' शेअर मार्केट ‘पडतं’ तेव्हा पडद्यामागे भलतंच घडत असतं! जाणून घ्या पैश्याचा खरा प्रवास – InMarathi

शेअर मार्केट ‘पडतं’ तेव्हा पडद्यामागे भलतंच घडत असतं! जाणून घ्या पैश्याचा खरा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना घडली की त्याचा थेट फरक पडतो तो शेअर बाजारावर. देशात दुसऱ्यांदा स्थिर सरकार आलं तेव्हा तर शेअर मार्केट आकाशात पोहोचलं होतं, तेच अमेरिकेत बायडन निवडून आल्यावर शेअर मार्केट थोडं डाऊन झालं होतं.

हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड-एचएएल या भारतीय विमान बनवणाऱ्या सरकारी आस्थापनेला जेव्हा सरकार कडून तेजस विमानांची ऑर्डर मिळाली तेव्हा एचएएलचा साधारण ९०० रुपये असलेला शेअरने थेट १००० रुपये क्रॉस केले होते.

 

HAL inmarathi

 

तेच मॅजेस्को या आयटी कंपनीचे लाखभर शेअर्स एकाच ट्रेडरने उचलल्यानंतर ९०० रुपयांचा एक असलेला शेअर थेट ९ रुपयांवर आदळला.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा एखाद्या शेअरची खरेदी जास्त सुरू झाली की त्याची किंमत वाढत जाते, तेच विक्री वाढली की त्याची किंमत कमी होत जाते.

व्यापाराचा साधा नियम आहे, पुरवठा कमी असला आणि मागणी जास्त असली की वस्तूची किंमत वाढत जाते आणि व्हाइस वर्सा.

चला हे तर समजलं, पण जेव्हा शेअरची किंमत पडते तेव्हा तो पैसा नेमका कुठे जातो?

उदाहरण घ्यायचं तर वरचं मॅजेस्कोचं घेऊया. ९०० रुपये असलेला शेअर थेट ९ वर आला, मग ८९१ रुपये गेले कुठे? आज याच बाबतीत डिटेलमध्ये बघूया.

===

हे ही वाचा “शेअर मार्केट म्हणजे पैसे बुडाले” हा तुमचा समज कायमचा दूर करणारे ७ फायदे वाचा!

===

 

share market inmarathi

 

शेअर मार्केट का पडतं?

बाजारात जेव्हा बेभरवशी वातावरण तयार होतं, तेव्हा बाजार कोसळतो. लोक आर्थिक रिस्क कमी करण्याच्या नादात खरेदी ऐवजी विक्रीवर जास्त फोकस करतात आणि शेअरच्या किमती घसरू लागतात.

इथे एक लक्षात घ्या, फायद्यासाठी शेअर विकणे आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेअर विकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

तर कधी कधी बुल आणि बिअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेमुळेसुद्धा मार्केट पडल्याचे आपण पाहिले आहे.

स्कॅम १९९२ बघितलं असाल तर बुल आणि बिअर काय आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. चढत्या मार्केट काळामध्ये पैसा छापणारे बुल तर पडत्या मार्केट काळात पैसा छापणारे बिअर.

 

scam 1992 inmarathi

 

त्यासाठी हे दोघे आपापल्या परीने मार्केट चढवण्याच्या आणि पाडण्याच्या हिशोबाने खेळत असतात. आणि अजून एक कारण म्हणजे मार्केट बबल, तो जेव्हा फुटतो तेव्हा मार्केट जबरदस्त कोसळतं.

हर्षद मेहताने एसीसीचा चढवून ठरवलेला भाव हे या मार्केट बबलचं आपण उदाहरण मानू शकतो.

तर मार्केट का आणि कसं पडत याच आपण कारण पाहिलं, आता पाहूया मार्केट पडल्यावर पैसा जातो कुठे. आता एक उदहाराण घेऊया.

समजा तुम्ही एक चांगली दुभती म्हैस २०,००० रुपयांना विकत घेऊन घरी आलात. पण दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरते की म्हशीच दूध पिणे किंवा वापरणे आरोग्याला हानिकारक आहे.

===

हे ही वाचा १०००० कोटींचं साम्राज्य असणाऱ्या “बिग बुल”च्या टिप्सनी तुम्हीही व्हाल मालामाल!

