”माझे वजन हा राष्ट्रीय मुद्दा झाला होता”, उलाला गर्ल विद्या उखडली ट्रोलर्सवर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजच्या काळात बॉलिवूडची प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणून सर्वात पहिले कोणाचे नाव येते तर विद्या बालनचे. बॉलिवूडच्या या उलाला गर्लने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांसह समीक्षकांनाही वेड लावले.
विद्याने ‘परिणिता या सिनेमापासूनच तिच्या अभिनयाची छाप बॉलिवूडवर सोडायला सुरुवात केली. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत अभिनयाच्या बाबतीत नेहमी उजवी ठरणाऱ्या विद्याला देखील अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. विद्याच्या वजनावरून तर ती अनेकदा बॉडी शेमिंगचा शिकार झाली.
विद्याने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या वाढलेल्या वजनावर भाष्य केले. ती म्हणाली, “जेव्हा माझ्या वजनावर टीका होत होती, त्यावेळी ती टीका मला खूपच सार्वजनिक आणि अपमानास्पद वाटत होती. मी अशा मध्यमवर्गीय घरातून आली आहे, जिथे चित्रपटांशी दूर दूर पर्यंत कोणाचाच कोणताही संबंध नव्हता. कदाचित म्हणूनच या क्षेत्रातला अंतिम टप्पा कोणता, हे मला सांगणारे माझ्याजवळ माझे असे कोणी नव्हते. माझे वजन एक राष्ट्रीय मुद्दा तयार झाला होता.”
मुलाखतीत विद्या पुढे म्हणाली, “मी सुरुवातीपासूनच एक वजनदार मुलगी होते. मी असे कधीच सांगणार नाही की, माझे वजन कधीच कमी झाले नाही किंवा वाढले देखील नाही. याबद्दल मी कधीच चिंता सुद्धा केली नाही. मात्र, आता मी त्यासर्व गोष्टींपासून बरेच अंतर पुढे निघून आले आहे.”
–
हे ही वाचा – स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!
–
विद्या तिच्या वजन वाढीचे कारण सांगताना म्हणाली, “‘मला आयुष्यात अनेक हार्मोनल समस्या आहेत. या कारणामुळे देखील अनेकदा वजन कमी-जास्त होतच असते. माझे वजन वाढल्यानंतर मी बराच काळ माझ्या शरीराचा द्वेष केला. मला असे वाटायचे की, माझ्या शरीराने माझा विश्वासघात केला आहे. ज्या दिवसापासून माझ्यावर मी सर्वोत्तम दिसण्यासाठी दबाव वाढायला लागला, त्याच दिवसापासून माझे वजन वाढायला लागले. तेव्हा मला स्वतःचा आणखी राग यायचा आणि मी जास्तच निराश व्हायचे.’
बॉडी शेमिंग कसे हाताळले याबद्दल विद्या म्हणाली, “मला काही गोष्टी समजल्या होत्या. त्यामुळं मी सकारात्मक होऊन स्वतःवर प्रेम करायला आणि शरीर जसे आहे तसे स्वीकारायला सुरुवात केली. तेव्हापासून लोकदेखील माझा स्वीकार करू लागले. त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माझे कौतुक करण्यास सुरुवात केली.
काही काळाने मी स्वतःशी एक गोष्ट कबूल केली की, माझे शरीर ही अशी गोष्ट आहे, ज्याने मला जिवंत ठेवले. कारण ज्या दिवशी शरीर काम करणे थांबवेल, त्या दिवशी मी कोठेही जाऊ शकणार नाही, हे मी मान्य केले. म्हणून मी माझ्या शरीराची खूप आभारी आहे,”
विद्याने दिलेली ही मुलाखत अनेक तरुणींना उपयुक्त ठरणारी आहे. आज अनेक तरुणी बॉडीशेमिंगच्या जाळ्यात अडकतात, परिणामी स्वतःचा द्वेष करतात, अशा मुलींना विद्याने दिलेले हे कानमंत्र नक्कीच उपयोगी ठरतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.