अजबच गोष्ट! चक्क “पोलीसच” मोजायचे बायकांच्या स्कर्टची लांबी..!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणत्या प्रकारचे कपडे वापरावेत? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही उंची, भारी कपडे वापरत आहात आणि त्यामध्ये तुमचा वावर ‘सहज’ नसेल तर तुम्ही लोकांना सुंदर वाटणारच नाहीत.
साडी नेसण्यापेक्षा त्यामध्ये तुम्ही साडी नेसल्यावर किती सहज चालता यावर तुमचं सौंदर्य ठरत असतं.
महिलांच्या फॅशनबद्दल जगात नेहमीच खूप जास्त बोललं जातं, अपेक्षा सांगितल्या जातात आणि काही ठिकाणी कडक नियम सुद्धा लावले जातात. पुरुषांना एक तर टी-शर्ट, जीन्स किंवा फॉर्मल ड्रेस हे दोनच पर्याय सर्वसाधारणपणे उपलब्ध असतात.
सौदी अरेबिया मध्ये महिला बुरखा घातल्याशिवाय रस्त्यावरुन चालू शकत नाहीत. पुरुषांना आपली नजर सुधरवणं शिकवण्यापेक्षा महिलांवर निर्बंध लावणं हा सोपा उपायच जगात नेहमी लागू केला जातो.
कोणतेही कार्यालय, महाविद्यालयातसुद्धा मुलींच्या ड्रेस बद्दल नेहमीच नवीन नियमावली जाहीर होतांना आपण बघत असतो.
१९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात एका त्रस्त मुख्याध्यापकाचा “कॉलेज मध्ये शॉर्ट स्कर्ट चालणार नाही” हा सतत सांगितलेला नियम कदाचित आपल्या लक्षात असेल.
या सिनेमात दाखवलेलं कॉलेज प्रत्यक्षात कुठे असेल का? हा एक प्रश्न त्या काळात खूप गाजला होता. असे कॉलेज नंतर तयार झाले असावे.
पण, असा एक देश आहे जिथे मुलींच्या स्कर्ट ची लांबी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. कोरिया या देशाबद्दल आम्ही सांगत आहोत जिथे ७० च्या दशकापासून ‘फॅशन पोलीस’ची नेमणूक करण्यात आली आहे हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल.
–
- जोक-वर बंदी ते पॉर्न साठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे १४ विचित्र कायदे!
- सौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले कल्पनेपलीकडील काही कठोर नियम!
–
मुलींच्या शॉर्ट स्कर्टबद्दल असलेली ही बंदी कोरिया मध्ये विनंती स्वरूपात नसून एका कायद्याच्या रुपात होती. सरकारने स्कर्टची लांबी ठरवून दिली होती त्यापेक्षा कमी लांबीचा स्कर्ट चालणार नाही असा एक नियम जाहीर करण्यात आला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शॉर्ट स्कर्टची ही बंदी कपडे तयार करणाऱ्या किंवा कपडे आयात करणाऱ्या कंपनीवर न लादता ती सामान्य ग्राहकांवर लादण्यात आली होती.
तुमच्या स्कर्टची लांबी किती? हे चक्क ‘मेजरिंग टेप’ घेऊन पोलीस चेक करायचे. आपल्या भारत देशात असं काही कधी झालं नाही याबद्दल आपण स्वतःला नशीबवान मानलं पाहिजे.
काय होता हा कोरिया मधली शॉर्ट स्कर्टचा कायदा?
१९७० मध्ये पार्क चँग ही यांच्या राजवटीत हा कायदा पास करण्यात आला होता. ज्याचा मूळ उद्देश हा होता की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांना संकोच वाटू नये म्हणून मुलींनी छोटे कपडे घालू नयेत आणि पुरुषांचे केस लांब असू नयेत.
या दोन्ही अटी न पाळणाऱ्या स्त्री पुरुषांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जायचा आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जायचं.
“तुमचं सामाजिक वर्तन हे कोणत्याही पद्धतीने अवमानकारक आणि अशोभनीय असू नये” अशी अपेक्षा पार्क चँग यांची होती. ही अपेक्षा त्यांनी स्वतःपुरती न ठेवता त्यांनी हे त्यांच्या देशाच्या नागरिकांना, पर्यटकांना एक कायदा करून सांगितली होती.
२०२१ मध्ये सुद्धा हा कायदा अस्तित्वात आहे. छोट्या स्कर्ट घालणाऱ्या महिलांना ५०,००० युएस डॉलर्स इतका दंड आजही कोरिया मध्ये आकारण्यात येतो.
