णालयात केलेल्या राड्यानंतर डॉक्टरांनी सामुहिक राजीनामा दिला! भगवती रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलताना भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडून अपशब्दांचा वापर करत या नगरसेविकेने हुज्जत घातली.

लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांना “तुमच्यासारखे 10 डॉक्टर उभे करेन!” अशी भाषाही त्यांनी वापरली. यांचे मुख्यमंत्री लाईव्ह येऊन ‘डॉक्टर द्या, नर्सेस द्या’ म्हणत हात पसरवत असतात. त्यांनी कृपया यांना संपर्क करावा, उगीच आनंद महिंद्रा यांना कशाला त्रास?

त्यात, यावेळी या नगरसेविकेचा बरोबर आलेल्या व्यक्तीने रुग्णालयामध्ये येऊनही मास्क घातला नव्हता. असले अर्धवट फालतू लोकं यांच्या बरोबर फिरतात, त्यांच्या पावत्या कोणी बनवत नाही. त्यात यांची भाईगिरी अशी की रेकॉर्डिंग करणाऱ्या डॉक्टरांच्या मोबाईल मधले व्हिडीओ देखील त्यांनी डिलीट करायला लावले! हे प्रकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना समजल्यावर त्यांनी तर कमालच केली.

या नगरसेविकेचा ताबडतोब राजीनामा घ्यायचा सोडून तिला एकटीला तंबी दिली तर बिचारीला वाईट वाटू नये म्हणून काहीही चूक नसलेल्या डॉक्टरांना पण ‘समज दिली’!! याला म्हणतात न्याय!

आरोग्य व्यवस्थेच्या नावाने बोंब आहे. एकूणच कारभार दळभद्री आहे. कुठल्याही गोष्टीत नियोजन नाही. आकडे म्हणावे, तर रोज रेकॉर्ड बनवत आहेत आणि पुढच्याच दिवशी तो रेकॉर्ड पुन्हा तोडत आहेत. रेमडेसेवीर साठी लोकांचे हाल करून ठेवलेत.

ऑक्सिजन चा तुटवडा आहेच. लसीकरण हा तर फक्त एक राजकीय विषय बनवून ठेवला आहे. गेले १५ दिवस नुसतं लॉकडाऊन करणार, लॉकडाऊन नाही करणार, निर्बंध टाकणार, नाही टाकणार, निर्बंध कडक करणार हेच चालू होतं या कडकनाथ कोंबड्याचं! 12वी परीक्षा होणार तर 10वीची परीक्षा नाही होणार असले कॉमेडी निर्णय घेतले.

 

oxygen inmarathi

 

गर्दी करू नका म्हणायचं आणि अख्ख्या राज्याला रोज फक्त ३ तासांत एकत्रच बाजारात उतरवायचं. एसटीच्या गाड्यांमध्ये म्हणे आता मालवाहतूक करणार. ऑक्सिजन आणायला ड्रायव्हर मिळत नाहीयेत. अरे यांना काहीच कसं जमत नाहीये? एक निर्णय पण नीट घेता येत नाहीये यांना आणि त्यानंतर असल्या लॉजिक नसलेल्या नियमावल्या काढत आहेत.

जर नियमावलीची गरज कोणाला असेल तर डॉक्टरांना शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या माजोरड्या सत्ताधाऱ्यांसाठी आधी काढा, असंवेदनशील प्रशासनासाठी काढा, संकटाच्या काळात गायब असलेल्या लोकप्रतिनिधींसाठी काढा आणि मंत्रालयात बसलेल्या बाबूंसाठी – ‘एक सरळ, साधी, सोपी, समजेल अशी आणि कॉमन-सेन्स असलेली नियमावली कशी बनवायची’ यावर एक नियमावली काढा..

राज्याचा सत्यानाश करून ठेवलेल्या पनवती सरकारला माझा सविनय आक थू!! बाकी, मास्क लावा, हात धुवा, सोशल डिस्टन्स पाळा आणि गप्प घरी बसा.

===

हे ही वाचा – आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?