' सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे! – InMarathi

सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या फिल्म इंडस्ट्रीत होणाऱ्या कित्येक रिमेक फिल्म्सकडे बघून हिंदी चित्रपटातलं एक गाणं कायम आठवतं ते म्हणजे “देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इंसान!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोकांच्या कल्पकतेला गंज चढला आहे असंच काहीसं चित्र सध्या बघायला मिळतंय. हातावर मोजण्याइतके काहीच फिल्ममेकर्स आहेत जे खरंच काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करू पाहतायत, बाकी इतर सॉ कॉल्ड फिल्ममेकर्स तर नुसतं रिमेकवर रिमेक बनवत चालले आहेत.

शाहिदच्या कबीर सिंग या रिमेक नंतर जर्सी नावाचा साऊथच्या फिल्मचा रिमेक येणार आहे, नुकतंच साऊथच्या बहुचर्चित RX100 या सिनेमाच्या हिंदी रिमेक ‘तडप’चं पोस्टर रिलीज झालंय, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटीवर सुद्धा रिमेकचा सुळसुळाट दिसू लागला आहे.

 

remakes inmarathi

 

परिणीती चोप्राचा नुकताच The Girl On the Train या इंग्रजी सिनेमाचा नावही न बदलता केलेला रिमेक नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

रिमेक करायला ना नाही, पण ओरिजिनल कथेच्या आत्म्याला धक्का न लावता दृश्यमसारख्या सिनेमाचा रिमेक करणारे निशिकांत कामतसारखे गुणी फिल्ममेकर्सदेखील आवश्यक आहेत तरच त्या रिमेकला अर्थ असतो!

===

हे ही वाचा या १० सुपरहिट हिंदी चित्रपटांची खरी कहाणी ‘वेगळ्याच वाटेने’ आलेली आहे

===

असो आज आपण अशा एका सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे भारतात आजवर ३ रिमेक बनले. त्यातला सर्वात पहिला रिमेक तर कधी आला कधी गेला हे सुद्धा लोकांना आठवणार नाही, पण दुसऱ्या रिमेकने फिल्मी जगतात खूप रेकॉर्डस तोडले!

तो सिनेमा म्हणजे अमिताभ बच्चन हेमा मालिनी यांचा ‘सत्ते पे सत्ता’. आजही या ७ भावांची भन्नाट गोष्ट सांगणारा हा सिनेमा आठवला की लोकांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य येतं. हा असा एकमेव सिनेमा ज्यात खुद्द अमिताभने हीरो आणि व्हिलन अशा दोन्ही भूमिका वठवल्या.

 

satte pe satta inmarathi

 

सिप्पी बंधु दिग्दर्शित १९८२ सालच्या या सिनेमात अमिताभ, सचिन, शक्ति कपूर, अमजद खान, हेमा मालिनी, कंवलजीत सिंग असे मातब्बर कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं. संगीतातले महारथी पंचम म्हणजेच आर.डी.बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं. दिलबर मेरे, प्यार हमे कीस मोड पे ले आया ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहे.

याच सिनेमावर २००८ सचिन पिळगावकर यांनी ‘आम्ही सातपुते’ नावाचा रिमेक मराठीत केला, त्या सिनेमाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही, पण सत्ते पे सत्ता हा सिनेमा कायम लोकांच्या आठवणीत राहिला!

सत्ते पे सत्ता हा “Seven brides for seven brothers” या १९५४ सालच्या इंग्रजी म्युझिकल ड्रामावरून घेतला होता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती आहे.

 

seven brides for seven brothers inmarathi

 

पण सत्ते पे सत्ताच्याही आधी हिंदीमध्ये याच इंग्रजी सिनेमावर बेतलेला आणखी एक रिमेक झाला होता, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल!

१९५४ सालचा ‘नास्तिक’ हा हीट सिनेमा देणाऱ्या आय.एस. जोहर यांना कोण ओळखत नाही. कित्येक सिनेमात छोटी मोठी भूमिका करणारे अभिनेता, निर्माता, लेखक, दिग्दर्शक आय.एस.जोहर यांचा नास्तिक हा सिनेमा खूप हीट होता.

 

i s johar inmarathi

 

या सिनेमात मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या अजित यांना नंतर इंडस्ट्रीमध्ये व्हिलनची ओळख मिळाली होती, शिवाय नलिनी जयवंत आणि अजित ही जोडीदेखील त्यावेळेस लोकप्रिय झाली होती!

जोहर यांना या सिनेमाच्या यशानंतर मद्रास मॉडर्न पिक्चर्सची एक ऑफर आली आणि ती त्यांनी स्वीकारली आणि त्यामुळे “Seven Brides For Seven Sisters” याचा पहिला रिमेक “कितना बदल गया इंसान” रुपेरी पडद्यावर आला.

यातही अजित आणि नलिनी जयवंत हीच जोडी कायम होती. नास्तिक सिनेमाच्या यशामुळे जोहर इतके आनंदी होते की त्यातल्या एका गाण्याच्या शब्दावरून या नवीन सिनेमाचे नावही तेच ठेवले – “देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इंसान!”

पण का कुणास ठाऊक वेगळं तंत्रज्ञान, चित्रीकरण, कथा, लेखक दिग्दर्शन सगळं काही वेगळ असूनही हा सिनेमा बॉक्सऑफिसवर इतका सपशेल आपटला की बऱ्याच लोकांना ठाउकही नाही की अशा नावाचा कोणता सिनेमादेखील होता!

 

kitna badal gaya insaan inmarathi

 

सत्ते पे सत्ता हीट झाला तेव्हाही या चित्रपटाची आठवण कुणीच काढली नाही आणि आम्ही सातपुते फ्लॉप झाला तेव्हादेखील कुणालाच हा सिनेमा स्मरणात नव्हता.

१९८४ साली जोहर यांचा मृत्यू झाला, एखादी कलाकृती इतकीही विस्मृतीत जाऊ शकते, याचं जीवंत उदाहरण म्हणजे हा सिनेमा. आजही या सिनेमाची आठवण कुणीच काढत नाही, हे पाहून आय.एस.जोहर वैकुंठातून हेच म्हणत असतील ‘कितना बदल गया इंसान’ नाही का?

===

हे ही वाचा चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?