‘मातृत्व नसलं तरीही तु परिपूर्ण आहेस’ हा संदेश देणारी ही जाहिरात पाहिलीत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मार्च महिना सुरु झाला की, चाहूल लागते ती ८ मार्चला साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाची. महिला दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम आखले जातात. मात्र मागच्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात आणि जाहिरातीच्या क्षेत्रातही महिलादिन विविध पद्धतीने साजरा केला जातो.
आता जाहिरात क्षेत्रच बघा ना, आपल्या उत्पादनाच्या जाहिरातींपर्यंत मर्यादित असणाऱ्या या क्षेत्रातही विविध महत्वाच्या दिवशी आपल्या उत्पादनाशी संबंधित जाहिराती आणण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोठ्या मोठ्या पुस्तकांमधून मिळणार संदेशदेखील कधी विसरता येऊ शकतो मात्र काही मिनिटांच्या जाहिरातींमधून मिळणारा संदेश कायमस्वरूपी लक्षात राहतो.
सध्या मोना सिंगची एक जाहिरात चांगलीच गाजत आहे. प्रेगा न्यूजची असणारी ही जाहिरात इनफर्टिलिटीचा संदेश देत आहे. अतिशय सुंदर, भावनात्मक आणि समर्पक शब्दात ही जाहिरात प्रेक्षकांसमोर आणली आहे.
सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीचा चांगलाच बोलबाला दिसत आहे. सर्वच स्तरातून या जाहिरातीचे खूप कौतुक होत आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने प्रेग्नेंसी टेस्ट किट तयार करणाऱ्या प्रेगा न्युज कंपनीने त्यांची ही जाहिरात आणत, मूल झाले नाहीतर स्त्री कधीच अपूर्ण नसते, ती स्वतः परिपूर्णच आहे. असा सुंदर मेसेज दिला आहे.
जगात अनेक स्त्रिया आहेत ज्या इनफर्टिलिटीच्या समस्येसोबत लढत आहे. अशा स्त्रियांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही जाहिरात एक सुंदर प्रेरणा आहे.
आई असण्याशिवाय स्त्रिया दुसऱ्या अनेक भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने निभावत असतात. मग या एका समस्येमुळे त्यांना वेगळे किंवा अपूर्ण का समजायचे? ज्या लोकांचे असे विचार आहेत त्यांना या जाहिरातीतून उत्तम आणि समर्पक उत्तर मिळाले आहे.
काय सांगते जाहिरात
लतिका (मोना सिंग) नावाची घरातली मोठी सून घराच्या सर्व लहान मोठ्या जबाबदाऱ्या नोकरी सांभाळून उत्तम पद्धतीने निभावत असते. सर्वांची लाडकी असणाऱ्या लतिकेच्या आयुष्यात सर्व काही असूनही ती एकटी असते.
काही दिवसातच घरातल्या लहान सुनेचे डोहाळे जेवण असते, त्याची तयारी पाहून लतिकाला तिच्यातले एकटेपण प्रकर्षाने जाणवू लागते. तेव्हा लहान सून लतिकाचे मन ओळखते आणि ती अपूर्ण नसून अधिक परिपूर्ण असल्याची जाणीव तिला आणि घरच्यांना करून देते.
ही जाहिरात प्रेगा न्युजने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत SheIsCompleteInHerself हा हॅशटॅग वापरला आहे.
खूपच कमी वेळातच या जाहिरातीला तुफान प्रतिसाद मिळला असून जाहिरातीचे आणि जाहिरातूनमधून देण्यात आलेल्या संदेशाचे खूप कौतुक होत आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.