सावध व्हा: या ५ सवयी तुमचं किती भयंकर नुकसान करताहेत तुम्हाला कल्पना नाहीये
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मोबाईल किंबहुना एकूणच गॅझेट्स जेव्हापासून स्मार्ट झाली लोकांच्या सवयी बदलल्या. अनेक वाईट सवयी जडल्याही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या वाईट आहेत हेच अनेकांना माहित नाही.
या वाईट सवयींपासून सुटका करून घ्यायची तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वत:वर नियंत्रण हवं. हा केवळ शब्द नाही की कृती नाही ती आपल्या मेंदुच्या गुंतागुंतीच्या रचनेतील एक केमिकल रिॲक्शन आहे.
जे पेराल ते उगवेल अशी आपल्याकडे म्हण आहे या सवयींच्या बाबतीत आपला मेंदू शब्दश: तसा वागतो. त्याचे स्वनियंत्रण करणारे स्नायू जर पूर्ण ताकदीनं काम करायला हवे असतील तर या काही सवयींपासून तुम्ही दूर रहायलाच हवंय.
या सवयींमधे जशा वर्तणुकीच्या सवयी आहेत तशाच आधुनिक काळातल्या डिजिटल अतिरेकाच्या सवयीही आहेत. त्यांचे दुष्परीणाम वरवर दिसत नसले तरीही परिणाम गंभीर असतात.
म्हणूनच या सवयींपासून सुटका करून घ्यायला हवीच आणि याचा फायदा काय? तर कामातली, अभ्यासातली किंवा जे काही कार्य करत आहात त्यातली एकाग्रता दुपटीनं तिपटीनं वाढते.
एकाग्रता वाढली की त्याचे परिणामही सकारात्मक दिसून येतात. म्हणूनच आजपासून नव्हे, आत्तापासूनच या सवयींपासून सुटका करून घ्या. फायदा तुमचाच आहे-
१) अंथरूणात मोबाईल, लॅपटॉप, टॅब वापरणे –
आजच्या घडीला तुमच्या झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर तुमच्या हातात असणारा मोबाईल, हे काय नेहमीचंच प्रवचन असं म्हणून लेख स्क्रोल करणार असाल तर नुकसान तुमचंच आहे.
या गॅजेटमधे असणारा शॉर्ट वेव्हलेन्ग्थ ब्लू लाईट तुमच्या मूडवर खूप गहिरा परिणाम करणारा असतो. त्याचबरोबर एनर्जी आणि झोपेच्या दर्जावरही परिणाम करणारा असतो.
===
हे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात
===
सकाळच्या सूर्यप्रकाशात हा ब्लू लाईट असतो. जो डोळ्यातली झोप उडवून तुमचा मेंदू ताजातवाना करतो. आता विचार करा, सकाळ इतकेच जर मध्यरात्रीही तुमचे डोळे टक्क उघडे असणार असतील तर त्यांनी विश्रांती कधी घ्यायची? मेंदूला आराम कधी द्यायचा?
दुपारनंतर सूर्यकिरणांतला हा ब्लू लाईट कमी कमी होत जातो आणि नैसर्गिकरित्या तुमचे डोळे जड होऊ लागतात हळूहळू त्यांच काम मंदावतं, झोपेसाठी आवश्यक हार्मोन्स स्त्रवू लागतात. सूर्यास्तानंतर तुमच्या मेंदूला या प्रखर किरणांची आवश्यकता नसते आणि नेमके याचवेळेस तुम्ही जबरदस्तीनं त्याला कामाला लावता.
मेंदूने आणि डोळ्यांची दिवसभराची ड्युटी संपलेली असल्यानं त्यांनी आराम करायला हरकत नाही असा आदेश काढलेला असतो आणि डोळे तर प्रकाशामुळे टक्क जागे असतात.
एकूण यंत्रणेत काय गडबड उडत असेल याची कल्पना करा. म्हणून संध्याकाळनंतर स्क्रिन टाईम जितका शक्य तितका कमी करायला हवा.
२) इंटरनेट हा शत्रू क्रमांक दोन आहे –
तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही बरेचदा इंटरनेटवर प्रचंड वेगानं सर्फिंग करत असता हे तुमच्या लक्षात येतंही आणि नाहीही. म्हणजे, तुम्ही चॅटींग ॲप उघडता, मेसेजेच वाचता, उत्तरं देता मग सोशल मिडियावर जाता, तिकडे काही पोस्ट वाचता काही स्क्रोल करता मग काही पोस्टवर उत्तरं देता, चर्चा करता.
