“रसौडे मे कौन था”ला व्हायरल करणारा जिंगलस्टार सोशल मीडियाचा ‘वापर’ शिकवतोय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गाण्यांचं रिमिक्स आजच्या काळात नवीन गोष्ट नाही. मात्र यशराज या तरूणानं एक साधा डायलॉग रॅप ह्रिदममध्ये मिक्स करत चक्क गाणं बनवलं आणि बघता बघता अवघ्या काही तासांत नेटिझन्सनी ते डोक्यावर घेत व्हायरल केलं.
त्यानंतरचं त्याचं प्रत्येक रिमिक्स व्हायरल होतच गेलं. सध्या त्याची इतकी हवा आहे, की ज्याच्या तालावर दुनिया नाचते ते बॉलिवुडही यशराजच्या या अतरंगी रिमिक्सचे व्हिडिओ बनवत सुटलं आहे. कमाल आणि मजेदार गोष्ट म्हणजे त्यालाही प्रचंड लाईक्स मिळत आहेत. कोण आहे हा यशराज?
अनेक वर्षांपूर्वी साथ निभाना साथिया नावाची टिपिकल सास बहू मालिका प्रसारित होत असे आणि यातली कोकिला बेन, राशी बहू, गोपी बहू ही पात्रं तुफान लोकप्रिय झाली.
सुनांना सतत धारेवर धरणारी सासू कोकिळाबेन दर्शकांत खूप लोकप्रिय ठरली, तर हिचा जाच सहन करणार्या सूना बुध्दूमती गोपी आणि किडेमती राशीही लोकप्रिय झाल्या.
यांच्या कुरघोड्यांच्याच एका प्रसंगात अख्खा एपिसोड स्वंयपाकघरात शिजायला घातलेले आणि फसलेले छोले याभोवती फिरला होता. अगदी आंतरराष्ट्रीय कारस्थानाची तपासणी केल्याच्या अविर्भावत सासू विचारते, की ‘तो फ़िर रसोडे मैं कौन था? तुम थी? ये थी? कौन था.’
या डायलॉगमध्ये व्हायरल होण्यासारखं खरंतर काहीही नाही, मात्र २०२० चा ऑगस्ट महिना आणि अचानकच कोकिळाबेनने तालासुरात विचारलेला हा प्रश्न इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. विशिष्ट र्हिदमची साथ देऊन हा प्रश्न रॅप सॉंगसारखा बनवला गेला होता.
याच्या मागोमग लगेचच बिगिनी शूट आणि मै हूं ही इतनी सुंदर आले त्यानंतर बिगबॉसच्या आजवरच्या सर्वाधिक गाजलेल्या सिझनमधली शेहनाज गिल आणि शुक्ला यांच्यांतील लुटूपुटूच्या भांडणातलं एक वाक्य, तो क्या करू मैं मर जाऊ? मेरी कोई फिलिंग नहीं है? त्वाडा कुत्ता टॉमी साडा कुत्ता कुत्ता? हे वाक्य रिमिक्स होऊन आलं आणि न भुतो न भविष्यती असं व्हायरल झालं.
लोकांना अक्षरश: वेड लावलं या मिक्सनं. शॉर्ट व्हिडिओ, रिल्सचा पूर आला नुसता! सध्या ये मै हू, ये हमारी कार है और हम यहां पावरी हो रही है नं धुमाकूळ घातला आहे. अगदी बॉलिवुड अभिनेता रितेश, बिगबॉस रनर अप राहूल वैद्य, प्रिया बापट यांनाही यावर शॉर्ट व्हिडिओ करण्याचा मोह आवरता आलेला नाही.
–
हे ही वाचा – छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!
–
‘रसोडे में कौन था’च्या वेळेस सुरवातीला लोकांनी हे मिक्स कोणी बनवलं आहे याचा फारसा विचार केलेला नव्हता. इंटरनेटच्या जगात असे मिक्स, अशा लाटा येतच असतात. मात्र ते व्हायरल होत गेलं आणि लोकांचं कुतुहल चाळवलं, की हा आहे तरी कोण?
यशराज मुखाते हे नाव झोतात येण्याची ही पहिली वेळ होती. तरीही अजून प्रत्येक माणसापर्यंत हे नाव पोहोचलं नव्हतं. मिम मात्र प्रचंड व्हायरल झालं. यानंतर ‘तो क्या करू मैं मर जाऊ’ आलं आणि लोकांचं कुतुहल त्यांना गप्प बसू देईना. हा कोण अवली माणूस आहे? याचा शोध सुरू झाला आणि एक मराठी नाव समोर आलं, यशराज मुखाते.
अगदी काल परवापर्यंत लोकांना मीमनी वेड लावलं होतं. या मीमची जागा यशराजच्या गाण्यांनी घेतलेली आहे. पंचवीस वर्षांचा यशराज मुळचा औरंगाबादचा आहे आणि तो खरंतर इंजिनियर आहे. मात्र त्याला संगीतात लहानपणापासूनच रुची आहे.
तो तीन वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांनी त्याला एक किबोर्ड भेट दिला होता. या किबोर्डवर सतत काहीतरी वाजवत रहाण्याचा छंद त्याला जडला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण यशराजच्या बाबतीत शंभर टक्के सत्य बनली आहे.
मोठेपणी इंजिनियरिंगच्या अभ्यासाबरोबरच संगीताचं हे वेडही त्यानं जपलं. आजच्या ट्रेण्डनुसार त्यानं युट्यूबवर बघत बघत कम्पोझिंग शिकलं.
