हेच ते ३ विश्वासघात – ज्यांमुळे भारतावर ब्रिटिशांचं जुलमी राज्य आलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या देशावर आक्रमणे ही शतकानुशतके होतच राहिली. परकीय आक्रमणांचा इतिहास खूप मोठा आहे. इराणी, अफगाणी, मोघल अशा अनेक परकीय आक्रमणांनी भारतात आक्रमण करून आपली सत्ता स्थापन करून, बहुतांश संपत्ती लुटून आपल्या देशात नेली.
भारतातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हंटले जाई, विपुल प्रदेश, प्रचंड साधनसंपत्ती, विलासी राजे अशा प्रतिमा संपूर्ण जगभरात भारताबद्दल झाल्या असल्याने, जगभरातील अनेक शासकांना भारताचा मोह आवरेना. त्यामुळे अगदी कोलंबस पासून ते वास्को द गामा यांसारख्या दर्यावर्दी भारताच्या शोधमोहिमेत निघाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम महाराष्ट्रातील लोकांमध्ये स्वराज्याची मशाल पेटवली, पुढे तीच मशाल थेट अटकेपार धडकली. मराठा साम्रज्याने काही काळ तर संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले. त्याच काळात इंग्रजांनी हळू हळू शिरकाव करण्यास सुरवात केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच ओळखले होते हे टोपीकर जास्त विश्वासू नाहीत याना वेळीच आवरले पाहिजे. महाराजांची ही दूरदृष्टी तंतोतंत खरी होती. महाराजांच्या मृत्यूनंतर आणखीनच ते हातपाय पसरू लागले.
भारत हा अखंड देश असला तरी त्यातील राजे हे कायमच एकमेकांच्या विरोधात आहेत व त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल फितवणे, हीच कूटनीती त्यांनी प्रत्येक ठिकाणी वापरली. फोडा आणि झोडा या म्हणीचा त्यांनी वापर केला.
आज इंग्रज आले नसते तर, भारताचे काय झाले असते अशा विषयांवर अनेक चर्चा सत्र भरवले जातात. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर मते मांडत असतो. पण जर आपसातील भांडण मिटवली असती तर नक्कीच इंग्रज भारतात पाय रोवू शकले नसते. यामागची कारण जाणून घेऊयात.
प्लासीची लढाई:
प्लासीचे युद्ध हे इंगजांसाठी खऱ्या अर्थाने विजयाचे प्रतीक म्हणून ठरले. इंग्रजांबरोबरीने फ्रेंच देखील व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपले पाय पसरत होते. त्यामुळे साहजिकच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात व्यापारी युद्ध झाले ज्यात त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांना खेचून एकमेकांच्या विरोधात उभे केले.
युद्ध खरेतर इंग्रज आणि फ्रेंचांचे होते परंतु त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांना भडकावून आपापसात युद्ध लावले व मदत म्हणून आपल्या फौज त्यांना दिल्या.
–
हे ही वाचा – वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!
–
इंग्रजांचे सैन्य कमी असूनदेखील त्यांचा विजय झाला. आणि मीर जाफर ला नवाब म्हणून घोषीत केला. नवाब हा नावापुरता होता .संपूर्ण प्रदेशवर राज्य कंपनीचं करणार होती.
इंग्रज मराठे युद्ध :
या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करून संपूर्ण भारतावर आपले राज्य प्रस्थापित केले. मराठे आणि इंग्रज यांच्यात तीन युद्ध झाली. शेवटच्या युद्धात मराठ्यांची लष्करी आणि राजनैतिक ताकद कमी पडली. त्यातच आपसातील भांडण, कुरघोडीचे राजकारण ही कारणे देखील होतीच. गनिमी कावा या आपल्या हातखंड्यात देखील मराठे कमी पडले.
टिपु सुलतानाशी इंग्रजांचे चौथे युद्ध :
टिपू सुलतान आणि इंग्रजांच्यात एकूण चार युद्धे झालीत. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी टिपू सुलतानाचा अर्धा भाग जिंकला होता. त्यातच टिपूचे फ्रेंचांशी चांगले संबंध होते. त्यांना जरी व्यापाराला परवानगी दिली नसली तरी टिपूने त्यांच्या सैन्यामध्ये फ्रेंच लोकांना संधी दिली होती.
हेच इंग्रजांना खुपत असल्याने टिपूला कायमचा धडा शिकवण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व फौज घेऊन दक्षिणेत उतरले आणि श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धात टिपू मारला गेला. या युद्धात सुद्धा त्याच्या एका साथीदाराने फंदफितुरी केल्याने त्याला पराभव स्वीकारावा लागला.
दक्षिणेतला एक मोठा प्रदेश इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे प्राबल्य चांगलेच वाढले.
फंदफितुरी आप्तस्वकीय यांच्याशी लढण्यातच आपल्या राजांची अख्खी हयात गेल्याने परकीय आक्रमणांना हे महत्वाचे साधन ठरले. ‘फोडा आणि राज्य करा’ ही निती सर्वच परकीय आक्रमणांनी वापरल्याने त्यांना आपल्यावर विजय मिळवणे अगदीच सोपे झाले.
१८५७च्या उठावात सुद्धा सर्व भारतीय एकत्र न लढल्याने तो उठाव अयशस्वी झाला. पण त्या लढण्यापासून संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची ठिणगी पेटायला सुरवात झाली.
–
हे ही वाचा – या महाराणीच्या बांगड्यांमुळे इंग्रजांसमोर उभं राहिलं न भूतो न भविष्यति आव्हान…!
–
अनेक इंग्रज आधिकऱ्यानी सुद्धा भारतातील शूरवीर अशा योध्यांबद्दल, त्याच्या पराक्रमाबद्दल कौतुकाचे दोन शब्द लिहले आहेत. आपल्या देशात पराक्रमी शूरवीर राजे होतेच त्यांनी आपापसातील भांडणे मिटवून एकत्र लढले असते तर नक्कीच अशा परकीय आक्रमणांना ते थोपवू शकले असते.
इतिहासाची पुनरावृत्ती होताना आजही दिसून येते. आता परकीय आक्रमणे होत नसली तरी आपलेच आप्तस्वकीय आपल्यात जातीपातीवरून, धर्मावरून एकमेकांच्यात फूट पडताना दिसून येतात.
भारत माझा देश आहे, सारे माझे बांधव आहेत ही ओळ फक्त प्रतिज्ञेपुरती राहिली आहे. सत्यात उतरायला अजून बराच काळ लोटेल.
- स्रोत – https://www.quora.com/How-could-India-have-prevented-being-colonized-by-Britain/answer/%E0%AE%AA%E0%AE%BE%E0%AE%B2%E0%AE%BE%E0%AE%9C%E0%AE%BF-%E0%AE%B5%E0%AE%BF%E0%AE%B8%E0%AF%8D%E0%AE%B5%E0%AE%A8%E0%AE%BE%E0%AE%A4%E0%AE%A9%E0%AF%8D-Balaji-Viswanathan
- https://www.wikiwand.com/mr/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7
- https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7
- https://vishwakosh.marathi.gov.in/27495/
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.