काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
यूपीए आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असणारा काँग्रेस आणि हिंदुत्ववादी शिवसेना हे पक्ष सध्या हातात हात घालून सरकारमध्ये एकत्र बसलेले आपण पाहतोय. मात्र, कट्टर विरोधक असणाऱ्या काँग्रेसची साथ सेनेने दिल्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही.
याआधी सुद्धा हे असं घडलंय, आणि तेदेखील चक्क हिंदुहृदय सम्राट असा ज्यांचा उल्लेख केला जातो, ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना…!!
भाजपसोबत युती असताना, युतीविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता, आणि तसा आदेश शिवसेनेला देण्यात आला होता. २००७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या काळात ही घटना घडली होती.
केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षांनी मोठ्या चर्चेनंतर प्रतिभाताई पाटील यांचं नाव राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. युतीचा उमेदवार असणाऱ्या भैरवसिंग शेखावत यांना मतदान न करण्याचा आणि प्रतिभाताईंना पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी बाळासाहेबांनी जाहीर केला.
===
हे ही वाचा – जेव्हा पुलंच्या लेटरबॉम्बनी युतीचंच नव्हे तर बाळासाहेबांचंही धाबं दणाणलं होतं
===
यामागचा बाळासाहेबांचा विचार अत्यंत स्पष्ट आणि स्तुत्य होता. ‘एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती या महत्त्वाच्या पदावर विराजमान होणार असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, आणि त्याचसाठी शिवसेना प्रतिभाताईंना पाठिंबा देणार आहे’, असं त्यांनी जाहीर केलं होतं.
विविध पक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते यांच्या भेटी त्याकाळात प्रतिभाताई घेत होत्या. त्यांना पाठिंबा मिळावा यासाठी भेटीचं हे सत्र सुरु होतं. तब्येतीच्या कारणास्तव बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊनच भेटावं लागणार होतं.
असं म्हटलं जातं की प्रतिभाताईंनी स्वतः जाणं काँग्रेस श्रेष्ठींना पटण्यासारखं नव्हतं. म्हणूनच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यंमत्री आबा पाटील बाळासाहेबांचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताईंना शिवसेनेने सुद्धा पाठिंबा दिला आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून एका मराठी महिलेची निवड झाली.
===
हे ही वाचा – “बाळासाहेब म्हणाले,” दिल्लीत स्वाभिमान जिवंत असलेला मराठी माणूस, हाच तो!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.