सतत प्रयोग करत राहून यावर प्रभुत्व मिळवलं. यानंतर त्यानं त्याचं युट्यूब चॅनल बनवलं आणि त्यावर त्याची गाणी अपलोड करत राहिला. या चॅनलमुळे त्याला जाहिरातींसाठी जिंगल बनविण्याची कामं मिळू लागली. घरातच बेसमेंटमधे त्यानं त्याचा स्टूडिओचा सेट अप टाकला आणि हे काम चालू ठेवलं.
–
हे ही वाचा – जगातला दुसऱ्या आणि भारतातला पहिल्या ‘अपंग’ डीजेची थक्क करणारी कहाणी!
–
अर्थातच या कामातून त्याला काही मोठी कमाई होत होती अशातला भाग नाही. कधी एखाद्या कामाचे पैसे मिळत तर कधी चक्क फुकटात कामं करुन घेतली जात. म्हणूनच यशराजनं त्याचे हे जिंगल बनविण्याचे उद्योग आईवडिलांना कधी सांगितले नाहीत.
युट्यूबवरही त्याला काही फार मोठा प्रतिसाद मिळत होता अशातला भाग नाही. दहा हजार सबस्क्राईबर्सचा आकडा गाठायला त्याला दम लागत होता.
एक दिवस त्यानं एका डेलिसोपचा एक डायलॉग इंटरनेटवर व्हायरल झालेला पाहिला. याच डायलॉगला त्यानं गंमत म्हणून गाण्यात मिक्स केलं आणि हे गाणं अपलोड केलं. हे गाणं होतं, रसोदे में कौन था? या सिनला त्यानं रॅप बिट्सवर बसवून ते त्याच्या चॅनलवर अपलोड करून फोन बंद केला आणि तो झोपायला गेला.
दुसरा दिवस उजाडलाच तो त्याला आलेल्या एकामागून एक फोन कॉल्सनी. शेकडो फ़ोन, मेसेजनं त्याला आले. रसोडे में रातोरात प्रचंड व्हायरल झालं होतं. अनेक सेलिब्रेटिजचे मेसेजही त्याला आले.
इतकी वर्षं ज्या यशाची तो वाट बघत होता, ते यश तो झोपलेला असताना हळूच त्याच्या अकाऊंट्मधे जमा झालं होतं. एका रात्रीत यशराज हे नाव परिचित बनलं. या गाण्यानं त्याला ब्रॅण्ड न्यू ओळख दिली.
शिल्पा शेट्टी, स्मृति ईरानी, बादशहा अगदी साक्षात जिचा हा डायलॉग आहे ती अभिनेत्री ती सासू कोकिलाबेन म्हणजेच रूपल पटेल या सगळ्यांनी यशराजला फोन करून त्याची तारीफ केली.
न्यूज चॅनल्सनी सुद्धा या व्हायरल गाण्याची दखल घेतली. जिकडे बघावं तिकडे यशराज आणि रसोडेची चर्चा ऐकायला मिळू लागली. अनेक टिव्ही शोजमधून त्याला आमंत्रण येऊ लागलं आणि या सगळ्याचा कळस म्हणजे साक्षात विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली.
या व्हायरल गाण्यानंतर यशराजनं आईबाबांना त्याचं काम दाखवलं आणि सेलिब्रेटिजचे आलेले मेसेज दाखवले. हे सगळं बघून त्याचे आई बाबा थक्कच झाले. आपला मुलगा रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनला आहे यावर त्यांचाच विश्र्वास बसत नव्हता. त्या दिवसापर्यंत त्यांना वाटत होतं, की संगीत हा यशराजचा केवळ छंद आहे. तो आवड म्हणून काही बाही करत असतो…
यशराजला विनोदाची जाण अचूक आहे, त्यामुळेच त्यानं निवडलेले मिम्स व्हायरल होतात. रसोडे मागोमाग त्यानं बिगिनी शूट वर गाणं केलं. एका शोमधल्या एका स्पर्धकाच्या तोंडी हा डायलॉग होता ज्याला नेटीझन्सनी तुफान ट्रोल केलं होतं.
एक अभिनेत्री एका मुलाखतीदरम्यान अत्यंत वाईट इंग्रजी बोलत होती. त्याचे मीम्स व्हायरल झाले होते. त्याचंच गाणं बनवून यशरजानं आणखी धमाल उडवून दिली.
अलीकडचा त्याचा ‘पावरी हो रही है’ हा व्हिडिओही असंच उदाहरण आहे. पाकिस्तानी दनानीर मुबीननं तिच्या एका व्हिडिओत विचित्रच पध्दतीन पार्टी शब्दाचा उच्चार केला. या उच्चाराला नेटिझन्सनी अक्षरश: ट्रोलनं चेपला. यावर यशराजनं पॅरडी व्हिडिओ बनवून कळस गाठला आहे.
त्याच्या या ‘पावरी होरी है’ला अपलोड झाल्या झाल्या काही तासातच दोन मिलियनहून जास्त व्ह्यूज मिळाले. कधीकाळी दहा हजाराचा आकडा गाठायला तळमळलेल्या यशराजला हा आकडा सातव्या आसमात घेऊन गेला आहे. इतक्या वर्षांचे कष्ट आणि पेशन्स कामाला आले आहेत आणि हे यश यशराज जमिनीवर राहून उपभोगतो आहे.
===
हे ही वाचा – ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.