महिलांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यात पुढाकार घेणारा सर्वात ‘आनंदी देश’…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
माणसाला जगण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, तर अन्न, वस्त्र आणि निवारा… जेव्हा या सर्व गोष्टी माणसाकडे असतात तेव्हा माणूस आनंदी आहे असे म्हणतो. कारण आनंद हा चेहऱ्यावर झळकत असतो. पण प्रत्येकांची आनंदाची व्याख्या वेगळी असते.
आनंदी लोक तर तुम्ही आजूबाजूला अनेक पाहिले असतील, पण आनंदी देश पहिला आहे का? हो जगात असा एक देश आहे, जो आनंदी देश म्हणून ओळखला जातो.
संयुक्त राष्ट्र संघाने ‘वर्ल्ड हॅपिनेस’ (आनंदी देश) अहवाल जाहीर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण १५६ देशांच्या यादीत भारताला १४४ वे स्थान मिळाले. मात्र सर्वाधिक आनंदी ठरला तो देश म्हणजे फिनलंड होय.
फिनलंड हा जगातील सर्वाधिक आनंदी देश मानला जातो. आता तुम्ही विचार कराल आनंदी देश कशावरून ठरविला जातो. त्यांचे निकष पुढील प्रमाणे आहेत. तेथील लोक कसे जीवन जगतात, तेथे प्रत्येकाला किती स्वातंत्र्य मिळते, आर्थिक स्थिती कशी आहे, सामाजिक व्यवस्था कशी आहे आणि त्या देशांत भ्रष्टाचार किती प्रमाणात आहे. या सर्व गोष्टीवर तो देश किती आनंदी आहे हे ठरविले जाते.
एकेकाळी फिनलंड हा सर्वात गरीब देश होता. पण आज हा देश जगातील सर्वाधिक आनंदी देश बनला आहे. सर्वाधिक सुरक्षित देश, उत्तम प्रशासन असलेला देश, जगातील एक श्रीमंत देश या बरोबरच जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश देखील फिनलंड आहे.
अशाच या आनंदी देशाविषयी काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…
१. तळ्यांचा देश
येथे ७५ टक्के भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि १० टक्के भाग हा जलकुंभ आहे. फिनलंडमध्ये १,८७,८८८ छोटी मोठी तळी आहेत. त्यामुळे या देशाला तळ्यांचा देश म्हणून देखील ओळखले जाते.
२. कॉफी प्रेमी
जगात सर्वाधिक कॉफी ही फिनलंडमध्ये प्यायली जाते. फिनलंडमध्ये जरी तुम्ही दिवसातून ८-१० कप कॉफी प्यायलात तरी ती जास्त मानली जात नाही. तेथे हे देखील सर्वसामान्य आहे.
३. आत्ममग्न नागरिक
येथील नागरिक खूप शांत आहेत, ते तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा ते तुम्हाला फक्त हाय हॅलो करतील आणि लगेच त्यांच्या कामाला लागतील. ते कोणालाच अधिक जवळ देखील करत नाहीत.
४. खाण्याचे शौकीन
फिनलंडच्या नागरिकांना नाष्टा फार महत्वाचा असतो. युरोपातील बाकीच्या देशांत गोड पदार्थत जास्त खाल्ले जातात. पण येथील नागरिक मात्र साधं ब्रेड आणि बटरदेखील आवडीने खातात.
===
हे ही वाचा – जोक्सवर बंदी ते पॉर्नसाठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे १४ विचित्र कायदे!
===
५. दोन बर्थ डे पार्टीज…
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या देशांत कुटुंबासोबत मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्याला सुद्धा तितकंच महत्व दिलं जातं. त्यामुळे येथे वाढदिवसाच्या दोन पार्टीज केल्या जातात. एक मित्रांसोबत आणि दुसरी कुटुंबासोबत.
६. सर्वोत्तम न्याय
येथील न्यायदान पद्धत देखील सर्वात उत्तम मानली जाते. येथील पोलिस सर्वाधिक विश्वासू मानले जातात. ते स्वतासाठी तर कमावतात पण ते शेजाऱ्यांना देखील तितकीच मदत करतात.
अचानक नोकरी गेली किंवा तुमचा अपघात जरी झाला तर तुम्हाला किती चिंता वाटते पण फिनलंडमध्ये असे नाही येथील नागरिक निवांत असतात. कारण येथील सरकारने त्यांची जबाबदारी घेतलेली असते.
७. साक्षरता आणि मातृभाषेवरील प्रेम
येथील शिक्षणपद्धती जगातील एक उत्तम शिक्षण पद्धती आहे. येथे मुक्त शिक्षण पद्धत वापरली जाते. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही शिकू शकता.
येथील शिक्षण पद्धतीमुळे हा देश एक प्रगत देश म्हणून ओळखला जातो. फिनलंड हा जगातील सर्वाधिक साक्षर देश आहे. जो पर्यंत तुम्ही वाचनाची एक विशिष्ट परीक्षा पास होत नाही तो पर्यत तुम्ही येथे लग्न करू शकत नाही. ही पद्धत तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरे आहे.
येथे महिलांना मोफत शिक्षण दिले जाते. येथे शिक्षणाचे अनेक नवीन प्रयोग केले जातात. मुलांच्या हाती फक्त कागद आणि पेन न देता त्यांच्या हाती लगेच की बोर्ड देण्याचे धाडस देखील या देशाने केले आहे.
विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीसाठी हा देश ओळखला जातो. येथील लोक त्यांच्या प्रादेशिक भाषेस खूप अधिक महत्व देतात. येथे तुम्हाला इंग्लिश बोलणारे फार कमी लोक भेटतील.
८. महिलांना मतदानाचा अधिकार
फिनलंड हा युरोपातील पहिला देश आहे जिथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. हा काळ होता विसाव्या शतकातील पहिल्या दशकातला. येथील मंत्री मंडळात देखील मोठ्या प्रमाणात महिला आहेत.
===
हे ही वाचा – भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!
===
९. किमान वेतन कायदा
फीनलंडमध्ये सर्वाधिक चांगला नियम म्हणजे येथे किमान वेतन कायदा आहे. म्हणजे कय तर येथील सरकारने प्रत्येकाला पगाराच्या काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला किमान वेतन मिळते. प्रत्येक व्यक्ती चांगले जीवन जगू शकतो. फिनलंड हा एक श्रीमंत देश आहे. त्यामुळे येथे कोणीही बेघर नाही. साधे जरी असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे घर आहे.
१०. बारमाही थंडी
येथे बाराही महीने थंडी असते. येथे बाराही महीने जवळपास बर्फ असतो. असं असून देखील येथील लोक अजिबात आळशी नाहीत. ते अतिशय मेहनती आहेत. कोणत्याही गोष्टीत येथील लोक हार मानत नाहीत. कष्ट करण्यात अजिबात कमी पडत नाहीत.
येथील लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे येथे प्रती किलोमीटर फक्त अठरा लोक राहतात. येथे बाराही महिने बर्फ असून सुद्धा येथील वातावरण फार सुंदर आहे.
११. नोकिया गावावरून पडलं नाव
फिनलंडमध्ये नोकीया नावाचे एक गाव आहे. या गावाच्या नावावरून मोबाइल कंपनीचे नाव देण्यात आले आहे. जगप्रसिद्ध नोकीया हा ब्रँड छोट्याश्या फीनलंडचा आहे. त्यांना त्यांच्या नोकीया ब्रॅंडचा फार अभिमान आहे.
===
हे ही वाचा – आश्चर्य! पृथ्वीवरच्या या १० ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.