' शनिवारची बोधकथा: बुद्धांची ही गोष्ट वाचून तुमच्या सगळ्या अडचणींवर मार्ग सापडेल! – InMarathi

शनिवारची बोधकथा: बुद्धांची ही गोष्ट वाचून तुमच्या सगळ्या अडचणींवर मार्ग सापडेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही कथा आहे एका गावातील गरजु शेतक-याची, मात्र तरिही तुमच्याआमच्यातील प्रत्येकाची! शहर असो वा गाव, आयुष्यात एकही समस्या नसलेला माणूस सापडणं निव्वळ अशक्यच.

समस्यांच्या विळख्यात अडकलेला, परिस्थितीने गांजलेला अशा गोपाळ शेतक-याची ही कथा. गावात स्वतःची जमीन होती, पण उत्पन्न अत्यल्प, अहोरात्र मेहनत करून शेती पिकवली पण अवकाली पावसानं घाला घातला. कर्जाचा डोंगर वाढत असताना खिसा झपाट्याने रिकामा होत होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

पैशांअभावी मुलीचं लग्न रखडलं होतं, तर वाया जाणा-या उनाड मुलाकडे पाहून दुःख होत होतं. थकलेल्या आईची आजारपण वाढत होती पण उपचाराला पैसा नव्हता. या सगळ्याचा ताण सोसणा-या बायकोशी वाद होत असल्याने संसाराकडे पाठ फिरवावी असा विचारही त्याच्या मनात डोकावत होता.

 

farmer inmarathi

 

एकंदरितच एक, दोन नव्हे तर असंख्य समस्यांचा फेरा चुकवणं त्याला असह्य ठरत होतं.

या सगळ्यावर उपाय करतानाही तो थकत नव्हता. नवससायास झाले, पुजाअर्जा केल्या, ढोंगी बाबांचे पायही धरले पण येणारा प्रत्येक दिवस एक नवी समस्या घेऊन दाखल होत होता.

त्याच्या शेजारील गावात गौतम बुद्धांचा काही दिवसांसाठी मुक्काम होता. त्यांच्या भेटीसाठी अनेकांची रीघ लागली होती. गांजलेल्या, कंटाळलेल्या गोपाळला गावातील काही ज्येष्ठांनी ही बाब सांगत बुद्धांना शरण जाण्याचा सल्ला दिला.

 

goutam budhha inmarathi

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : जीवनाच्या शर्यतीत कुठे थांबायचं ते प्रत्येकालाच काळायला हवं!

गोपाळ बुद्धांच्या भेटीसाठी गेला, बुद्धांनी प्रसन्न मुद्रेने त्याला त्याच्या अडचणींबद्दल विचारलं, त्यावेळी मात्र गोपाळचा बांध फुटला.

घरदार, संसार, शेतीतील नुकसान, आर्थिक विवंचना, आजारपण अशा तक्रारींना पाढा वाचताना गोपाळ थकत नव्हता. समस्यांची त्याची भलीमोठी यादी संपत नव्हती.

त्याला शांत करत भगवान बुद्धांनी धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरिही गोपाळ ऐकत नव्हता. “माझंच नशिब खोटं, लहानपणापासून मी केवळ मनस्ताप भोगतोय. कितीही उपाय केले तरी समस्या संपत नाहीत. त्रास कमी होत नाही, किंबहूना त्यात भर पडतीय ” .

त्यावर गौतम बुद्ध शांत चित्ताने म्हणाले, “मला तुझ्या तक्रारी समजल्या, मात्र मी तुला कोणतीही मदत करू शकत नाही.”

बुद्धांचा हा प्रतिसाद ऐकून गोपाळ चांगलाच खवळला. तुमच्यापेक्षा आधीचे महाराज बरे, त्यांनी पुजाअर्चा, नवस यांचे उपाय तरी सांगितलेले असं म्हणत त्याने आपला राग व्यक्त केला.

त्यावर बुद्धांनी त्याला विचारलं, ” त्या पुजाअर्चेने तुझ्या समस्या संपल्या का?”

संपल्या नाहीत मात्र काही दिवसांसाठी घरात शांतता होती, गोपाळने उत्तर दिलं.  “मात्र समस्या कायमच्या संपल्या का”, बुद्धांच्या या प्रश्नावर गोपाळ निरुत्तर झाला.

 

farmer and budhhaa inmarathi

 

त्यावर भगवान बुद्ध म्हणाले,” तु आत्ता सांगितलेल्या ५० समस्यांसाठी मी तुझी काहीही मदत करू शकत नाही, मात्र तुझ्या ५१ व्या समस्येवर मी तोडगा काढू शकतो.”

गोंधळलेल्या गोपाळकडे बघत बुद्धांनी स्पष्टीकरण दिलं, की “माझ्या आयुष्यात यापुढे समस्या येणार नाहीत किंवा माझ्या समस्या संपणारच नाहीत, ही तुझ्या मनातील जी भिती आहे तीच तुझी एकावन्नावी समस्या आहे. ज्या दिवशी ही एकावन्नावी समस्या तु सोडवशील त्याक्षणापासून तुझ्या पन्नास समस्यांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येणार, संकट भेडसावणार हे नक्की, मात्र आपण आपल्या आयुष्यातील संकटांकडे कसं बघतो? त्याला किती महत्व देतो? त्या संकटांना धैर्याने तोंड देतो की कृती करण्यापेक्षा केवळ चिंता करण्यात वेळ वाया घालवतो? हे महत्वाचं आहे.”

त्याक्षणी गोपाळला त्याची चूक उमगली. भगवान बुद्धांकडून पन्नासाव्या नव्हे तर एकावन्नाव्या आणि सर्वात मोठ्या समस्येचं उत्तर मात्र त्याला गवसलं होतं.

 

farmer working inmarathi

 

पुन्हा गावी परतलेल्या गोपाळच्या आयुष्यातील समस्या कमी झाल्या असं म्हणता येणार नाही. पण त्याचं मन शांत झालं, समस्यांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन इतका सकारात्मक बनला की येणा-या प्रत्येक संकटावर त्याने कुटुंबियांच्या साथीने, संयमाने मात केली.

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : स्वतःसाठी जगताना थोडे दुसऱ्यांसाठी देखील जागा!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?