' पठ्ठ्याने बसवलाय घरात सीसीटीव्ही… तोही चक्क चिमण्यांसाठी! वाचावं ते नवलच! – InMarathi

पठ्ठ्याने बसवलाय घरात सीसीटीव्ही… तोही चक्क चिमण्यांसाठी! वाचावं ते नवलच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असं म्हणत बाळाला भरवणारी आई हल्ली कमी पाहायला मिळते. पाहायला मिळतच नाही म्हटलं, तरी ते फारसं चुकीचं ठरणार नाही. हे असं का घडत असावं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पडला असेल, तर त्याचं उत्तर मिळालंय का?

याचं एक उत्तर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर असं असू शकेल. लहान मुलाला एखादा विडिओ दाखवा, तो बघता बघता अन्नाचे घास पोटात जातात, असं म्हणणाऱ्या कित्येक महिला तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील. म्हणणं काही खोटं नाही.

तंत्रज्ञान हे झालं एक कारण, पण याहून महत्त्वाचं आणि अधिक धक्कादायक असं आणखी एक कारण आहे, अशी परिस्थिती उद्भवण्यासाठी; आणि ते म्हणजे चिऊ आणि काऊची घटत चाललेली संख्या

 

sparrow inmarathi

 

जिथे कावळा आणि चिमणी दिसतच नाहीत, तिथे त्यांच्या नावाने घास कुठला आणि कसा भरवणार? चिमणी आणि कावळाच नाही, तर कुठलाच पक्षी सध्या सहसा दिसत नाही. वाघ नामशेष होत आहेत, या विषयाच्या बरोबरीनेच, पक्ष्यांची घटणारी संख्या हादेखील एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे.

हे ही वाचा – हॉलंड सरकारनेही गौरविलेल्या भारतीय पक्षीतज्ञाचा असामान्य प्रवास!

निसर्गाचा होणारा ऱ्हास, मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेले मोबाईल नेटवर्कचे टॉवर्स यामुळे पक्ष्यांचे संख्येत घेत होत आहे, हे आता सगळ्यांनाच ठाऊक झालं आहे. तरीही मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढच होताना दिसतेय.

याच विषयवार आधारित एक चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. रजनीकांत यांच्या रोबोट, सिनेमाचा पुढचा भाग असणाऱ्या रोबोट २.० मध्ये अक्षय कुमार याने साकारलेला खलनायक, या विषयावर महत्त्वाचं भाष्य करून गेला.

 

akshay kumar robot 2.0 inmarathi

 

पक्ष्यांचा अत्यंत कळवळा असणाऱ्या या बर्डमॅनचं एक व्हर्जन भारतात खरोखरंच अस्तित्वात आहे. बिहार राज्यात राहणारे ४५ वर्षीय तन्झील-उल रहमान खान म्हणजे हा खऱ्याखुऱ्या जगातला बर्डमॅन!

त्यांचं घर म्हणजे जणू काही एक पक्षी अभयारण्याच आहे. संपूर्ण घराचा परिसर म्हणजे पक्ष्यांना निसर्गाचं रूप वाटावं अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. घरासमोरच्या अंगणात एक छानसा बगीचा आणि या बगिच्यातील झाडांवर जागोजागी टांगलेले झोपाळे पाहिले, की तिथे पक्षी किती सहजपणे वास्तव्य करू शकतील लक्षात येतं.

खान यांच्या निश्का या गावातील सगळ्याच चिमण्या त्यांच्याकडेच वास्तव्याला असाव्यात असा विचारही त्यांचं घर बघितलं की येऊन जातो. गावातील चिमण्यांचं सर्वार्थाने रक्षण करणं, हेच आता त्यांचं ध्येय आहे.

 

sparrow nests inmarathi

 

या ध्येयाने पछाडलेल्या या माणसाने, चिमण्यांकडे योग्यप्रकारे लक्ष देता यावं यासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले आहेत. घराच्या परिसरात चिमण्यांसाठी बांधलेलं प्रत्येक घरटं या सीसीटीव्हीमधून पाहता येतं. यामुळे सगळीकडे नीट लक्ष ठेवता येतं आणि काय हवं नको ते बघता येतं असं त्यांचं म्हणणं आहे.

चिमण्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची संपूर्ण काळजी ते घेतात. आसपासच्या परिसरात बंदुकीचा आणि फटक्यांचा आवाज होऊ नये असाही खान यांचा प्रयत्न असतो.

मध्यंतरी नॅशनल  जिओग्राफिक वाहिनीवर त्यांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली. चिमण्यांच्या पंखांमधून निर्माण होणाऱ्या हवेमुळे तब्बल ३८ आजारांपासून दूर राहता येतं. सातत्याने चिमण्यांच्या आजूबाजूला वावरत असलेले खान यामुळे स्वतःला खूपच भाग्यवान समजतात.

खान यांच्या या प्रयत्नांमुळे आज अनेक चिमण्यांना आश्रय मिळाला आहे. नैसर्गिक वातावरणात त्या सुखाने जगत आहेत.

 

Tanzilur Rahman Khan inmarathi

 

बिहारसारख्या राज्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या खान यांचा आदर्श सगळ्यांनीच घ्यायला हवा. अन्यथा रोबोट सिनेमात दाखवलेली परिस्थिती काही प्रमाणात सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही.

===

हे ही वाचा – पक्ष्यांसाठी अंधारात गेलेलं गाव! विलक्षण, विस्मयकारक!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?