' पश्चाताप टाळायचा असेल तर यंदाच्या आर्थिक वर्षात या ८ टिप्स फॉलो करायलाच हव्यात – InMarathi

पश्चाताप टाळायचा असेल तर यंदाच्या आर्थिक वर्षात या ८ टिप्स फॉलो करायलाच हव्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आदल्या रात्री तुम्ही ठरवता, सकाळी लवकर उठायचं, व्यायाम-योगा करायचा, उत्तम नाश्ता करून मग लॅपटॉप घेऊन कामाला लागायचं. त्यानुसार अलार्म पण सेट होतो. अलार्म वाजतो तो स्नुजवर जातो आणि तुम्ही चादरीतच पडून राहता.

थेट तास दोन तास उशिरा उठता,मग नाश्ता करून थेट कामाला बसता. व्यायाम योगा बाजूलाच राहतो. एकूणच आदल्या रात्री जे ठरवलं ते प्रत्यक्षात उतरवायला काही जमलं नाही. स्वयं शिस्त या कॅटेगरीमध्ये सदर उदाहरण येतं.

अशीच एक कॅटेगरी आहे, ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणू शकतो. पैशाच्या बाबतीत १० पैकी ७ लोकांचं गणित हे व्यायामाच्या बाबती सारखंच असतं. एक तारखेला सॅलरी क्रेडिट झाली, की जो आनंद असतो तो सांगून व्यक्त होत नसतो. पण तेच महिन्याच्या ३० तारखेला सॅलरी उडून गेल्यानंतर मात्र आलेलं संकट सांगून संपत नसतं.

मग काय, आहेच क्रेडिट कार्ड आणि अंततः या सगळ्या आर्थिक अडचणींचा फरक पडत असतो थेट ‘इयर एंडिंग’ला.

 

credit card inmarathi

 

खोटं वाटत असेल, तर स्वतःचा जमा खर्च बघून अंदाज लावू शकता. असं म्हणतात की जसा पगार वाढतो तसा इएमआय वाढत जातो. याचं कारण सुद्धा आर्थिक शिस्त नसणं हेच आहे. आर्थिक वर्षात अशा काही सवयी लावून घ्या, ज्यामुळे इयर एंडिंगला मनस्ताप टाळता येईल. तर बघूया त्याच बद्दल विस्ताराने.

१. स्वतःचे बजेट तयार करा

सगळ्या आर्थिक बाबींमध्ये येणारी सगळ्यात सिम्पल गोष्ट. सांगताना सगळेच सांगतात, पण आचरणात क्वचित येणारा विषय. दिसायला सगळ्यात सोप्पी गोष्ट, पण व्यवहारात याची सांगड घालणे म्हणजे सगळ्यात अवघड.

सांगायचं तात्पर्य काय, तर बजेट तयार केलं, म्हणजे होणारा वायफळ खर्च लक्षात येतो. त्यानुसार पैशांचा होणारा अपव्यय लक्षात येतो. यामुळे वायफळ होणारा खर्च कमी करून बचतीमध्ये बदलता येऊ शकतो.

 

saving money InMarathi

 

२. आर्थिक गोल निश्चित करा

आता तुम्ही म्हणाल सेव्हिंग तर करतो आणि हवं ते क्रेडीटच्या बेसवर घेण्या इतपत कमाई सुद्धा आहे. तसं असेलही, पण क्रेडीटच्या बेसवर गोष्ट घेणे म्हणजे नकळत आपण कर्जात असतो हे वेगळं सांगायला नको.

सेव्हिंग ही एक शिस्त असावी. सेविंगचे तीन प्रकार आहेत असं म्हणू शकतो. लहान मध्यम आणि मोठे.

लहानमध्ये तुमचं महागडा फोन, बाईक घेणं किंवा तत्सम गोष्टी येतात. जे कमी वेळेत तुम्ही साध्य करू शकता. मध्यम प्रकारामध्ये कार घेणं, लग्न करणं किंवा परदेश सहल या गोष्टी येतात. चार पाच वर्षं योग्य पद्धतीने केलेलं सेव्हिंग हे गोल्स साध्य करण्यात कारणीभूत होतात.

मोठे गोल्स म्हणजे तुमचं घर घेणं, डेस्टिनेशन वेडिंग, प्रॉपर्टी विकत घेणं, बिझनेस करणं अशा सारख्या गोष्टी. या सगळ्याला भरपूर आर्थिक पाठबळ गरजेचं आहे. पुन्हा विषय येतो तो कर्जाचा. कर्ज हे थेट तुमच्या आर्थिक व्यवहार, तुमचे टार्गेट यावर परिणाम करत असते.

 

loan-inmarathi

 

३. योग्य गुंतवणूक

सहसा पगारदारांची गुंतवणूक म्हणजे सेफ गुंतवणूक असते. एलआयसी, पीएफ, पोस्टाचे सर्टिफिकेट आणि इतर एफडी वगैरे. काही रिस्क घेऊन म्युच्युअल फंड, एसआयपी आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करतात.

ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ही गुंतवणूक होत असते. जास्त रिटर्न आणि सेफ रिटर्न हे क्रिकेटच्या आक्रमक बॅटिंग आणि डिफेनसिव्ह बॅटिंग सारखंच आहे. काही सेहवाग असतात तर काही द्रविड.

सांगायचं तात्पर्य हे, की गुंतवणूक करताना काळ, वेळ, आणि रिटर्न बघूनच करावी. ज्याने नुकसान न होता फायदा जास्तीत जास्त होईल.