कमालीची गोष्ट म्हणजे पार्क चँग ही यांच्या मुलीने म्हणजे पार्क गेउन्हये हिने सुद्धा सत्तारूढ झाल्यावर या कायद्यात कोणताही बदल केला नाही. एक महिला ही दुसऱ्या महिलेला शिक्षा होतांना बघते, आनंदी होते आणि कायदा अजून कडक करते हे कोरियाच्या लोकांनी मागील काही वर्षात अनुभवलं आहे.
फॅशन पोलीस हा कोरियाच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग तेव्हाही होता आणि आजही आहे. नागरिकांना इतकं दडपून ठेवण्यात आलं आहे की, याबद्दल कोणीही काही आवाज देखील उठवू शकत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कामानिमित्त तिथे असलेले आपले भारतीय लोक हे रोजच “सारे जहा से अच्छा, हिंदोस्ता हमारा…” हे निदान मनातल्या मनात म्हणत असतील.
एका बातमीनुसार, कोरिया मधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका महिला कलाकाराने वेळेअभावी उपलब्ध असलेला छोट्या लांबीचा स्कर्ट वापरला होता.
तो विडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि तो व्हिडीओ बघून पोलिसांनी महिला कलाकार आणि आयोजकांवर कारवाई केली होती. काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण तसं अजिबात नाहीये.
सॅमसंग या फोन तयार करणाऱ्या कोरियन कंपनीने २००७ मध्ये एक जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीमध्ये त्यांनी १९७० चा काळ दाखवला आहे.
आजच्या सारखे सीसीटीव्ही तंत्रज्ञान तेव्हा नसल्याने पोलीस त्या काळात प्रत्येक स्कर्ट मधील मुलीला थांबवून स्कर्ट ची लांबी तपासायचे आणि मगच त्यांना रोड वर जाण्याची परवानगी द्यायचे.
हे चित्रण त्यांनी एका विनोदी पद्धतीने सादर केलं आणि लोकांना ही जाहिरात खूप आवडली होती. कायद्याचं पालन करण्याचं आवाहन या जाहिरातीत होतं आणि फोनद्वारे ही माहिती एकाच वेळी जास्त लोकांना कशी सांगता येईल? ही या जाहिरातीची थीम होती.
इंग्लंड मध्ये सुद्धा एकेकाळी मिनी स्कर्टवर निर्बंध लावण्यात आले होते. पण, तिथल्या जनतेने या गोष्टीचा कडाडून विरोध केला आणि सरकार ने हा कायदा मागे घेतला होता.
कोरियातील लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सरकार ने काही निर्बंध शिथिल केले आहेत. ज्या कंपनीना आपल्या जाहिरातीसाठी मुलींनी स्कर्ट घालण्याची परवानगी आहे ते एक रक्कम भरून ती परवानगी मिळवू शकतात असा कायदा करण्यात आला आहे.
एल जी कंपनीने या बदललेल्या कायद्याचा वापर करून एक मार्मिक जाहिरात केली होती. आपल्या फोन मधील डुप्लिकेट फोन कसे ओळखावेत? याबद्दल दोन मुलींच्या फोटो आधारे या जाहिरातीत सांगण्यात आलं होतं.
LTE या ब्रँड च्या जाहिरातीत लांब स्कर्ट असलेल्या मुलीच्या हातातील फोन हा डुप्लिकेट दाखवण्यात आला आणि छोट्या स्कर्ट मधील मुलीच्या हातातील फोन एल जी कंपनीचा आहे हे दाखवण्यात आलं आहे.
–
- इथे देश सोडण्यास मनाई आहे : ‘उत्तर कोरिया’तील हादरवून सोडणारी हुकूमशाही
- असं नेमकं काय घडलंय की नॉर्थ कोरियात चक्क ११ दिवस हसण्यावर बंदी आली
–
“जे सत्य असतं ते सगळीकडे उपलब्ध असतं” अशी या जाहिरातीची टॅगलाईन होती. कोरियामधील मुलींसाठी ही जाहिरात एक प्रकारे “मॉडर्न व्हा, जे मनाला वाटतं ते वापरा” हा संदेश देणारी ठरली.
जुन-ही-ह्युन या दक्षिण कोरियाच्या यशस्वी महिला कलाकाराने ही जाहिरात केल्याने लोकांपर्यंत हा संदेश व्यवस्थीतपणे पोहोचवला होता.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.