रशिया आणि अमेरिकेच्या कात्रीत सापडलेला वकील…शस्त्र हातात न घेता लढला युद्ध!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – अखिलेश विवेक नेरलेकर
===
कुणीतरी म्हंटलंय ते अगदी खरं आहे, “युद्धामुळे प्रश्न कधीच सुटत नसतात उलट ते आणखीन चिघळतात!” जगातला प्रत्येक देश हा युद्ध नकोच या उद्देशाने त्यांची रणनीती आखत असतो, जगात शांतता नांदावी, मनुष्य तसेच इतर जीवमात्रांना सुखाने जगता यावं म्हणूनच सगळे प्रयत्नशील असतात!
पण तरीही आपल्या आजूबाजूला अशा काही विचारांची लोकं होऊन गेली ज्यांना केवळ युद्ध हा एकमेव पर्याय वाटत असे. समोरच्या राष्ट्रावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थपित करायचे असेल तर युद्ध पुकारले जाई!
पहिले विश्वयुद्ध, दुसरे विश्वयुद्ध ही यांची ज्वलंत उदाहरणं. संपूर्ण जग आणि या युद्धात सामील झालेले प्रत्येक देश या युद्धामुळे रसातळाला गेले. प्रत्येक देश त्यातून वर आला पण अजूनही त्या युद्धातल्या जखमा आजही कित्येकांना अस्वस्थ करतात.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या हिरोशिमा नगासाकी घटनेदरम्यान संपूर्ण मानवजातीने विध्वंस काय असतो आणि तो मानवाला कोणत्या थराला नेऊ शकतो हा धडा घेतला!
याबरोबरच ६० च्या दशकातल्या कोल्डवॉरने सुद्धा कित्येक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली होती. कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध! दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि USSR म्हणजेच सोव्हिएत रशिया यांच्यातले संबंध बिघडले!
हे युद्ध शस्त्रांचे न होता फक्त धमक्यांपर्यंतच मर्यादित राहिले. यामध्ये जगातील दोन बलाढय शक्तींनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जगातील अधिकांश भागामध्ये अप्रत्यक्षपणे युद्ध लढली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – “कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या
===
इतिहासकारांच्या मते १९४७-१९८९ या कालावधीत हे कॉल्डवॉर चालू होते. दरम्यान दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रॉक्सिवॉर सुरूच ठेवले होते. त्या वेळेस सोव्हिएत युनियनमध्ये रशिया, उजबेकिस्तान, जॉर्जिया असे विविध देश सामील होते!
असं म्हणतात की हेरगिरी करणं ही गोष्ट कोल्डवॉर दरम्यानच वाढली. फक्त अमेरिका सोव्हिएत युनियनच नव्हे तर बरेचसे देश यात सहभागी होते!
या सगळ्यादरम्यान रुडॉल्फ एबल नावाचा एक सोव्हिएत गुप्तहेर अमेरिकेत शिरला, पेशाने तो चित्रकार पण अत्यंत शांत आणि नेहमीच आपल्यातच गुंतलेला. त्याचं खरं नाव होतं विलियम फिशर!
अमेरिकेच्या एफबीआयने १९५७ मध्ये हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली रुडॉल्फला अटक केली गेली! त्यावेळेस दोन्ही देशांत एवढं तणावाचं वातावरण होतं की रुडॉल्फ यांची केस घ्यायला कुणीच वकील तयार होत नव्हता!
अमेरिकेत एका गुप्तहेराची केस घेणे तेही कोल्डवॉर दरम्यान म्हणजे एक धर्मसंकटच होतं. तरीही रुडॉल्फवर कोणताही अन्याय न होता त्याला त्याचा बचाव करायची संधी मिळायला हवी असा विचार करून अखेर अमेरिका सरकारने जेम्स डोनोवन या वकिलाची नियुक्ती केली!
जेम्स यांनीसुद्धा माणुसकीच्या नात्याने ही केस घेतली आणि अमेरिकेत त्याच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. इतक्या भयावह वातावरणातसुद्धा एका हेराची केस घेणार म्हणून तिथल्या लोकांनी त्यांचे आणि त्याच्या परिवाराचे जगणे हराम केले!
ट्रायल सुरू झाली आणि न्यूक्लियर माहिती सोव्हिएत रशियाला पुरवणे, गुप्तहेर म्हणून अमेरिकेत विनापरवानगी वावरणे या आरोपांखाली रुडॉल्फ यांना शिक्षा सुनावली गेली!
===
हे ही वाचा – “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास
===
त्या वेळेस अमेरिका आणि सोव्हिएत युनियन दोन्हीकडे अशा युद्धाशी संबंधित कैद्यांना मुद्दाम वेगळे ठेवले जात असे ते यासाठी कधी कोणता सैनिक शत्रूराष्ट्राने पकडला तर त्यांच्याशी समझोता करताना या कैद्यांचा वापर केला जात असे!