 

SIP fd featured inmarathi

===

हे ही वाचा – खिशात पैसे टिकत नाहीत? या ‘हमखास’ यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा

===

४. जास्तीत जास्त टॅक्स सेव्हिंग

आपल्या सॅलरी स्लॅबनुसार आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असतो. स्लॅब कितीही मोठा असला तरी गुंतवणूक, कर्ज आणि इतर योजनांच्या माध्यमातून आपल्याला टॅक्सबद्दलचा फायदा हे घेता येतो.

लाईफ इन्शुरन्स, पॉलिसी, एफडी गुंतवणूक, इतर सगळ्या प्रकारच्या गुंतवणूक, कर्ज हे सगळे टॅक्समधील सवलतीसाठी उत्तम असा पर्याय आहे.

यामध्ये तुम्हाला मदत होईल वरच्या तिन्ही मुद्द्यांची. बजेट ठरवून खर्च केलात तर सेव्हिंगसाठी पैसा उपलब्ध होईल, गोल फिक्स केलात तर योग्य ठिकाणी तुमचा हेतू निर्माण होईल. पैसा गुंतवणूक करायला आणि त्यानुसार पैसा कशात इन्व्हेस्ट करायचा हे ही कळेल.

 

investment inmarathi

 

५. योग्य इन्शुरन्सची निवड

इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा, की तो आपल्या आरोग्या संबंधित येणाऱ्या तक्रारींमध्ये साहाय्य करतो. काही इन्शुरन्स हे मृत्यू नंतर रिटर्न सुद्धा देतात. अनेकदा काहीजण याबाबतीत गोंधळलेले असतात, की लाईफ इन्शुरन्स घ्यावा की नाही.

मुळात घरच्या सगळ्या सदस्यांचा यात सहभाग होत असल्याने इन्शुरन्स घ्यायला हवा, ही साधारण विचारधारा असते. आजार हा सांगून येत नसतो. टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस सारखे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

 

health-insurance-form-InMarathi

 

एखादी व्यक्ती आजारी पडली तर शारीरिक, मानसिक त्रास होतोच शिवाय याचा थेट परिणाम हा खिशावर होत असतो. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी इन्शुरन्स इज मस्ट!

६. सॅलरी स्ट्रक्चर बद्दल योग्य विचार

प्रत्येक कंपनीमध्ये सिटीसी नावाचा प्रकार असतो. आणि त्याचे घटक हे कंपनीनुरुप बदलत असतात. एखादी कंपनी अलाउन्स आणि बोनस सिटीसीमध्ये गृहीत धरून देते, तर एखादी कंपनी ते सिटीसीच्या बाहेर ठेवते.

सरकारी पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांकडून टॅक्समध्ये किमान सहभाग असावं एवढंच अपेक्षित असतं. त्यामुळे तुमच्या ‘बेसिक पे’च्या हिशोबाने तुमचं पीएफ आणि इएसआयसी हे कापून घेतलं जातं.

तसेच तुमच्या इन्कम म्हणजेच पगारानुसार तुम्हाला टॅक्स लावला जात असतो. तर एचआर पॉलिसीनुसार टॅक्स न बसणाऱ्या घटकामध्ये वाढ करून घ्यावी आणि ज्यावर टॅक्स बसतो तो घटक कमी करून घ्यावा. सगळ्यांना हे शक्य असतंच असं नाही. मात्र शक्य झालं तर नक्कीच हे  करायला हवं.

 

salary inmarathi

 

===

हे ही वाचा – SIP किंवा FD मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्यात! नाहीतर…!

===

७. इमर्जन्सी साठी सेव्हिंग

कोरोना काळात बऱ्याच जणांना याचा प्रत्यय आला असेल. दुर्दैवाने काहींनी नोकऱ्या गमावल्या, काहींना पगार आला नाही. काहींचा पगार कमी करण्यात आला, इत्यादी. सांगायचं तात्पर्य असं, की सेव्हिंग व्यतिरिक्त सुद्धा निकडीच्या काळात काही तरी हातात असावे म्हणून हे सेव्हिंग आवश्यक आहे.

इतर वेळेस सेव्हिंग आणि इएमआय गेले, की उरणारा पैसा आपण सर्रास पार्टी आणि गरज नसलेल्या गोष्टीमध्ये उडवून टाकतो. ते न करता एक वेगळी सेव्हिंग करत राहावे. जेणेकरून पैसा शाबूत राहून निकडीच्या वेळी तो हातात राहील.

 

savings inmarathi

 

८. दंड टाळा

क्रेडिट कार्डचे हप्ते किंवा इतर कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाही की त्यावर दंड हा असतोच असतो. शक्यतो हे दंड टाळायचे प्रयत्न करावा.

एकूणच आपली कमवायची क्षमता बघून आपल्याला कर्ज प्राप्त झालेली असतात. त्यामुळे योग्य नियोजन करून ती फेडावी अशी कर्ज देणाऱ्याची अपेक्षा असते.

हा दंड आपल्या महिन्याच्या नियोजनावर थेट फरक पाडत असतो. लहान लहान दंड जरी तुम्ही बघितलात, तरी अनेक दंड मिळून एक मोठी रक्कम तुम्ही गमावल्याचे दिसून येईल.

 

frustrated guy inmarathi

 

या आहेत काही महत्त्वाच्या साध्या गोष्टी ज्या केल्या गेल्या, तर तुम्हाला ऐन वेळेला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

===

हे ही वाचा – तरुण वयात या १२ गोष्टी करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?