फिटनेस ते सौंदर्य : घरातल्या घरात केली जाणारी ही कृती औषधांपेक्षाही प्रभावी ठरतीय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पाणी पिणे शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपण रोज किमान ८ ते १० लीटर पाणी प्यायला हवे. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अधिक फायदे आहेत.
अनेक अभ्यासदेखील हेच दाखवतात की गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच गॅस, अपचन आणि पोटाचे विकार या सारखे दूर होतात.
तर मग आजच्या लेखात आपण पाहू या गरम पाणी पिण्याचे फायदे.
१. पचन व्यवस्था ठेवते व्यवस्थित
सामान्यत: अनेक लोकांना पचनाचा खूप त्रास होतो. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अनेकजण आवडते पदार्थ देखील खाणे टाळतात. अनेकांना तर पचनाचा इतका त्रास होतो की काहीही खाल्ले तरी ते लगेच बाहेर टाकले जाते.
अन्नाचे जर योग्य पचन झाले नाही तर आपल्या आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. कारण अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. जर अन्नाचे पचन झाले नाही तर दिवसेंदिवस आपले आरोग्य खराब होत जाते.
जर तुम्ही रोज एक गरम ग्लास पाणी प्यायलात तर तुमची पचनव्यवस्था उत्तम राहते. म्हणजेच काय, तर तुमची Digestive System निरोगी राहते. आपण जे काही अन्न खातो त्यांचे चांगले पचन होते.
२. बदलणाऱ्या हवामानापासून सुरक्षितता
अनेक लोकांना हवामानात थोडासा जरी बदल झाला तरी त्यांचा खूप त्रास होतो. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असे अनेक त्रास होतात. या सर्वांसाठी एकच उपाय म्हणजे गरम पाणी पिणे!
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून प्यायलात तर त्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
परिणामी हवामानात कितीही बदल झाला तरी जर तुमची प्रतिकार शक्ती उत्तम असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्याही हंगामी आजारास बळी पडणार नाहीत. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी एक ग्लास गरम पाणी पिणे कधीही फायदेशीर ठरते.
–
हे ही वाचा – मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे!
–
३. लठ्ठपणा कमी करते
आजकाल सर्वाधिक आरोग्याची समस्या जर कोणती असेल तर ती लठ्ठपणा! सतत बैठे काम करत राहणे, जंक फूड खाणे, झोपेच्या अनियमित वेळा, व्यसने यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. प्रयत्न करूनही अनेकांचं वजन आटोक्यात येत नाही कारण वजन कमी करणे ही फार किचकट प्रक्रिया आहे. यासाठी सातत्य फार गरजेचे आहे.
जर तुम्ही नियमित गरम पाणी पित असाल तर तुमच्या शरीरातील फॅट बर्न होण्यास सुरुवात होते. त्यासाठी रोज किमान रोज एक ग्लास गरम प्यावे.
दोन दिवस गरम प्यायले आणि लगेच वजन कमी झाले असे होतं नाही. यासाठी सातत्य फार गरजेचे आहे.
४. त्वचेवरील चमक वाढवा
फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांना देखील त्यांच्या त्वचेची समस्या असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या त्वचेची खूप काळजी घेत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या त्वचेला चांगली चमक असावी.
अनेकदा त्वचेच्या काळजीपोटी बाजारातील अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरले जातात. त्यामुळे चेहऱ्यांवरील चमक कमी होते.
जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी प्यायले तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर चमक पुन्हा येईल. गरम पाण्यामुळे शरीरातील सर्व टाकऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.
जर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाणी आणि संध्याकाळी झोपताना एक ग्लास गरम पाणी प्यायलात तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल.
५. ताणापासून मुक्ती
तणाव ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला तणाव हा आहेच. जेव्हा एखादा व्यक्ती तणावात असेल तर त्याचे मानसिक संतुलन ढासळते. आरोग्याच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात.
शाळेत जाणारा विद्यार्थी असो किंवा नोकरदार महिला, पुरुष असो सर्वाना तणाव असतोच. तणावासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
त्या बरोबरच आपण घरगुती उपाय देखील आपण करू शकतो. योगासने किंवा प्राणायम करणे तसेच त्यासह दररोज एक ग्लास गरम पाणी देखील आपण पिणे उपयुक्त ठरते.
