' या २५ गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुमच्या सोनेरी बालपणात घेऊन जातील – InMarathi

या २५ गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुमच्या सोनेरी बालपणात घेऊन जातील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल मुलांच्या हातात खेळ कमी मोबाइल जास्त दिसून येतो. आजच्या एकूणच मुलांच्या वर्तुणीकीवरून, वाढत्या मोबाइल वापरामुळे अनेक पालक आज चिंतेत दिसून येत आहे. एकीकडे मुलासोबत खेळायला वेळ नाही, त्याचे रडणे थांबवण्यासाठी पालकच मुलांच्या हातात मोबाइल सारखी गोष्ट देतात.

हातात एकदा मोबाइलला आला की साहजिकच त्याचे व्यसन लागते. दशकानुसार किंवा पिढीनुसार लहान मुलाच्या संगोपनात बदल होत गेले. आता मोबाइल ही गोष्ट जशी मुलांचे व्यसन बनून गेले आहे तसे ९०च्या दशकातील मुलांना tv चे व्यसन लागले होते.

९०च्या दशकात एकूणच देशात अनेक बदल घडून आले. जागतिकारणामुळे संपूर्ण जगाशी भारताचा संबंध आला. विविध  विदेशी कंपन्या  भारतात येऊ लागल्या. लोकांचे राहणीमान हळूहळू बदलू लागले एकूणच ते दशक अनेक क्रांतिकारी बदलांचं होत.

आज प्रत्येकजण आपले बालपण नक्कीच मिस करत असणार. बालपणीचा काळ सुखाचा ही ओळ प्रत्येकाच्या मनात रोज येत असणारच.

ज्यांचे बालपण ९०च्या दशकात गेले आहे ते लोक नक्कीच काही गोष्टी मिस करत असणार, चला तर पुन्हा एकदा आपल्या आठवणींना उजाळा देऊयात.

 

१. दूरदर्शन :

आताच्या चॅनेलच्या गर्दीत आपले आपणच हरवले गेलो आहोत. पण जेव्हा ९०च्या दशकात फक्त दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होते. दर्जेदार मालिका, रात्री ९.३० च्या बातम्या लोक आवर्जून बघायचे.

रविवारी दुपारच जेवण झाल्यावर मंडळी तव चालू करून दूरदर्शनवरचा सिनेमा बघायची. त्यामुळे वीकएंड संस्कृती च्या उदय नसताना सुद्धा कुटुंब एकत्र येऊन छान रविवार साजरा करत.

 

25 dooordarshan inmarathi

 

२. मिल्टन बाटली :

लांब पल्ल्याचा प्रवास असल्यास हमखास प्रवासात घेतली जाणारी गोष्ट म्हणजे ही बाटली. जेव्हा लोक पाणी पिण्यासाठी पैसे खर्च करणे हे माहिती नव्हते तेव्हा या बाटलीचा उपयोग केला जायचा.

 

25 bootle inmarathi

 

३. कंपास :

 

 

25 camlin inmarathi

शाळेत भूमिताचा तास असो वा नसो…ही कंपास रोज सोबत नेण्याचा हट्ट तुमच्यापैकी कितीजणांनी केला होता?

४. कार्टून नेटवर्क :

कधी एकदा गृहपाठ करून कार्टून नेटवर्क चालू करतोय, असे त्याकाळात व्हायचे. पॉपाय सिरीयल बघून अनेक ‘पालक’ आपल्या मुलांना पालक खाण्यासाठी आग्रह करायचे.

स्कुबिडुबी कार्टूनमधला कुत्रा आपल्याकडे देखील असावा असे प्रत्येक लहान मुलांना वाटायचे.

 

 

25 cartoon inmarathi

 

५. चाचा चौधरी :

एकीकडे चॅनेल होतेच तर मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पालक छान छान गोष्टींचे पुस्तक आणून द्यायचे. चंपक, त्तोतोचांद,

चाचा चौधरी सारख्या साहस कथा, त्याच्यावर नंतर सिरीयल देखील आली होती.

 

25 chacha inmarathi

 

६. कॉम्प्लान :

आपलंच मुलगा/मुलगी बुटकी राहू नये म्हणून पालक हमखास आणणारी गोष्ट म्हणजे कॉमप्लान. अनेक लहान मुलांना नुसते दूध पिणे आवडायचे नाही म्हणून दूध थोडे टेस्टी असावे यासाठी कॉम्प्लान सारख्या पावडरी बाजारात आणल्या.

