' ६७ वर्षांत अंघोळही न करणारा तो, आरशात स्वतःला न्याहाळून कसं दिसायचं ते ठरवतो! – InMarathi

६७ वर्षांत अंघोळही न करणारा तो, आरशात स्वतःला न्याहाळून कसं दिसायचं ते ठरवतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आणि विचारांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. सध्या सगळेच जण आपल्या ‘लुक’बद्दल नेहमीच सतर्क असतात. चांगलं रहाणं, सुंदर दिसणं हे सध्या फक्त मुलींचं, महिलांचं काम राहिलेलं नसून सध्या मुलांना, पुरुषांना सुद्धा व्यवस्थित राहण्याचं महत्व पटलं आहे.

आज मुलांमध्ये दाढी वाढवण्याचा ट्रेंड आला आहे. पण, त्यामध्ये सुद्धा एक स्टाईल आहे. ‘सेल्फी’ची सुरुवात झाल्यापासून तर प्रत्येक जण आपल्या चेहऱ्यावरील डागांबद्दल सुद्धा खूप काळजी करताना दिसत आहे. रोज जे काही घडेल त्याचे न चुकता फोटो काढणे, स्टेटसला लावणे हे मागच्या काही दिवसात लोकांचं एक वाढलेलं काम आहे.

 

selfie of modi with actress inmarathi

 

एकीकडे जग टापटीप राहण्यासाठी हवं ते करायला तयार आहे, तर इराणमधील एक व्यक्ती अशी आहे जी रोज आंघोळ करायचा सुद्धा कंटाळा करत आहे. तेसुद्धा एक-दोन दिवस नाही, तर तब्बल ६७ वर्षांपासून एका व्यक्तीने आंघोळ केलेली नाही. हे कदाचित ऐकताना खोटं वाटेल, पण हे एक सत्य आहे. जगातील सर्वात ‘अस्वच्छ’ माणूस म्हणून त्याने नुकतंच एका भारतीय व्यक्तीला मागे टाकलं आहे.

इराण देश म्हटल्यावर कदाचित काही जणांना वाळवंटी प्रदेश, पाण्याची अडचण वगैरे वाटत असेल. पण, तेही कारण नाहीये. आखाती देशात काही लोकांना आंघोळीचा कंटाळा असतो. ते दिवसभर अत्तराचा वापर करून स्वतःला सुगंधित ठेवत असतात. पण, निदान हे लोक दर शुक्रवारी न चुकता आंघोळ करत असतात.

आपल्या भारतात सुद्धा मराठवाडा सारखे पाणीटंचाई असलेले भाग आहेत. तिथले लोक सुद्धा असे अस्वच्छ नाहीत. प्रत्येक जण आपल्या आरोग्याबद्दल, स्वच्छतेबद्दल जागरूक आहेत.

 

bathing-inmarathi

 

===

हे ही वाचा – या सुंदर महिलांना अंघोळ करण्यास “सक्त मनाई” आहे…

===

कोण आहे ही ‘अस्वच्छ’ व्यक्ती? का केलं असावं त्यांनी असं?

दक्षिण इराणमधील दजगाह या गावात ‘अमो हाजी’ नावाची एक ८० वर्षांची व्यक्ती राहते. या माणसाला ६० वर्षांपासून आंघोळ घालण्याचे कित्येक प्रयत्न लोकांनी केले आहेत. पण, तो प्रत्येक वेळी काहीतरी करून तिथून निघून जातो.

‘पाणी आवडत नाही’ असं तो लोकांना सांगत असतो. जिवंत राहण्यासाठी तो रोज ५ लिटर पाणी पितो. पण, आंघोळ म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येतो. ऐकावं ते नवलच!

‘अमो हाजी’च्या अजून विचित्र सवयी म्हणजे त्याला आपल्यासारखं ताजं अन्न खायची सुद्धा आवड नाहीये. साळिंदराचे मांस खाणे, ५ लिटर पाणी पिणे आणि वाटेल तेव्हा, वाटेल तिथे झोपणे असा त्याचा दिनक्रम आहे.