यामुळे शरीरातील toxic elements शरीराबाहेर टाकले जातात. Nervous System ला अधिक सक्षम बनविण्यासाठी गरम पाणी अतिशय उपयुक्त ठरते.
–
हे ही वाचा – पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!
–
६. सर्दी पडसे करते दूर
कधीही, कोणत्याही ऋतूमध्ये होणारा विकार म्हणजे सर्दी! जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दी होते, तेव्हा कोमट पाणी प्यावे.
अनेकदा आपण फ्रीजमधील थंड पाणी पितो, आपल्या शरीराला हा बदल लवकर मान्य होत नाही. त्यामुळे सर्दी होते.
कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरास आराम मिळतो. श्वसनयंत्रणेसाठी हा उपाय नेहमीच प्रभावी ठरतो.
गरम पाणी पिणे, तसेच त्याच्या गुळण्या करणे हे उपाय सर्दी, खोकल्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
मागील वर्षापासून कोरोनाच्या विषाणूंना रोखण्यासाठी डॉक्टरांकडून गरम पाणी पिणे, वाफ घेणे यांचा दिला जाणारा सल्ला हे त्याची उपयुक्तता सिद्ध करणारे सर्वात मोठे उदाहरण आहे.
७. भूक वाढविण्यासाठी उपयुक्त
लठ्ठपणा ज्या प्रमाणे एक समस्या आहे. अगदी त्या प्रमाणे कमी वजन ही देखील एक समस्या आहे.
अनेकांना जेवायला बसल्यानंतर अजिबात जेवण जात नाही. जेवण नीट न गेल्यामुळे वजन देखील वाढतं नाही. जर तुम्हाला जेवण नाही गेले तर तुम्हाला त्यातील पोषकतत्वे काहीच मिळत नाहीत. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
अनेकजण वजन वाढविण्यासाठी अनेक औषधे, गोळ्या घेतात पण त्यामुळे वजन वाढते पण इतर आजार देखील वाढतात.
जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी, काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस जर एकत्र करून प्यायले तर तुम्हाला नक्की भूक लागेल. भूक वाढविण्यासाठी गरम पाणी अतिशय उपयुक्त आहे. गरम पाणी प्यायल्यामुळे शरीराचे कार्य जलद होते आणि भूकही लागते.
८. कंटाळा दुर करण्यासाठी
अनेकदा आपल्याला खूप काम करायचे असते. आपण जेव्हा झोपेतून जागे होतो तसे आपण ठरवितो की आज मी हे सर्व काम करणार आहे. पण आपण कितीही ठरविले तरी आपली सर्व कामे होत नाहीत कारण आपणाला थोड्याच वेळात थकवा जाणवतो आणि थकवा जाणवला की आपल्या कामाचा वेग अतिशय कमी होतो.
थकवा आणि आळस दूर करण्यासाठी किमान एक ग्लास गरम पाणी आपण प्यायला हवे. ज्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटते. कितीही काम केले तरी थकवा येत नाही.
९. चेहऱ्यांवरील पिंपल्स घालवण्यासाठी
पिंपल्स की केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही समस्या बनत आहे. जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी प्यायलात तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील मुरमे कमी होतील. कारण गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सर्व अपायकारक गोष्टी शरीराच्या बाहेर टाकल्या जातात.
आपला चेहरा नितळ आणि साफ होतो. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
१०.’ त्या’ वेदनांवर प्रभावी औषध
अनेक मुली आणि महिला यांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी ही समस्या जाणवते. अत्यंत त्रासदायक असलेल्या या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी अनेकजणी औषधांची मदत घेतात.
मात्र अपायकारक गोळ्यांपेक्षा अशा वेळेस त्या काळात जर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास तर नक्कीच आराम मिळतो.
फिटनेस असो वा सौंदर्य, प्रत्येक समस्येसाठी स्वयंकपाकघरातील हा उपाय उपयुक्त ठरतो. शिवाय त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत की कोणताही वेगळा खर्च नाही.
स्वस्तात मस्त असलेला हा उपाय एकदा तरी ट्राय करून बघाच.
–
हे ही वाचा – सावधान : रोज ‘काढा’ घेताय? आधी हे वाचा, नाहीतर…
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.