पांडवांचं शंकराशी झालेलं युद्ध – महाभारतातील एक अपरिचित पैलू…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हिंदूंचे महाकाव्य म्हणून महाभारत ओळखले जाते. सत्याचा आणि असत्यावर विजय साजरा करणाऱ्या महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्या युद्धाव्यतिरिक्त देखील अनेक घटना आपण लहानपणापासून गोष्टींच्या स्वरूपात ऐकत असतो.
टीव्हीवर देखील आपण यातील अनेक कथा पाहिल्या देखील असतील. मात्र याच महाभारतातील एक महत्वाची पण खूपच कमी लोकांना माहित असलेली एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
==
हे ही वाचा : महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धानंतर पांडव, कौरव इत्यादींचे काय झाले?
==
ही घटना आहे पांडव आणि महादेव यांच्यात झालेल्या युद्धाच्या संदर्भातली… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल महादेव आणि पांडव यांच्या युद्ध कधी झाले?
या घटनेचा उल्लेख महाभारतात आढळतो. भोलेनाथ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महादेवांनी पांडवांसोबत युद्ध केले हे पचवणे जरा अवघड असले तरी सत्य आहे. मुख्य म्हणजे हे युद्ध पांडवांनी सुरु केले होते.
महाभारताचे अंतिम युद्ध हे कौरव आणि पांडवांमध्ये चालू होते. नियमानुसार सूर्यास्तानंतर युद्ध थांबवले जायचे. युद्धाच्या अखेरच्या म्हणजे १८ व्या दिवशी दुर्योधनाने अश्वत्थामाची त्याच्या सेनेचा सेनापती म्हणून निवड केली.
दुर्योधनाला त्याच्या मृत्यूची भीती वाटत होतीच मात्र आपल्या मृत्यूची वाट पाहात असलेल्या दुर्योधनने अश्वत्थामाला सांगितले, ‘मला कोणत्याही परिस्थितीत पाचही पांडवांचे कापलेले शीर पाहायचे आहे.’
अश्वत्थामाने दुर्योधनाला वचन दिले की, तो पांडवांचे शीर कापून आणेल. दुर्योधनला वचन दिल्यानंतर अश्वत्थामाने त्याच्या उरलेल्या सैनिकांना सोबत घेऊन पांडवांच्या हत्येचा कट रचला.
श्रीकृष्णांना माहित होतेच की युद्धाच्या शेवटच्या दिवशी काहीतरी वाईट घडणार आहे. त्यासाठी त्यांनी आधीच भगवान शंकराची स्तुती केली.
‘हे देवा तुम्ही संपूर्ण जगाचे पालनकर्ते आणि संहारकर्ते आहेत. हे भोलेनाथ तुम्ही पांडवांचे रक्षण करावे.’ असे उद्गार श्रीकृष्णाने काढले. महादेव मनापासून केलेल्या स्तुतीने प्रभावित झाले.
ते त्यांच्या नंदी या वाहनावर बसून पांडवांच्या रक्षणासाठी गेले. त्यावेळी सर्व पांडव त्यांच्या शिविराच्या जवळील नदीमध्ये स्नान करत होते. स्नान झाल्यानंतर पांडव त्यांच्या शिविरात गेले. त्यानंतर महादेवांनी त्यांच्या शिविराबाहेर ते पहारा द्यायला सुरुवात केली.
मध्यरात्र झाल्यानंतर अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य हे तिघे पांडवांच्या शिवीराच्या बाहेर आले तर तिथे देवाधी देव महादेव पहारा देत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच शंकराची स्तुती करण्यास सुरुवात केली. त्या तिघांची स्तुती ऐकून महादेव त्यांना प्रसन्न झाले.
त्यानंतर महादेवांनी त्या तिघांना वरदान म्हणून एक तलवार दिली आणि त्यांना पांडवांच्या शिविरात जाण्याची परवानगी देखील दिली. त्यानंतर अश्वत्थामा त्याच्या दोन्ही साथीदारांसोबत पांडवांच्या शिविरात गेला.
तिथे जाऊन त्याने धृष्टद्युम्नसोबत पांडवांच्या पुत्रांचा वध केला. यानंतर ते तिघेही पांडवांचे कापलेले शीर घेऊन परतले. यावेळी शिविरात लपून बसलेल्या पार्षदशुदने या वधाची माहिती पांडवांना दिली.
===
हे ही वाचा : महाभारतातील सर्वात दाहक मृत्यूमागची…जन्मजन्मांतराच्या सूडाची एक कहाणी
===
वधाची बातमी समजताच पांडवांना अतिशय दुःख झाले. शिवाय महादेव असूनही हा नरसंहार कसा झाला? असा प्रश्न देखील त्यांना पडला. महादेवांमुळेच आपल्या पुत्रांची हत्या झाली असा विचार करून रागाने लालबुंद झालेल्या पांडवांनी शंकरांसोबत युद्ध सुरु केले.
पांडवांनी अनेक अस्त्र महादेवांवर सोडली, मात्र ती सर्व अस्त्र भगवान शिवाच्या शरीरात सामावून जात होती. याचे कारण म्हणजे पांडव हे श्रीकृष्णाला शरण गेले होते आणि भगवान शिव हरि भक्तांच्या रक्षेत स्वत: तत्पर असतो.
पांडव श्री कृष्णाचे भक्त असल्यामुळे भगवान शंकरांनी त्यांना क्षमा केली. त्यांचा वध न करता त्यांना शाप दिला, की कलियुगात जन्म घेऊन पांडवांना सर्व पापांची फळे भोगावी लागतील.
श्रीकृष्णांना याबद्दल सर्व माहिती मिळाल्यावर पांडवांसह भगवान शिवाची आराधना करायला सुरुवात केली. पांडवांच्या स्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी पांडवांना वरदान मागायला सांगितले.
त्यावेळी कृष्ण यांनी पुढाकार घेत पांडवांकडून बोलायला सुरुवात केली. श्रीकृष्ण महादेवाला म्हणाले, ‘हे भोलेनाथ पांडवांनी जो अपराध केला आहे, त्यासाठी ते क्षमाप्रार्थी आहेत. त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा करत तुम्ही देलेल्या शापातून बाहेर काढा.’
त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे कृष्ण जेव्हा मी पांडवांना शाप दिला तेव्हा मी माझ्या मायेच्या प्रभावात होतो. मी दिलेला शाप परत घेऊ शकत नाही, मात्र त्यांना उ:शाप देऊन मुक्तीचा मार्ग नक्की सांगू शकतो.
पांडव कलियुगात नक्कीच जन्म घेतील. पांडव त्यांच्या अंशातून कलियुगात जन्म घेतील आणि त्यांचे पाप भोगून मी दिलेल्या शापातून मुक्त होतील.
युधिष्ठिर हा वत्सराजचा मुलगा बनून कलियुगात जन्म घेईल. त्याचे नाव बलखानी असेल आणि तो सिरीश नगरचा राजा असेल. तर भीम बनारसमध्ये वीरानच्या नावाने राज्य करेल.
अर्जुन हा ब्रम्हानंद नावाने जन्म घेईल. ब्रम्हानंद माझा नित्सिम भक्त असेल. नकुलच्या अंशातून कनेकोचचा जन्म होईल हा रत्ना बानोचा पुत्र असेल.
भीमसिंहचा पुत्र म्हणून सहदेव देवसिंहच्या रुपात जन्म घेईल. शिव शंकरांनी दिलेल्या शापातून मुक्तीचा मार्ग दिल्यावर पांडवांनी महादेवांना नमस्कार केला आणि शिव अदृश्य झाले.
==
हे ही वाचा : महाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.