 

amo haji inmarathi

 

स्वतःला जिवंत ठेवण्यापलीकडे कोणतीही जबाबदारी नसलेला माणूस अजून काय करणार? आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला इतक्या वर्षात कधीच कोणताही आजार किंवा रोग झालेला नाही.

‘अमो हाजी’बद्दल ज्यांनी संशोधन केलं आहे त्यांचं म्हणणं आहे, की ‘हेअरकट’ची वेळ आली की हा मनुष्य अतिरिक्त केस जाळून टाकतो.

कित्येक वर्षांपासून त्याने एक कारच्या आरशाचा तुकडा जपून ठेवला आहे. तो त्यामध्ये स्वतःला बघत असतो आणि आता आपण कसं दिसावं? हे ठरवत असतो.

‘अमो हाजी’च्या व्यक्तिगत आयुष्यात अशा काही निराशाजनक घटना घडल्या, की त्याला ‘रुटीन’चा कंटाळा आला अशी माहिती दजगाह या गावातील स्थानिकांनी हे संशोधन सुरू असताना दिली होती.

‘तो अगदीच निडर आहे. कारण, त्याच्याकडे हरायला स्वतःचं असं काहीच शिल्लक नाहीये’ असं काही समवयस्क त्या व्यक्तीबद्दल बोलतांना सांगतात.

‘कैलाश सिंघ’ ही भारतातील अजून एक व्यक्ती आहे, ज्यांच्या नावावर या आधीच्या ‘जास्तीत जास्त वर्ष आंघोळ न करण्याचा’ विक्रमाची नोंद होती. कैलाश सिंघला सुद्धा पाण्यात जाण्याची अजिबात आवड नाही. त्याने ३८ वर्षांपासून स्वतःला अंघोळीपासून लांब ठेवलं आहे.

 

kailash singh inmarathi

 

यामध्ये काहीच धन्यता किंवा शिकण्यासारखं नाही. वाईट सवयीचं आपणच लावलेल्या एका रोपाचं झाड कसं तयार होतं, त्याचं उदाहरण म्हणून आपण या दोन व्यक्तींकडे ‘दुरून’ बघू शकतो.

===

हे ही वाचा – बिर्याणीतल्या अळ्या नि चिकन सोडा! हे लोक जे खातात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही!

===

‘अमो हाजी’ असं राहण्यामागचं कारण विचारलं तेव्हा त्याने माहिती दिली होती, की ‘तो प्रेम शोधतोय आणि ते त्याला कधी मिळालंच नाही.’
कसं मिळणार? कोणाला आवडेल असा विचित्र मनुष्य? यापेक्षा प्राणी चांगले म्हणावेत, ठराविक वेळाने ते पाण्यात डुंबत राहतात आणि स्वतःला स्वच्छ ठेवतात.

गावकरी लोक ‘अमो हाजी’ला जाता येता बघून जात असतात. सहाजिकच, त्याला कोणी मित्र नाहीत. सिगारेटसारखं काही तरी जाळून धूर करत असतो असं लोक म्हणतात. १९५४ मध्ये शेवटची आंघोळ केलेल्या व्यक्तीच्या बाजूला कोण किती वेळ उभं राहू शकणार नाही का?

 

amo haji sleeping inmarathi

 

लोकांनी आणून दिलेले कपडे वापरून तो स्वतःचं उन्हापासून संरक्षण करत असतो. इराणच्या वाळवंटात राहणारी ही व्यक्ती एका जुन्या, पडक्या घरात राहते. युद्धात वापरण्यात येणारं एक हेल्मेट कोणीतरी त्यांना दिलं आहे आणि ते त्याच्याद्वारे थंडीपासून स्वतःचं संरक्षण करत असतात.

‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही ओळ आपण ऐकून होतो. जगात कोणी या ओळीला इतकं तंतोतंत जगत असेल हे आज पहिल्यांदाच कळत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?