' कोरोनाची चाचणी करा स्मार्टफोन वर! रिपोर्ट अवघ्या ५५ मिनिटात.. वाचा – InMarathi

कोरोनाची चाचणी करा स्मार्टफोन वर! रिपोर्ट अवघ्या ५५ मिनिटात.. वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कालच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा जनतेला दिला आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलेले दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर कोरोना टेस्ट केल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाहीये.

सरकारने पुन्हा एकदा चाचण्यांवर भर द्यायला सुरवात केली आहे. मधल्या काळात चाचणी करणे कमी केले होते. फक्त जे लोक इतर  देशातून,राज्यातून हवाई, रेल्वे मार्गाने येत असतील अशा लोकांचे टेस्टिंग केले जात होते. टेस्टिंग ही  वेळ काढू प्रक्रिया असल्याने अनेक प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

 

corona 1 inmarathi

 

कोरोनाची ही दुसरी लाट येत आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे. तसेच दुसऱ्या लाटेमधला कोरोना हा जास्त घातक असल्याने आपण आपली विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी वाढणाऱ्या कोरोनाला बेशिस्त नागरिक जवाबदार आहेत असे म्हंटले आहे.

मास्क न घालणे, अंतर न ठेवणे, लग्नसमारंभ, राजकीय पक्षांचे कार्यक्रम या गोष्टींमध्ये सोशल डिस्टन्स न ठेवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असे त्यांचे म्हणणे आहे.

यावरून सरकारने शॉपिंग मॉल, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी टेस्टिंगला सुरवात केली. टेस्टिंगच्या भीतीने अनेकांनी मॉलकडे पाठ फिरवली.

 

corona 2 inmarathi

हे ही वाचा – ‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची!

कारण टेस्टिंग करून येणारे रिपोर्ट हे खोटे असतात, असे अनेकांचे म्हणणे आहे. पण हीच टेस्ट जर तुम्हाला स्वतःच्या फोनवर करता आली तर आणखीनच सोपे होऊन जाईल.. चला जाणून घेऊयात.

टेस्टिंग स्मार्टफोन :

आज हातात असणाऱ्या स्मार्टफोन मधून आपण काय नाही करू शकत, बँकेच्या व्यवहारापासून ते स्वतःचा फिटनेस सांभाळण्यापर्यंत सर्व काही एका क्लिक वर होते. याच स्मार्टफोन मधून आपण कोरोनची टेस्ट देखील करू शकतो.

शास्त्रज्ञांनी अशी एक चिप शोधून काढली आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधून टेस्ट करू शकता आणि रिपोर्ट देखील अवघ्या  ५५ मिनिटात बघू शकता.

नक्की काय आहे चिप?

नॅनोबीड्स असे या चिपचे नाव आहे. ही चाचणी अँटीबॉडी टेस्टसारखी आहे, चिपवर आपले  सॅम्पल  टाकल्यानंतर एका ट्यूबचा वापर केला जातो. त्यानंतर ट्यूबमध्ये एक लोहचुंबक असते. हे सिरमला थेट इलेक्ट्रोकेमिकल सेंसरपर्यंत पोहचवते.

 

corona chip inmarathi

 

शेवट चिप फोनमध्ये असलेल्या अँप पर्यंत इतर माहिती पोहचवते. त्यानंतर प्रोसेस पूर्ण होते आणि आपल्याला कोरोनाचा रिपोर्ट फोनवर कळतो.

चिप कोणी शोधली?

ही चिप मायक्रोफ्लूडिक चिप राईस विद्यापीठातील संशोधकांनी शोधून काढली. याच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी मलेरिया शोधू शकणारे तंत्रज्ञान  विकसित केले होते.

 

rice university inmarathi

 

कोरोना विषाणूवर जगभरात गेल्या वर्षांपासून अनेक संशोधन सुरु आहे. आज आपल्या देशाने जगातील इतर देशांना कोरोनावरची लस पुरवली आहे. एकीकडे आपल्याकडे लसीकरणावर देखील मोठ्या प्रमाणवर भर दिला जात आहे.

कोरोना टेस्टचे दर बघता सर्वसामान्यांना परवडतीलच असे नाही. म्हणूनच ही चिप फायदेशीर ठरेल हे नक्की.

===

हे ही वाचा – या ८ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानात ‘पारंगत’ झालं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?