' सलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना! – InMarathi

सलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कल्ट क्लासिक सिनेमाचं नाव काढलं की आपल्या कित्येकांसमोर उभा राहतो तो एकमेव सिनेमा म्हणजे ‘अंदाज अपना अपना’! कल्ट क्लासिक म्हणजे काळाच्या पुढचे सिनेमे जे ज्या काळात रिलीज झाले त्या काळात ते फ्लॉप झाले, पण तो सिनेमा नंतर लोकं इतका डोक्यावर घेतात की त्याला कल्ट क्लासिक हे स्टेटस आपोआप मिळतं!

हिंदी इंडस्ट्रीत असे बरेच सिनेमे होऊन गेले, पण अंदाज अपना अपना आजही लोकांच्या मनात घर करून आहे, आजही या सिनेमावरून हजारो मीम्स आपण व्हायरल होताना पहिले आहेत!

 

andaz apna apna inmarathi

 

यातले डायलॉग, यातली पात्र सगळंच अजब होतं. क्राइम मास्टर गोगो, महापुरुष ही संकल्पना, सलमान आमीर ही भन्नाट जोडी, परेश रावल यांनी साकारलेला व्हिलन बाप, विजू खोटे सारख्या सीनियर कलाकाराने वठवलेला रोल सगळं सगळं आजही लोकांना बघायला आवडतं!

सध्या इंटरनेटच्या कृपेमुळे तर कित्येकांनी या सिनेमाची पारायणं केली आहेत, मराठीतल्या अशीही बनवाबनवी प्रमाणेच या सिनेमातल्या डायलॉग्ससुद्धा तुम्हाला सर्रास प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येतात!

आज आपण याच कल्ट क्लासिक सिनेमाविषयी काही गंमतीशिर गोष्टी जाणून घेणार आहोत!

===

हे ही वाचा सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

===

 

aamir khan salman inmarathi

 

या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना त्या दरम्यान सलमानने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे कबूल केलं की त्याने मुद्दाम या सिनेमाचं शूटिंग डिले होईल यासाठी बरेच उपद्व्याप केले!

या सिनेमात आमीरचं पात्र हे अत्यंत बोलकं आणि मजेशीर होतं आणि सलमानचं पात्र हे जरासं बावळट दाखवलं होतं, आणि यामुळे आमीरला सर्वात भारी लाईन्स आणि डायलॉग मिळाले आणि सलमानला तितका वाव मिळाला नाही हे खुद्द सलमानने कबूल केलं आहे!

त्या काळात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी जेव्हा या सिनेमाचा खास शो प्रेससाठी आयोजित केला तेंव्हादेखील आमीरच सलमानपेक्षा वरचढ ठरला असं म्हंटलं जात होतं!

शिवाय हा सिनेमा पूर्ण करताना सलमानने मुद्दाम कधी पायाच्या दुखापतीचं कारण देऊन, कधी तारखांचे बहाणे सांगून तर कधी केसांची स्टाइलच बदलून शूटिंगमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला होता हे सलमानने एका मुलाखतीत सांगितलं आहे!

सलमानने दिलेल्या या मनस्तापामुळे संतोषी आणि आमीर यांना तसेच युनिटलासुद्धा बऱ्याच प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागलं!

 

salman inmarathi

 

शिवाय या सिनेमाच शूटिंग दरम्यान सलमान आणि आमीर या दोघांमध्ये काहीतरी कुरबुरी चालू आहेत अशी अफवा बाहेर पसरली होती, पण राजकुमार संतोषी यांनी स्वतः एका मुलाखतीत हे स्पष्ट केले की तसं काहीही नव्हतं!

आमीर आणि सलमान दोघेही खूप मिळून मिसळून काम करत होते, दोघेही एकमेकांचा आदर करायचे शिवाय कामात मदतदेखील करत असत, आमीरच्या “आईला” आणि सलमानच्या “उईमा” या दोन रिएक्शनवरसुद्धा दोघे मनमुराद हसायचे!

खरंतर सिनेमाच्या शूटिंगदरम्यान २ लिड अभिनेत्री रविना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यात थोडी अनबन होती हेदेखील राजकुमार संतोषी यांनी स्पष्ट केलं. प्रेसमधल्या काही बातम्यांमुळे या दोघी एकमेकींशी बोलणं टाळत होत्या!

 

raveena karishma inmarathi

 

पण याचा परिणाम त्यांनी कधीच त्यांच्या कामावर होऊ दिला नाही, संतोषी यांच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांनी कधीच तसं दाखवून दिल नाही, फक्त या सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करतेवेळी तर वेगळीच तारांबळ उडाली होती!

आतिश सिनेमाच्या शूटिंगसाठी रविना आणि करिश्मा बाहेर गेल्या होत्या तिथून अंदाज अपना अपनाच्या शेवटच्या सीनच्या शूटिंगसाठी परतत असताना विमानतळावर त्यांच्यात काहीतरी वाद झाले आणि त्या एकमेकींशी बोलायच्या बंद झाल्या!

===

हे ही वाचा बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!

===

संतोषी यांना क्लायमॅक्स शूट करताना ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आजही अंदाज अपना अपनाचा क्लायमॅक्स आठवा, जिथे रविना आणि करिश्मा या दोघींना एका खांबाला बांधलेलं असतं, तेंव्हा या शूटिंगदरम्यान काही तक्रार असेल तर त्या दोघीही एकमेकीला सांगण्याऐवजी संतोषी यांच्याकडे ती तक्रार करायच्या!

 

climax inmarathi

 

अशा सगळ्या वेगवेगळ्या अफवांमधून आणि खासगी कुरबुरितून हा सिनेमा पूर्ण झाला, रिलीज केला गेला पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला, कदाचित त्या काळात लोकांना इतकी मॅड कॉमेडी आवडत नसावी!

पण नंतर टेलिव्हिजन आणि इंटरनेटमुळे या सिनेमाने जे रेकॉर्ड केले ते आजतागायत कोणत्याच सिनेमाला तोंडणं शक्य होणार नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?