' जगात कुठेही जा, पण तुमच्यातील ‘मराठीपण’ सिद्ध करणाऱ्या या १३ गोष्टी कधीच सोडू नका – InMarathi

जगात कुठेही जा, पण तुमच्यातील ‘मराठीपण’ सिद्ध करणाऱ्या या १३ गोष्टी कधीच सोडू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी माणूस म्हटलं की आपसूकच काही गोष्टी आपोआप मनात येतात. किंवा खरं तर ती मराठी माणसाची एक अगदी पक्की ओळखच आहे म्हणा ना. त्याचं ‘मराठीपण’ सिद्ध होतं, ते याच छोट्या छोट्या खास गोष्टींमधून!

अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’ असा आवाज कानावर पडला की ‘जय’ हा शब्द आपसूक ज्याच्या मुखातून बाहेर पडतो, तो मराठी माणूस… किंवा वडापावचा घमघमाट पसरलेला असेल अशा परिसरात, कितीही घाई-गडबडीत असला तरीही क्षणभर थांबतोच तो मराठी माणूस…

सध्या सुरु असलेल्या IPL मधील उदाहरणं द्यायची झाली, तर केवळ अजिंक्य रहाणे दिल्लीच्या संघात आहे, म्हणून दिल्लीच्या संघाचाही चाहता असतो, तो मराठी माणूस… शर्मा आडनाव असणाऱ्या रोहितचं तोडकंमोडकं मराठी ऐकून ज्याचा उर अभिमानाने फुलून येतो, तो मराठी माणूस…

अशाच या मराठी माणसाची ओळख असणाऱ्या या गोष्टी प्रत्येक मराठी माणसाच्या रोमरोमात भिनलेल्या असतात. जगाच्या पाठीवर कुठेही जायचं ठरवलंत, तरी हे मराठी पण तुम्ही जपलंच पाहिजे…

१. सचोटी

एखाद्या मराठी व्यक्तीवर जगाच्या पाठीवरील कुठलीही व्यक्ती अगदी सहजपणे विश्वास ठेऊ शकते. याचं अगदी साधं आणि स्पष्ट कारण म्हणजे मराठी माणसाचा प्रामाणिक आणि सच्चा स्वभाव!

सचोटीने वागणं, प्रामाणिकपणे काम करणं आणि इमानदारीने मिळणाऱ्या पैशांमधून सुखाचं जीवन जगणं, ही मराठी माणसाची ओळख आहे. ती जपून ठेवणं हे मराठी जनांचं कर्तव्य आहे.

 

baba amte inmarathi

 

२. शिवाजी महाराज

शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी असलेला अभिमान, आदर आणि सन्मानाची भावना ही प्रत्येक मराठी माणसाला आपसूकपणे लाभलेली देणगी आहे.

इतर अनेक गोष्टींवरून मतमतांतरं, मतभेद असणाऱ्या मराठी माणसांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या दैवताबद्दल सारख्याच भावना आहेत. ‘मराठी पण’ जपणारा माणूस महाराजांची तसबीर आपल्या मनात आणि घरात नेहमीच ठेवतो.

 

shivaji mharaj InMarathi 1

 

३. नथ आणि स्त्रियांचा शृंगार

पाचवारी ते नऊवारी असे साड्यांचे विविध प्रकार, निरनिराळे दागदागिने आणि त्यांच्यामुळे स्त्रियांचं जातीचं सौंदर्य सुद्धा अधिक खुलून दिसणं, हे मराठमोळ्या कुटुंबाच्या सणसमारंभांमध्ये नेहमीच पाहायला मिळतं.

या सगळ्यावर कडी करते ती म्हणजे मराठी चेहऱ्यावर खुलून दिसणारी नथ…

 

nath featured inmarathi

 

जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी महाराष्ट्राची ही संस्कृती तर जपायला हवीच.

४. मराठी सण समारंभ

हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाडवा असो, किंवा दिवाळी पहाट… मराठमोळे सण समारंभ ही एक खास ओळख ठरते. नव्या वर्षाची स्वागत यात्रा, गणपती बाप्पाच्या मिरवणुका यामधून जपली जाणारी मराठी संस्कृती आपल्याला जगभरात अनेक ठिकाणी पोचलेली दिसते, ती मराठी माणसांमुळेच…

 

gudi padva inmarathi

===

हे ही वाचा – ही १० पुस्तकं वाचली नाहीत – तर मराठी वाचता येण्याचा काहीच उपयोग नाही!

