यामुळे पण घटस्फोट होऊ शकतो… ही विचित्र कारणं ऐकाल, तर चक्रावून जाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या देशात लग्न ह्या संकल्पनेला आणि या शब्दाला खूप महत्व आहे. जेवढा विश्वास आणि महत्व लग्नाला आहे तेवढेच किंबहुना त्याहून जास्त तेढ आणि राग घटस्फोट या शब्दाबद्दल आहे.
या जगात अनेक चित्र विचित्र लग्नाच्या जोड्या तयार होतात. मात्र यापेक्षा अप्रूप वाटणारी गोष्ट म्हणजे अगदी क्षुल्लक आणि हास्यास्पद कारणावरून अनेकांचे घटस्फोट देखील होतात.
याची कारणं वाचाल, तर हसावे की रडावे असे गोंधळून जाल. आज आपण या लेखातून असेच काही मजेशीर घटस्फोटाची करणे बघणार आहोत.
पतीला टक्कल पडले म्हणून
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या टक्कल असलेल्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली. महिलेने सांगितले, की पतीने तिला त्याच्या टक्कल असण्याबाबत कोणतीच कल्पना दिली नव्हती.
लग्नावेळी पतीच्या दाट केसांचे गुपित महिलेला समजल्यानंतर ती म्हणाली, की तो विग घालत होता. हे वाचून नक्कीच तुम्हाला बाला सिनेमा आठवला असेल ना?
पत्नी जास्त पार्टी करायची
मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने घटस्फोट घेण्याचे कारण दिले होते, की त्याची पत्नी जास्त पार्ट्या करते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या फॅमिली हायकोर्टाचा घटस्फोटाचा निर्णय बदलत घटस्फोट देण्यास नकार दिला. पत्नीच्या पार्टी करण्यामुळे पतीसोबत कोणतीही हिंसा होत नाही.
===
हे ही वाचा – या १० पैकी एकही गुण असलेल्या व्यक्तीशी चुकूनही लग्न करु नका. पश्चाताप होईल!
===
पतीने बियर सोडली म्हणून
मध्य प्रदेशच्या भोपाळमधील राहणारे एक जोडपे दिवसाआड सोबत बियर प्यायचे. मात्र एक दिवस पतीने बियर सोडण्याचा निर्णय घेतला. पत्नीने त्याला बियर घेण्यासाठी खूप समजावले तरी पती बियर पीत नसल्याने नाईलाज झालेल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
पती अनेक दिवस आंघोळ करत नाही म्हणून
बिहारमधील एक महिला तिचा पती १०-१० दिवस आंघोळ करत नसल्याने बेजार झाली होती. म्हणूनच तिने घटस्फोटासाठी अर्जही केला. महिला सांगत होती, की तो आंघोळ करत नसल्याने त्याच्या शरीराची दुर्गंधी येते.
पत्नीच्या चेहऱ्यावरील पिंपल्स
एका पतीने घटस्फोट मागताना कारण दिले, की पत्नीने तिच्या त्वचा विकाराबद्दल लग्नाआधी सांगितले नाही. मात्र बॉम्बे कोर्टाने मंजूरी दिली नव्हती.
पत्नी पॅंट-शर्ट घालते
मुंबईत एका व्यक्तीने पत्नी नोकरीला पँट-शर्ट घालून जाते म्हणून घटस्फोट मागितला होता. पण बॉम्बे हायकोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता.
===
हे ही वाचा – ही ११ लक्षणं सांगतील तुमच्या ‘बेटर हाफ’चं बाहेर अफेअर सुरू झालंय!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.