यादरम्यान अमेरिकेचा एक पायलट फ्रान्सिस गॅरी पोवर्स याला फायटर प्लेनमधून लपून फोटो काढण्याच्या गुन्ह्याखाली सोव्हिएत युनियनने पकडले आणि १० वर्षाची शिक्षा ठोठावली आणि शिवाय फ्रेड्रिक प्रायर या अमेरिकी एकॉनॉमी स्टुडंटला ईस्ट जर्मनीमध्ये अटक करण्यात आली होती!
अमेरिकी सरकारपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पकडलेल्या रुडॉल्फची त्यांना आठवण झाली, आणि या गुप्तहेराच्या बदल्यात आमचे २ अमेरिकन नागरिक परत आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली!
तोवर डोनवन आणि रुडॉल्फ यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती. रुडॉल्फच्या कुटुंबाविषयी जाणून आणि एकंदर रुडॉल्फ यांचं वय बघता जेल त्यांच्यासाठी योग्य नाही असं डोनावन यांचं मत होतं म्हणूनच कित्येकांना न जुमानता त्यांनी रुडॉल्फची केस लढायचा निर्णय घेतला होता!
कोल्डवॉरसारखी परिस्थिती असल्याने आणि रुडॉल्फच्या बदल्यात २ अमेरिकी नागरिक यांना परत आणण्यासाठी डोनावन यांना गळ घालण्यात आली. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन आणि जर्मनी यांच्यासाठी हा मुद्दा अत्यंत ऐरणीवर येऊन ठेपला होता!
अखेर डोनावन यांनी प्रस्ताव स्वीकारला आणि या युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांच्याशी वाटाघाटी करायला जायचं ठरवलं!
सगळा लवाजमा तयार केला गेला, डोनावन यांना कसलीही अडवणूक होणार नाही अशी कागदपत्र त्यांना पुरवण्यात आली. त्यांनी प्रथम रशिया आणि नंतर ईस्ट जर्मनी इथे जाऊन वाटाघाटी करायला सुरुवात केली!
खरंतर रशियाला पॉवर्सच्या बदल्यात रुडॉल्फ मिळणार होता पण ईस्ट जर्मनीला प्रायरच्या बदल्यात काहीच मिळणार नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला वाटाघाटी करताना त्यांनी बरीच कुरबुर केली!
डोनावन यांनाही अमेरिकी सरकारकडून खास आदेश होते की सर्वप्रथम पॉवर्स या पायलटला परत आणण आपल्यासाठी महत्वाचं आहे, पण संवेदनशील डोनावन हे दोघांच्या एक्स्चेंजसाठी अडून बसले, अखेरीस तो दिवस उगवला. २ वेगवेगळ्या देशांशी वाटाघाटी करण्यात डोनावन यांना यश आलं!
वेस्ट जर्मनी आणि ईस्ट जर्मनीला जोडणाऱ्या या ब्रिजवर रुडॉल्फ एबलच्या बदल्यात अमेरिकी पायलट फ्रांसिस गॅरी पॉवर्स यांचं एक्स्चेंज झालं आणि याच दरम्यान ईस्ट आणि वेस्ट बर्लिन बॉर्डरपाशी चेकपॉइंट चार्ली इथे अमेरिकन विद्यार्थी फ्रेड्रिक प्रयर याला अमेरिकेच्या हवाली केलं गेलं!
अशा पद्धतीने युद्धजन्य परिस्थितीतसुद्धा एका सामान्य वकिलाने शत्रूच्या देशात जाऊन, अहिंसेच्या मार्गाने ३ लोकांचे जीव वाचवले आणि त्यांना मायदेशी सुपखरूप आणण्यात जेम्स डोनावन यांना यश मिळालं!
पुन्हा अमेरिकेत परतल्यावर जेम्स डोनावन हे नाव प्रत्येक नागरिक अभिमानाने घेत होता, हाच तो वकील ज्याने माणुसकी जपली अशा अर्थाने जेम्स यांच्याकडे बघितलं जात होतं!
हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग याने याच सत्यघटनेवर आधारित एक चित्रपट देखील केला ज्याचं नाव होतं “Bridge Of Spies”! ज्यात लोकप्रिय अभिनेता टॉम हँक्स याने जेम्स यांची भूमिका साकारली होती, सिनेरसिकांना हा सिनेमा आजही चांगलाच आठवत असणार!
अत्यंत कठीण काळातसुद्धा माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या जेम्स डोनावन यांना हॅट्स ऑफ!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ सुंदर पण खतरनाक ललना…
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.