तुम्ही एखादी पोस्ट लिहिता. त्यावर लाईक कमेण्ट येतात त्याकडे लक्ष पुरवता. सुरवातीच्या कमेण्ट झाल्या की पुन्हा एकदा चॅटींग एपवर चक्कर मारता. तिथून आणखीन एखाद्या ॲपवर मग तिथून तिसर्या ॲपवर किंवा युट्यूबवर जाता, काही व्हिडिओ बघता. हे सगळ करण्यात कधी कधी काही तास कसे जातात हे तुम्हाला कळत नाही.
आता कल्पना करा की हे प्रयेक व्हर्च्युअल ठिकाण वास्तवात आहे. किंवा या दहाबारा खोल्या आहेत ज्यातून तुम्हाला तास दोनतास सैरभैर होत पळायचं आहे. किती दमणूक होईल?
त्याहून दुप्पट दमणूक तुम्ही मेंदूची करत असता. म्हणूनच बरेचदा बराचवेळ इंटरनेट सर्फिंगवर घालवल्यावर डोकं दुखतं. याशिवाय आणखीन एक केमिलक लोचा मेंदूत घडत असतो तो म्हणजे, तुम्ही कोणतंही काम करता तेंव्हा त्या कामातली एकाग्रता निर्माण होण्यासाठी तुमचा मेंदू पंधरा मिनिटांचा वेळ घेतो. त्यानंतर मेंदूत या कामाबाबतचा एक फ्लो निर्माण होतो.
मात्र याच दरम्यान जर तुम्ही इंटरनेट सर्फिंग चालू केलं तर मेंदूची एकाग्रता खंडीत होते. ती एकाग्रता पुन्हा आणण्यासाठी पुन्हा पुढची पंधरा मिनिटं खर्ची पडतात. अर्थातच कामाच्या दर्जावर याचा परिणाम होतो.
३) संभाषणा दरम्यान मोबाईल बघणं –
अलिकडे एक कृती अगदी सर्रास सगळेचजण करतात आणि ती म्हणजे समोरच्याशी बोलत असताना मोबाईल तपासणं. कधी आलेला मेसेज वाचणं तर कधी एखादा फोन कॉल मधेच घेणं. यामुळे परस्पर संवादावर परिणाम होतो.
कधिही एखाद्याशी बोलत असताना मोबाईलमधे बघू नये, ते संभाषण पूर्ण झाल्यावरच मोबाईल बघावा. यामुळे संभाषणातील रूची वाढते.
४) नोटीफिकेशन बंद ठेवा –
नोटिफिकेशन चालू ठेवायची अनेकांना सवय असते. काम करत असताना ईमेल्सचे किंवा विविध चॅटिंग ॲपची नोटिफिकेशन्स पॉप होताना आवाज करतात. अगदी कामाच्या संदर्भातली ही नोटिफिकेशन्स असली तरिही ती कामाच्या एकूण दर्जावर परिणाम करतात.
त्याऐवजी एक वेळ निश्चित करून तेंव्हाच सगळी नोटिफ़िकेश पहा आणि उत्तरं द्या.
५) सोशल मिडिया –
सोशल मिडिया हा जगण्याचा अनिवार्य भाग बनला आहे. सोशल मिडियावर तुमचं अकाऊंट असणं कूल मानलं जात असलं तरीही तुम्हाला हे कळतही नाही की किती प्रकारची अनावश्यक नैराश्यं तुम्ही आपण होऊन आमंत्रित करत आहात.
बरेचदा सोशल मिडियावरच्या पोस्ट तुमची चिडचिड वाढवतात, कोणीतरी काहीतरी शेरेबाजी करतं ती तुम्हाला त्रास देते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी तुमचं मानसिक स्वास्थ्य डळमळतं आणि ते तुम्हाला कळतहि नाही.
===
हे ही वाचा – स्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो
===
स्मार्टफोन्सवर ही सर्व ॲप प्रिलोडेड असतात त्यामुळे अक्षरश: टिचकीच्या अंतरावर हे सगळं उभं आहे. अलिकडे काहीही खुट्ट घडलं की ते सोशल मिडियावर शेअर करण्याची घातक सवय जडली आहे.
कितिही कूल वाटत असलं तरिही संशोधन हेच सांगतं की ही सवय घातक आहे.
आधुनिक जगात मानसिकस्वास्थ्य राखायचं तर हे डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचं आहे. वेळीच सावध व्हा आणि या सवयींपासून दूर रहा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.