पालकांना आकर्षित करण्यासाठी तशा जाहिराती देखील करण्यात आल्या.

 

25 compaln inmarathi

 

७. गल्ली क्रिकेट :

गल्ली पासून दिल्ली पर्यंत खेळाला जाणार खेळ म्हणून क्रिकेटकडे बघितले जायचे. भारताच्या  गल्ल्यांमध्ये अनेक रेकॉर्ड आता पर्यंत रचले गेले असतील. मोबाइल चा उगम झाला नसल्याने मुलांसाठी हक्काचा हा खेळहक्काचं मानला जाई.

आता सगळीकडे स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी त्यावेळी गटारात गेलेला बॉल सुद्धा मातीत मिसळून पुन्हा खेळायला घेतला जात असे.

 

25 cricket inmarathi

 

८.एस्सेल वर्ल्ड :

डिजने वर्ल्डच्या धर्तीवर मुंबईतदेखील अम्युजमेंट पार्क चालू झाले. आणि मुंबईतली पालकांना आपल्या मुलांसाठी हक्काचे ठिकाण मिळाले.

 

 

९. फ्रुटी :

एकीकडे विविध सोडा पेयांची गर्दी असताना पार्ले कंपनीने आपले शीतपेय बाजरात आणले . विशेष म्हणजे आंबा हे फळ फक्त तीन महिने मिळत असते पण ह्याच आंब्याचा रस जर १२ महिने मिळाला तर हीच संकल्पन घेऊन त्या पद्धतीचे प्रॉडक्ट बाजारात आणले.

काही दिवसातच लोकप्रिय झाले. आजही हे प्रॉडक्ट मार्केट मध्ये हिट आहे. छोट्या पॅक मध्ये मिळणारी गोष्ट मोठा आनंद देऊन जायची.

 

25 frooti inmarathi

 

१०. जुरासिक पार्क :

डायनोसॉर होते की नव्हते यावर अनेक संशोधन चालू आहेत. जर तेच डायनोसॉर आजच्या काळात आले तर या भन्नाट संकल्पनेला घेऊनच हॉलिवूडने जुरासिक पार्क नावाची फिल्म सिरीज चालू केली. आणि जगभरात हिट ठरली.

 

25 juraski park inmarathi

 

११. लिमका :

लिंबाच्या स्वादाचे शीतपेय जास्त लोकांच्या लक्षात राहिले ते केवळ सोनाली बेंद्रेमुळे. आकर्षक जाहिराती आणि ब्रँड अँबेसेडर याने या ब्रॅण्डची ओळख लोकप्रिय झाली.

 

25 limca inmarathi

 

१२. मॅग्गी :

अनेक आयांचा प्रश्न सोडवणारी गोष्ट बाजरात आली आणि आजही तितकेच लोकप्रिय आहे ती म्हणजे मॅग्गी. २ मिनिटात तयार होणारी गोष्ट अनेक मुलांच्या रविवारच्या नाश्त्याची सोय करून गेली.

आजही अनेक घरात रात्रीचे जेवणाची सुट्टी असेल तर मॅग्गी सहज खाल्ली जाते. लहानमुलांपासून ते आबालवृध्दपर्यंत आवडणारी अशी गोष्ट आहे.

 

25 maggi inmarathi

 

 

१३. मारी बिस्कीट :

पार्ले बरोबरीनेच खाल्ले जाणारे बिस्कीट म्हणजे मारी बिस्कीट. ब्रिटानिया कंपनीने आणले हे बिस्कीट आज अनेक कंपन्या बनवत आहेत.

काळानुसार डाएट, गव्हाचे मारी असे अनेक प्रकार आले.

 

25 mari inmarathi

 

१४. नटराज पेन्सिल :

पेन्सिल त्यात ही नटराज आणि अप्सरा या दोन पेन्सिल कंपन्या अस्तित्वात होत्या. नटराज पेन्सिल ने लिहल्यास हस्तक्षर चांगले येई असा समज असे.