===

५. काका/मामा/मावशी

आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर करणे, मान ठेवणे ही आपल्याला लहानपणापासून मिळालेली शिकवणूक असते. एखादा रिक्षाचालक असो किंवा बिल्डिंगचा वॉचमन, रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारी एखादी  म्हातारी असो किंवा इतर कुणी, आदराने हाक मारण्याची आपली परंपरा आहे.

 

hritik roshan old man dhoom inmarathi

 

अशा व्यक्तींना आपण काका, मामा, मावशी अशा सख्ख्या नात्यांच्या नावाने संबोधित करतो. ही सवय सुद्धा जपायलाच हवी. केवळ आपण नाही, तर येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांनी…

६. बस काय भावा

मित्रांना वेगवेगळी खास अशी टोपणनावं देणं, आडनावाने हाक मारणं आणि महत्त्वाचं म्हणजे जवळच्या मित्र मैत्रिणींना ‘भावा’ अशी हाक मारणं ही सुद्धा मराठी माणसांची ओळख आहे.

 

 

duniyadari inmarathi

 

७. वडापाव आणि मिसळ

मराठमोळ्या जेवणामध्ये अनेक पदार्थ तुम्हाला दिसतील. अगदी पुराणपोळीपासून ते श्रीखंडापर्यंत विविध गोडधोड पदार्थ, भजी, कोथिंबीर वडी, अळू वडी असे काही चटकदार पदार्थ किंवा विशिष्ट ठिकाणांची खासियत असलेले इतरही अनेक पदार्थ…

या सगळ्यात मराठी माणूस २ गोष्टी अगदी आवडीने आणि चवीचवीने खातो, आणि त्या म्हणजे वडापाव आणि मिसळ… पुणेरी, कोल्हापुरी, असे मिसळीचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. वडापाव म्हणजे तर मराठी माणसाचा जीव की प्राण…

 

vadapav-inmarathi

 

८. चहा

मराठी माणूस पक्का चहाबाज असतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच’ असं मराठीत म्हटलं जातं ते उगाच नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी दिवसातील कुठल्याही वेळी चहा पिण्याची सवय सोडू नका.

 

cutting tea cups inmarathi

===

हे ही वाचा – आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, तर चक्क मराठी माणसामुळे मिळते!

===

९. राष्ट्रप्रेम

आपल्याला आपल्या राज्याबद्दल, मराठी भाषेबद्दल जितकं प्रेम आणि आदर आहे तितकाच तो देशाबद्दल सुद्धा आहे. साधं एखादं भाषण संपल्यावर सुद्धा आपण ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याधी ‘जय हिंद’ म्हणतो, हेदेखील त्याचंच उदाहरण…

 

cm uddhav thackeray inmarathi

 

१०. निसर्गप्रेम

मराठी माणसाचं निसर्गप्रेम हादेखील एक चर्चेचा विषय ठरतो. निसर्गविषयी असलेली प्रेमाची भावना, पक्ष्यांप्रति असलेलं प्रेम हीसुद्धा मराठी माणसाची ओळख आहेच की…

 

sparrow inmarathi

 

११. रंगभूमी

मराठी माणूस म्हणजे नाट्यप्रेमी… नाटक आणि कला यांची आवड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळेच रंगभूमी ही मराठी माणसाची कर्मभूमी सुद्धा आहे.

 

rangbhumi inmarathi

१२. राजकारण आणि क्रिकेटवर चर्चा

राजकारणात सक्रिय असणं आणि क्रिकेट खेळता येणं याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं काही असेल, तर या दोन्ही विषयांवर भरूभरून बोलता येणं. घरच्यांसह, कट्ट्यावर मित्रांसह आणि सोशल मीडियावर सगळीकडे या दोन्ही विषयांवर चर्चा रंगतातच, नाही का…

 

family inmarathi

===

हे ही वाचा – मराठी माणसाने १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेली कंपनी आज आहे तब्बल ७० देशात अग्रेसर!

===

१३. जगप्रसिद्ध मराठी व्यक्तींचा अभिमान

क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर असो, की गानसम्राज्ञी लता मंगेशकर, किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात नाव मिळवणारे जयंत नारळीकर ज्यांनी आपल्या कामगिरीने अवघ्या जगावर छाप पाडली त्यांचा आपल्याला अभिमान वाटतो. महाराष्ट्राची ओळख बनून जातात या व्यक्ती…

 

lata-didi-sachin-inmarathi

 

आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरी अशा या मराठमोळ्या कीर्तिवंतांवर असलेलं आपलं प्रेम कधीही कमी होणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?