===

आता त्यामुळे तुमची ती म्हैस विना उपयोग तशीच उभी राहिली आणि ती म्हैस कोणीच घ्यायला तयार नाही. शिवाय कोणी खाटीक, तो खाटीक सुद्धा त्याला ५००० च्या वर किंमत द्यायला तयार नाही.

आता तुम्ही विचार कराल की ती म्हैस तशीच उभी ठेवण्यापेक्षा ५००० रुपयात खाटकाला विकू.

 

mhais inmarathi

 

आता काही प्रश्न बघूया, नुकसान कोणाचं झालं? तुमचं किंवा तुमच्या सारखे अनेक ज्यांच्याकडे म्हशी आहेत. कितीच नुकसान झालं? १५००० रुपयांचं. फायदा कोणाचं झाला? कोणाचाच नाही.

(खाटकाला तेवढा भाव मिळाला तर ठीक.पण म्हशीचं दूध हानिकारक म्हटल्यावर ते मांस तरी कोण विकत घेईल?)

मग १५००० गेले कुठे? तुम्ही म्हैस ज्याच्याकडून विकत घेतली त्याच्याकडे.

जर समजा म्हैस तुम्ही घरी आणली असती आणि आजारी पडली असती तर परिस्थिती समानच राहिली असती. तशीच काहीशी परिस्थिती ही शेअर मार्केट मध्ये असते.

तुम्ही ज्या किमतीला शेअर विकत घेता आणि मार्केट पडते तेव्हा शेअरची किंमत सुद्धा पडते. तुमच्याकडे शेअर असतात पण त्याची किंमत तेवढी राहिलेली नसते, शेअर मार्केटमध्ये व्यवहार (खरेदी-विक्री/विक्री-खरेदी) हा स्लो झालेला असतो. त्यामुळे झालेला तोटा हा दिसत नसतो, झालेल्या नुकसानात कोणालाच पैसा मिळालेला नसतो.(ऍडव्हान्स ट्रेडिंगची शक्यता वगळल्यास.)

 

sell and buy inmarathi

 

आता या उदाहरणात थोडं पुढे जाऊ. खाटकाने ५००० मध्ये म्हैस घेतल्यानंतर महिनाभरात गावात बातमी येते की म्हशींच्या दुधात नाही तर गाईच्या दुधात प्रॉब्लेम आहे. आणि बघता बघता तो खाटीक ती म्हैस गावातल्या व्यक्तीला ३०००० ला विकतो.

आता फायदा कोणाचा झाला? खाटीकाचा, तेव्हा रिस्क असताना त्याने ५००० गुंतवले आणि २५००० जास्त मिळवले.

२५००० कुठुन आले? गावातल्या व्यक्तीने त्याला दिले. त्याने तेवढे का दिले? कारण इतर म्हशीची किंमत सुद्धा तेवढीच होती. भविष्यात ती किंमत वाढू पण शकते.

आता नुकसान कोणाचे झाले? ज्याने म्हैस ५००० ला विकली.

तर, जेव्हा शेअरची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत सुद्धा वाढते आणि लोक त्या शेअर कडून चांगल्या परताव्याची अपेक्षा करतात आणि त्यामुळे त्याला वाटेल तेवढी किंमत देतात.

 

market return inmarathi

 

हा तो १५००० नुकसान झालेला पैसा नाही आहे तर लोकांनीच जास्तीचा दिलेला पैसा आहे.

तर जेव्हा नुकसान होतं तेव्हा तुम्ही दिलेल्या किमतीला तुम्ही कॉम्प्रोमाईज करून कमी किंमत घ्यायला तयार होतात. तेच जेव्हा फायदा होत असतो तेव्हा जास्त परताव्याच्या अपेक्षेने लोक त्याला जास्त पैसा द्यायला तयार असतात.

===

हे ही वाचा IPO म्हणजे नेमकं काय? आणि त्यात सामान्यांना शेयर्स कसे मिळतात, जाणून घ्या!

===

हाच फरक आहे, नुकसान झालेला पैसा कुठेही गेलेला नसतो, फक्त एक व्हर्च्युअल पोकळी निर्माण झालेली असते जिथे तुमच्या शेअरला कमी किंमत मिळत असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?