' असाही लॉकडाऊन इफेक्ट : झूमचा मालक जगात १३०वा श्रीमंत! – InMarathi

असाही लॉकडाऊन इफेक्ट : झूमचा मालक जगात १३०वा श्रीमंत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘काय रे झूम कॉल करायचा का? मीटिंगच काय आजच? ‘ अशी वाक्य साधारण मागच्या वर्षीपासून कानावर पडताना दिसून येतात. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे तर आज झूम सारख्या अँप्लिकेशनचा सर्रास वापर केला जातो.

मागील वर्षी साधारण मार्च महिन्यातच संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. त्यामुळे सर्वच घरी होते, ज्यांचे जॉब राहिले त्यांना घरून काम करण्यास सांगितले, बर काम घरून असले तरी रोजच्या मिटींग्स तरी कशा घेणार? फोन वर एका वेळी जास्तीत जास्त ३,४ जणांचाच  कॉन्फेरंस कॉल घेऊ शकतो. तसेच नुसते फोन वर बोलून कधी कधी ताळमेळ जुळत नाही त्यासाठी समोरासमोर असावे लागते.

 

zoom app inmarathi 5

 

सगळ्यांसमोर मीटिंग कशा घेता येतील हा प्रश्न होता, तेव्हा या अँप्लिकेशनने सर्वांचा प्रश्न सोडवून टाकला, तर अशा या झूमचा मालक आज जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत येत आहे.

 

काय आहे नक्की झुम?

झूम ही अमेरीकन कंपनी असून, आश्चर्य म्हणजे याचा मालक हा चायनीज आहे. ही कंपनी प्रामुख्याने वेब चॅट ही सेवा पुरवते. कंपनीचे हेडऑफिस सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे आहे.

 

एरिक युवान:

 

zoom 2 inmarathi

हे ही वाचा – क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

एरीक युवान यांचे बालपण चीनमध्येच गेले,  व्यवसायाने ते इंजिनियर आहेत. बिल गेट्स यांच्या एका भाषणाने त्यांना अमेरिकेत येऊन काम करण्यास भाग पडले.

अमेरीकेत  येऊन त्यांनी वेबेक्स कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळवला. मुळातच स्वतः मध्ये संशोधक प्रवृत्ती असल्याने त्यांनी आपल्या रोजच्या वापरातील स्मार्टफोन मधून video conferencing करता येईल अशी एक भन्नाट आयडिया शोधून काढली. जी कंपनीने धुडकावून लावली.

जिथे आपल्या संकल्पनांना वाव नाही तिचे राहणे योग्य नाही. म्हणून कदाचित ते वेबेक्स मधून बाहेर पडले व त्यांनी स्वतःची झूम ही कंपनी चालू केली.

आपल्याकडे म्हंटले जातेच जो होता हैं वो अच्छे केलीये ही होता हैं… वेबेक्स मध्ये जर राहिले असते तर आज स्वतःची कंपनीसुद्धा काढता आली नसती.

एरिक युवान आज आपले पर्सनललाईफ सुद्धा एन्जॉय करत आहेत. त्यांचे लग्न  झाले असून त्यांना तीन मुले देखील आहेत.

 

zoom 3 inmarathi

 

५१ वर्षीय एरीक युवान जगातील मेगाश्रीमंतांच्या यादीत येतात.

 

झूमची लोकप्रियता :

मागच्या कोविडच्या काळात अनेक मिटींग्स तसेच शाळासुद्धा ऑनलाईन झाल्याने अनेक शैक्षणिक संस्थांनी झूमचा पर्याय निवडला.

झूम ची लोकप्रियता व वापरकर्ते काही दिवसात कोटींच्यावर गेले कारण लॉकडाऊनच्या काळात कोणतेच असे अँप्लिकेशन लोंकाना पटत नव्हते, अचानकच झूमचा वापर वाढू लागला व झूम लोकप्रिय होऊ लागले.

 

zoom inmarathi 5

हे ही वाचा – साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

आज मोठ्या मोठ्या बिजनेस  मिटींग्स झूमवर होताना आपण बघतोच, त्यामुळे त्या मिटींग्स सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा देखील तितकेच महत्वाची, झूमवर मिटींग्स या सुरक्षित आहेत त्यासाठी आपण पण तितकीच खबरदारी घेतली पाहिजे, त्यांचे सुरक्षेचे नियम नीट वाचून समजून घेणे अपेक्षित आहे.

मार्केटमधील स्थान :

सुरवातीला प्रायव्हेट असलेली ही कंपनी नंतर पब्लिक कंपनी झाली. तेव्हाचे मार्केट शेअर ३६ अमेरिकन डॉलर एवढे होते, २ वर्षात शेअर्सची किंमत कुठच्या कुठे गेली. मागच्या शुक्रवारी शेअर्सची किंमत ६ अब्ज डॉलर्स इतकी मोठ्या प्रमाणवर होती.

खरतर मागचे वर्ष सर्वांसाठीच खूप निराशेचे व दुःखदायक होते अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींनी घरातील जवळच्या व्यक्ती गमावल्या.

 

zoom 6 inmarathi

 

आज थोडेफार उद्योगधंदे स्थिरावत आहेत, तर एकीकडे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट येणार का अशी भीती जाणवत आहे. जसे या लॉकडाउनचे तोटे सर्वाना भासले तरी फायदे सुद्धा झालेच, अनेकांनी आपल्या सुप्त गुणांना वाव दिला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या म्हणून न थांबता ते आत्मनिर्भर बनले.

कोणतीही आपत्ती येते ती सर्वानांच काही ना काही शिकवून जात असते. आता आपण ठरवायचे काय शिकायचे ते.

===

हे ही वाचा – ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?