25 natraj inmarathi

 

१५. निरमा :

घराघरात कपडे वापरण्यासाठी याच पावडरचा वापर केला जाई. सबकी पसंद म्हणून लोकप्रिय झालेली ही पावडर त्यावर असलेल्या मुलीचे चित्र आज ही अनेकांच्या लक्षात आहे.

 

25 nirma inmarathi

हे ही वाचा – बालपण पुन्हा जगायचंय? : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका…

१६. ओनिडा tv :

onida कंपनीने केलेली हटके जाहिरात आणि त्यांच्या tv पेक्षा त्यांच्या जाहिरातीलत माणूस जास्त लोकांच्या लक्षात राहिला.

 

25 onida inmarathi

 

१७. पार्लेजी :

गरिबांचे बिस्कीट म्हणून जरी हिनवले गेले असले तरी सर्वांच्या आवडीचे हे बिस्कीट होते. पाण्यात, दुधात, चहात अशा गोष्टींमध्ये बुडवून या बिस्कीटचा आस्वाद घेतला जाई.

आजही १० रुपयाचा बिस्कीट पुडा भूक नक्कीच भागवू शकतो.

 

 

१८. पेन पेन्सिल :

शाळेत एखाद्याकडे पेन पेन्सिल असल्यास त्याला श्रीमंतांचे चोचले म्हणून चिडवले जात असे. पेन आणि पेन्सिल याचे उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही पेन्सिल होती.

 

25 pencil inmarathi

 

१९. पेप्सी कोला :

शाळेतून घरी परत येत असताना पेप्सी कोला पीत येणे हे अगदी नित्यनियमाचे झाले होते. केवळ १ रुपयात तहान भागवणारे पेप्सी कोला सर्रास अनेक दुकानामध्ये मिळायचे.

 

25 pepsi inmarathi

 

२०. wwe :

“थांब तुला आता चॉकस्लॅमच देतो” असा डायलॉग हमखास जी मुलं धष्टपुष्ट असायची ते मारायचे. त्याकाळात अनेक मुलांना wwe चे वेडच लागले होते.

 

25 raw inmarathi

 

२१. रुह अफजा :

दूध कोल्ड्रिंक या संकल्पनेला जन्म देणाऱ्या या रुह अफझल प्रचंड मागणी असे. घरगुती कार्यक्रमांसाठी हक्काची गोष्ट म्हणजे रुह अफजा!

 

25 rooh inmarathi

 

२२. विको टरमारिक :

ये हैं विको टरमारिक नाही कॉस्मेटिक ये हैं आयुर्वेदिक क्रिम ही जिंगल आजही अनेक लोकांच्या लक्षात आहे. कॉस्मेटिकचा भडीमार एकीकडे होत असताना आपण वेगळे काय देऊ शकते हे लक्षात घेऊन हे क्रीम बाजारात आले.

 

 

25 vico inmarathi

 

२३. विक्रम वेताळाच्या गोष्टी :

विक्रम वेताळाच्या गोष्टी पुस्तकांपेक्षा जेव्हा त्यावर बनवलेली सिरीयल आली तेवहा जास्त लोकप्रिय झाल्या. कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसताना ही पौराणिक मालिका अपील करणारी वाटायची.

 

25 vikram inmarathi

 

२४. शक्तिमान :

ज्या सिरियलची लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे त्याच लोकप्रियतेवरून काही वाद देखील निर्माण झाले होते. भारताचा सुपरहिरो म्हणून ही सिरीयल अनेकांच्या आवडीची होती.

 

shaktiman inmarathi

 

२५. चॉकलेट :

कुछ मोठा हो जाये असे म्हणाऱ्या कॅडबरी कंपनी सोबतच अनेक गोळ्या देखील बाजारात मिळायच्या. किरणा मालाच्या दुकानांमध्ये  काचेच्या बरणीत मिळणाऱ्या या विविध प्रकारच्या गोळ्या कायमच लक्ष वेधल्या जायच्या.

 

co inmarathi

 

या गोष्टी बघून नक्कीच काही काळासाठी आपण नक्कीच बालपणीच्या काळात हरवले गेलो असू. काळ बदलत जाणार त्याप्रमाणे आपण ही बदलेले गेले पाहिजे.

बालपणात मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी आपलं आयुष्य जस जस पुढे जात राहत  तशा आठवत राहतात.

===

हे ही वाचा – हे बालपण कुणी आम्हाला परत मिळवून देईल का हो?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?