' ‘सर्वात धडाडीचे’ म्हणून प्रसिद्ध असणारे नगराळे ३ वर्षांपूर्वी एका चुकीमुळे मागे पडले होते – InMarathi

‘सर्वात धडाडीचे’ म्हणून प्रसिद्ध असणारे नगराळे ३ वर्षांपूर्वी एका चुकीमुळे मागे पडले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मेरी ट्रान्सफर कहीभी करलो, रईस को नाही छोडुंगा’, अशा थाटात नवझुद्दीन सिद्दीकी आपल्या सिनियर ऑफिसर्सना त्यांच्या तोंडावर सांगतो.

सिंघम, गंगाजल आपण बघितला असेलच त्यामध्ये  सुद्धा एका इमानदार आयपीस ऑफिसर्सची होणारी फरफट आपण बघितलीच आहे.

बदली प्रकार आपल्यालकडे तसा नवीन नाही, आयुक्तपदावर असणाऱ्या प्रशाकीय अधिकाऱ्यांना तर हे नव नाहीच. त्यांची मानसिक तयारीच बहुदा प्रशासकीय सेवेत आल्यावर झालेली असते.

 

nawaz 1 inmarathi

 

मुळात आयुक्तांची नेमणूक हाच एक प्रकार आपल्याकडे चर्चेचा असतो. कोणत्या शहरात, कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करायची यात सुद्धा अनेकवेळा राजकारण असते. गुन्हेगारी, कायदा सुव्यस्था, या गोष्टींचा विचार करून अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते.

सध्या परमबीर सिंग यांच्या बदलीवरून अनेक स्तरावर चर्चा होत आहे. गेल्याच वर्षी सुशांत सिंग प्रकरणात त्यांची नेमणूक झाली होती. विरोधी पक्षाने हे प्रकरण उचलून धरले, सीबीआय चौकशीची मागणी देखील केली मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

 

hemant inmarathi 1

हे ही वाचा – पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील ही सन्मानचिन्हे देतात त्यांच्या पदाची ओळख!

सुशांत सिंग प्रकरणावरून मुंबई पोलिसांबद्दल अनेक उलट्यासुलट्या बातम्या येऊ लागल्या होत्या, आता सचिन वाझे प्रकरणावरून सुद्धा पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना टार्गेट केले जात आहे.

आता पुन्हा एकदा हिरेन प्रकरणावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या नगराळेंना आताच्या विरोधी पक्षानेच सत्तेत असताना बडतर्फ केले होते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. इंजिनियरिंगची पार्श्ववभूमी असलेले हेमंत १९८७ सालच्या आयपीएस बॅचमधून पास आउट झालेत. पासआऊट झाल्यावर त्यांची पहिलची नेमणूक त्यांच्याच चंद्रपूरच्या  नक्षलवादी भागात झाली.

 

nax inmarathi

 

१९९२ मध्ये त्यांची नेमणूक सोलापूर त्यानंतर रत्नागिरी येथे करण्यात आली. प्रामुख्याने कायदा व सुव्यस्था बघणायचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते जे त्यांनी यशस्वीरीत्या पार पडले होते.

काही काळ त्यांची  सीबीआय यामध्ये सुद्धा घेण्यात आले होते. सीबीआय मध्ये असताना त्यांनी अनेक केसेसचा तपास केला आहे त्यात प्रामुख्याने केतन पारेख, हर्षद मेहता ,मधुपुरा बँक घोटाळा अशा अनेक केसेस त्यांनी हाताळल्या आहेत.

 

hemant inmarathi 2

 

२६/११ च्या मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्य्यात त्यांनी ताज हॉटेलमध्ये  अडकलेल्या १०० लोंकाना सुखरूप बाहेर काढले होते.

बदली का झाली?

२०१६ साली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली. वाशी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेवर दरोडा पडला. हेमंत नागराळे यांनी अवघ्या दोन दिवसात गुन्हगारांना शोधून काढले. इतकी जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती पण एक छोटीशी चूक त्यांना महागात पडली.

विधानपरिषदेचे सदस्य व आमदार जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेली  कारवाई त्यांना महागात पडली. आमदार जयंत पाटील हे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत, ‘बँकेच्या कर्जवसूली मध्ये गैरवव्यहार करण्यात आले आहेत’, असा आरोप हेमंत यांनी जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला व तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला.

 

raigad inmarathi

 

विधान परिषदेच्या कोणत्याही आमदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी आधी विधानपरिषदेच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही. हे परवानगी हेमंत यांनी न घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती.

२०१८ साली त्यांची बदली करण्यात आली आणि आज २०२१ साली थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाली. २०१८ साली जेव्हा  बदली करण्यात  आली होती तेव्हा आताचे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते आणि आज योगायोगाने त्यांची बदली थेट मुंबई च्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे राजकारणी लोक आपला कसा फायदा करून घेतील सांगू शकत नाही. आपले छुपे अजेंडे, आपली न होणारी काम आपला लाडका अधिकारी नेमल्यावर काही दिवसातच पूर्ण होतात.

 

tukaram inmarathi

 

तुकाराम मुंढे हे तर कायमच चर्चेत असलेले नाव, अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर असलेले तुकाराम मुंढे साधारण कोणत्या ही ठिकाणी बदली झाल्यावर सलग ५ वर्ष टिकत नाहीत. सामान्य जनतेचा त्यांना असणार प्रचंड पाठिंबा बहुदा राजकारणी लोकांना आवडत नसावा, म्हणूच त्यांची सतत बदली होत असते.

हेमंत नागराळे यांची नुकतीच नियुक्ती झाली असल्याने लवकरात लवकर ते या प्रकरणाचा निष्पक्ष छडा लावतील अशीच अपेक्षा ठेवुयात.

===

हे ही वाचा – राजकारणी + गुन्हेगार + पोलीस = कुणाचं तरी “एन्काऊंटर”!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?