पवारांना घरबसल्या कोव्हिड लस? जनतेच्या ‘या’ संतप्त प्रतिक्रिया समाजमन दर्शवताहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
देशात आणि खासकरून महाराष्ट्रात सध्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सगळीकडेच फार चिंताजनक परिस्थिती असून कोरोना पेशंटचे आकडे तसेच मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे.
पुन्हा गेल्या वर्षीच्या मार्च एप्रिल महिन्यासारखी परिस्थिती होतेय की काय? या संभ्रमात सगळेच पडले आहेत. एकीकडे लसीकरणावर सरकार भर देत आहे आणि एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन जाहीर झाला असून विकेंड पूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे!
निर्बंध कडक करण्याच्या नावाखाली राज्यसरकार सरसकट लॉकडाउन करत आहे असे आरोप विरोधी पक्षाकडून होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री यांनी लाईव्ह येऊन वेगळं सांगितलं आणि प्रत्यक्षात भलतेच नियम लावले जात आहेत असाच सगळ्यांचा सुर आहे.
त्यात उद्योगधंदे ठप्प असल्याने व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न अजून सुटला नसल्याने त्यांच्यातही संभ्रम आहे. शिवाय एकीकडे वाझे प्रकरण, अनिल देशमुख यांचा राजीनामा असे झटके सरकारला बसत आहेत!
===
हे ही वाचा – गेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी
===
या सगळ्या गदारोळात आजही सामान्य माणूस लस मिळेल या आशेवर रोज लसीकरण केंद्राच्या बाहेर लांब रांगेत उभा असलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
काही ठिकाणी लांबच लांब रांगा, काही ठिकाणी लसीचा तुटवडा यामुळे सामान्य माणूस अगदी बेजार झाला आहे. ६ करोड पेक्षा अधिक लोकांचं लसीकरण झालं असलं तरी अजूनही बहुतांश नागरिकांना लसीसाठी बरंच काही झेलावं लागत आहे!
अशातच आज एबीपी माझा या चॅनलच्या फेसबुक पेजवर एक बातमी आली की, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घरीच घेतला आहे! सोबतच त्यांचा लस घेतानाचा फोटोसुद्धा व्हायरल झाला आहे!
मुंबईतल्या जे जे रुग्णालायतल्या एका टीमने पवार यांच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला आहे, नुकतच पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण आरामची गरज असल्याचं सांगितलं आहे!
या बातमीमुळे लोकांना त्यांचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. इथे कित्येक जेष्ठ नागरिक, सामान्य माणूस लसीसाठी ताटकळत रांगेत उभा असताना केवळ एक जेष्ठ नेता म्हणून पवारांना घरी जाऊन लस देणं हे बऱ्याच लोकांना आवडलेलं नाही.
त्यांनी त्यांचा संताप त्यांच्या खोचक मार्मिक कॉमेंट्समधून व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या ह्या पोस्ट वरच्या काही भन्नाट कॉमेंट्स तुमच्यासाठी!
या खालील कॉमेंटमधून भावी पंतप्रधान म्हणून लोकांनी टोला हाणला आहे!
हा फोटो बघून कित्येक सामान्य नागरिकांना वाईट वाटले असून, इतरही सामान्य जेष्ठ नागरिकांना अशीच सुविधा द्यावी असं म्हंटलं आहे!
सरकारच्या भूमिकांवर लोकांना किती राग आहे हे आपल्याला या कॉमेंट्समधून बघायला मिळतं!
===
हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!
===
वाचा हा खोचक टोमणा!
या कॉमेंटमधून जनतेने मीडिया आणि भ्रष्ट सरकारच्या कारभारावर खूप तोंडसुख घेतलं आहे!
या सगळ्या गोंधळातदेखील काही पवारसमर्थकांनी हजेरी लावलीच!
अजित पवारांनी लस घेताना फोटो काढण्याला नौटंकी म्हणून संबोधले होते, आता लोकं त्यांच्याकडे यावरचं उत्तर मागत आहेत!
या एका फोटोमुळे कित्येक जुन्या लोकांनी केलेल्या टीकासुद्धा लोकांना आठवल्या आणि लोकांनी पार धुमाकूळच घातला!
खरंतर शरद पवार यांनी घरी लस का घेतली यामागची कारणं वेगळी असतीलही आणि त्यांचं हे कृत्य योग्य का अयोग्य हे ठरवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.
कोव्हिडच्या संकटामुळे आधीच इतका गदारोळ माजलेला असताना सामान्य लोकांना जर असं काही सोशल मीडियावर दिसलं तर लोकं कॉमेंट करणारच ना, कारण ये पब्लिक है ये सब जानती है!
===
हे ही वाचा – स्वप्नील जोशी “अश्या” अवतारात, वाचक म्हणतात “म्हातारीचा झगा आठवला”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.