' जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…! – InMarathi

जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गुजराती लोकांचे खाण्यावरचे प्रेम जगजाहीर आहे. त्यांना जगातले सगळे पदार्थ खायचे असतात. मात्र कधी कधी त्या पदार्थातील काही गोष्टी त्यांना वर्ज्य असतात. मग या पदार्थाचा आस्वाद कसा घेणार?

पण नाविन्य आणि कल्पना यांचा मेळ घालून तोच पदार्थ आपले भारतीय पदार्थ वापरून बनवता येईल का? तो कसा बनावता येईल याचा विचार करून तो ते पदार्थ बनवतातच. आणि आपली खवय्येगिरी पूर्ण करतातच.

कधीकधी त्यांचा हा प्रयोग इतका यशस्वी होतो की मूळ पदार्थापेक्षा त्याचं भारतीय व्हर्जनच जास्त लोकप्रिय होतं. ‘पिझ्झा’ आज कालचा सगळ्यात लोकप्रिय खाद्यपदार्थ. विशेषतः मुलांना तर भयंकर प्रिय. तीस वर्षांपूर्वी देखील भारतात पिझ्झ्याचे आकर्षण होतंच.

 

pizza-hut-inmarathi

 

त्या काळात दोन गुजराती महिलांनी भारतीय पिझ्झा बनवला. म्हणजेच ज्वारी बाजरीच्या भाकरी पासून त्यांनी पिझ्झा तयार केला आणि त्याची लोकप्रियता आजपर्यंत टिकून आहे.

या पिझ्झ्यामध्ये विशेष वेगळं असं काहीच नाही. पिझ्झा बेस म्हणून त्या बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी वापरतात. त्यावर टोमॅटो प्युरी पसरतात. मग त्यावर चीज पसरतात. त्यावर कांदा, सिमला मिरची घालून चाट मसाला भुरभरुन टॉपिंग म्हणून चक्क गुळ किंवा साखर ठेवतात आणि त्याला खुसखुशीत भाजून देतात.

भाकरीचा पिझ्झा ही इनोवेटीव आयडिया आणली ती जेशूबेन आणि अंदरेबेन या दोन महिलांनी. खरंतर जेशुबेनकडे अंदरेबेन आणि त्यांचे पती हे स्वयंपाकी म्हणून काम करायचे.

मुळातच स्वयंपाकाची आवड असणाऱ्या अंदरे बेन यांनी आपल्याला हा पिझ्झ्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे असे जेशूबेन यांना सांगितले. तसेच हे चालू करण्यासाठी आर्थिक अडचण आहे हे ही सांगितले. त्यांना जेशुबेन यांनी आर्थिक मदत दिली.

त्या काळात अहमदाबादमध्ये पिझ्झाची क्रेज नुकतीच सुरु झाली होती. अंदरेबेन यांना हाच व्यवसाय सुरू करायचा होता.

===

हे ही वाचा मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर

===

पिझ्झाच, पण त्याला वेगळा ट्विस्ट देऊन त्यांना ते स्ट्रीट फुड म्हणून विकायचे होते. पण पिझ्झा बेक करण्यासाठी लागणारा ओव्हन घेण्याची आर्थिक क्षमता देखील अंदरेबेन यांच्याकडे नव्हती.

 

jesuben pizza

 

शेवटी जेशूबेन आणि अंदरे बेन या दोघींनी एलपीजी गॅस वापरून एक नवीन प्रकारचा ओव्हन तयार केला. हा ओव्हन एका कपाटाच्या आकाराचा होता. त्यात एकूण आठ कप्पे बनवलेले होते.

त्यात खालच्या कप्प्यात पहिल्यांदा तो भाकरीचा पिझ्झा ठेवला जायचा. दोन मिनिटे ठेवून तो वरच्या कप्प्यात ठेवला जायचा. असे करत करत पंधरा मिनिटात तो पिझ्झा एकदम वरच्या कप्प्यात यायचा आणि गरमागरम स्वादिष्ट पिझ्झा तयार व्हायचा. या ओव्हनमध्ये एका वेळेस २५ पिझ्झा तयार होतात.

जेशूबेन आणि अंदरेबेन या दोघींनीही आपला पिझ्झा सगळ्यांना परवडेल अशा किमतीत ठेवायचा होता. आजही अहमदाबादमधील त्यांच्या दुकानातील त्या पिझ्झ्याची किंमत ८० – १०० रुपयांच्या दरम्यानच आहे.

आता जेशु बेन यांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांचा हा बिझनेस अंदरेबेन यांची मुलगी आणि जावई सांभाळत आहेत. त्यांचा हा पिझ्झा आता त्या परिसरात प्रसिद्ध झाला आहे.

मुळात १९९०-९५ मध्ये पिझ्झा पॉप्युलर करणे एक आव्हान होते. पण त्यापेक्षाही तो बनवण्यासाठी एका अनोख्या ओव्हनची निर्मिती करणं देखील एक आव्हानच!

कोणत्याही जलापेनो ऑलिव्ह, मशरूम, बेबी कॉर्न अशा परदेशी भाज्या न वापरता लोकांना भारतीय चवीचा पिझ्झा खाण्याची सवय लावणं हे देखील आव्हानच. म्हणूनच ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करणं गरजेचं आहे.

आज त्यांच्या पिझ्झ्याचे सात प्रकार मिळतात. त्यात इटालियन, जैन, बेक्ड चीज, प्लेन चीज, मार्गारिटा, डबल चीज, आणि पायनॅपल पिझ्झा असे प्रकार मिळतात.

 

jesuben pizza 2 inmarathi

 

आता त्यांच्या पिझ्झाच्या अनेक शाखा निघाल्या आहेत. दररोज तीनशे पिझ्झ्यांची विक्री होते. त्यातून दररोज ३०००० रू मिळतात. खरंतर अंदरेबेन यांना या व्यवसायात जम बसवायला सहा वर्ष लागली. परंतु त्यांनी तो व्यवसाय करणे सोडले नाही. त्या काळात पिझ्झा हा ठराविक वर्गातच खाल्ला जायचा.

आजच्यासारखा तो प्रसिद्ध नव्हता. त्याकाळी आताच्या सारख्या डिजिटल जाहिराती नव्हत्या. केवळ पिझ्झा खाल्लेल्या लोकांनी त्याची महती सांगितली तरच त्याची प्रसिद्धी व्हायची.

पण आता कस्टमर्स त्यांच्या या देशी पिझ्झ्यावर जाम खुश आहेत. आता त्यांच्याकडे रिपीट कस्टमर येतात. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून हा पिझ्झा खाण्यासाठी लोक येतात.

===

हे ही वाचा या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

===

अहमदाबादमधील लॉ गार्डन रोड ही आता खाऊगल्ली झाली आहे. अंदरेबेन यांच्यासारखा पिझ्झा बनवण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला पण त्यांच्या या ओल्ड पिझ्झाची क्वालिटी आणि टेस्ट मात्र कोणालाच जमली नाही.

 

jeshuben shah pizza inmarathi

 

त्यांच्या या पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या ‘महिलांचे उद्योग क्षेत्रातील योगदान’ या एका कार्यक्रमात केले होते.

त्यावेळेस ते म्हणाले होते की अहमदाबादच्या प्रसिद्धीमध्ये जेशूबेनच्या पिझ्झ्याचा गुप्त वाटा आहे. जेशूबेन यांचा हा भाकरीचा पिझ्झा आजही प्रसिद्ध आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?