' गोविंदाने भेट म्हणून दिलेला टी-शर्ट रुमाल म्हणून वापरणारा विक्षिप्त ‘राजकुमार’! – InMarathi

गोविंदाने भेट म्हणून दिलेला टी-शर्ट रुमाल म्हणून वापरणारा विक्षिप्त ‘राजकुमार’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वर्षातून काही महिने स्वित्झरलॅण्डमधे वास्तव्य, महागड्या कर्सचा शौकिन, कुटुंब वत्सल आणि कमालिचा सणकी, डायलॉग किंग राजकुमार नावाप्रमाणेच वावरायचा. त्याच्या व्यक्तिमत्वातच एकप्रकारचा दिमाख होता.

राजबिंड्या व्यक्तिमत्वाच्या राजकुमारनं आपल्या संवादांनी अनेक चित्रपट हिट केले. आजही त्याचे लोकप्रिय डायलॉग्ज लोक डोक्यावर घेतात. जाणून घेऊ राजकुमारचे काही किस्से-

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राजकुमार हे नाव त्याला खूप शोभून दिसायचं कारण त्याचा पडद्यावरचा आणि बाहेरचा वावरही तसाच दिमाखदार असायचा. मात्र राजकुमार हे त्याचं खरं नाव नव्हतंच.

फाळणीपूर्व भारतात म्हणजे आजच्या पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात त्याचा जन्म एका कश्मिरी पंडिताच्या घरात झाला. कुलभुषणनाथ पंडित असं अगदी साधं सुधं नाव असलेला हा तरूण नोकरीच्या निमित्तानं तेंव्हाच्या बंबईत अर्थात बॉम्बेला आला.

 

rajkumar inmarathi

 

१९४० साली तो मुंबईत आला आणि पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरीवर रूजू झाला. एक इन्स्पेक्टर सिनेमासृष्टित कसा काय आला? याचाही धमाल, अगदी फिल्मी वाटावा असा हा किस्सा आहे.

ज्या पोलिसस्थानकात तो ड्युटीवर होता तिथे सिनेजगतातील अनेक मंडळी सतत या ना त्या कामानिमित्त येत जात असत. असेच एकदा निर्माते बलदेव दुबे पोलिस स्थानकात आले असता त्यांनी राजकुमारला पाहिलं आणि त्याचं व्यक्तिमत्व बघून त्यांना एक रुबाबदार हिरो त्याच्यात दिसला.

===

हे ही वाचा बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

===

त्यांनी कुलभुषणशी चर्चा केली आणि ताबडतोब राजीनामा देत त्याला सिनेमाचा हिरो बनवून टाकलं. १९५२ साली आलेला रंगीली हा त्याचा पहिला चित्रपट. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ७० हून जास्त चित्रपटात भूमिका केल्या ज्यापैकी मदर इंडियाला ऑस्करसाठी नामांकन मिळालेली होती.

 

raj kumar inmarathi

 

राजकुमार यांचा तकिया कलाम असणारा “जानी” हा शब्द आणि त्यानं सुरू होणारं त्यांचं बोलणं हे सिनेमातल्या डायलॉगपुरतं नव्हतं तर वास्तव आयुष्यातही त्यांना सतत जानीनं सुरवात करून बोलण्याची सवय होती.

एकदम बिनधास्त असं व्यक्तिमत्व असणारे राजकुमार हम किसी के बाप से नहीं डरते ॲटिट्यूड घेत कायम जगले. धर्मेंद्र, दिलिप कुमार, रामानंद सागर, प्रकाश मेहरा, राज कपूर, झीनत अमान, गोविंदा अशा अनेकांसोबत त्यांची असलेली त्यांची टशन आणि त्याबाबतचे किस्से लोकप्रिय आहेत.

गोविंदाच्या शर्टचा किस्सा तर आजही सांगितला जातो. त्याचं झालं असं की, ऐंशीच्या दशकात एक सिनेमा आला होता, जंगबाज. या चित्राटात त्याकाळी तरूणाईनं डोक्यावर घेतलेला डान्सिंग सुपरस्टार गोविंदा आनि राजकुमार एकत्र भूमिका करत होते.

एकदा शॉट झाल्यानंतर हे दोघे पुढचा शॉट लागेपर्यंत गप्पा मारत बसले होते. गोविंदानं जो शर्ट घातला होता तो राजकुमारला खूपच आवडला. हे त्यांनी गोविंदाला सांगितल्यावर गोविंदानं लगेचच तो शर्ट त्यांना भेट म्हणून दिला.

 

raj kumar 2 inmarathi

 

काही दिवसांनंतर राजकुमार त्याच शर्टाचा रुमाल करून तो लोकांना दिसेल असा खिशात घालून रुबाबात फिरत होते.

झिनत अमानचा किस्सा तर गोविंदाच्या किस्स्याहून धमाल आहे. त्याचं झालं असं की, त्यावेळेस झिनत अमानच्या दम मारो दम गाण्यानं धुमाकूळ माजवायला सुरवात केली होती. झिनत अमान या नावाची चर्चा इंडस्ट्रीत आणि बाहेर चालली होती.

अशाच एका बॉलिवुड पार्टीत झिनत अमान आणि राजकुमार दोघेही आले होते. राजकुमारला बघून झिनत अमान आपणहून त्याच्याशी बोलायला गेली. तिनं विचार केला की, आपण सध्या इतके लोकप्रिय आहोत तर राजकुमार आपल्याला ओळखेलही आणि कौतुकाचे चार शब्द बोलेलही.

छान मटकत मटकत ती राजकुमारना हॅलो म्हणायला गेली. आपल्या समोर उभ्या मूर्तीमंत ग्लॅमर असणार्‍या तरूणीला नखशिखांत पाहून झाल्यावर आपल्या खर्जातल्या रुबाबदार आवाजात राजकुमार म्हणाले, तू इतकी ग्लॅमरस आहेस. तू सिनेमात भूमिकेसाठी प्रयत्न का करत नाहीस?

हे ऐकल्यावर झिनत अमानचा चेहरा कसा झाला असेल हे काही वेगळं सांगायला नकोच.

 

zeenat aman inmarathi

 

राजकुमार यांच्याप्रमाणेच विक्षिप्त म्हणून परिचित असा नाना पाटेकर! १९९२, मेहुल कुमार यांची तिरंगा या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. राजकुमार यांचं ब्रिगेडियर सूर्यदेव सिंहच्या भूमिकेसाठी नाव निश्चित होतं मात्र दुसर्‍या भूमिकेसाठी कोणाला निवडावं याचा निर्णय होत नव्हता.

फिरून फिरून एकच नाव समोर येत होतं आणि ते म्हणजे, नाना पाटेकर. राजकुमार आणि नाना एकत्र म्हणजे आग और शोला एकत्र आणण्यासारखं होतं.

दोघेही तितकेच तापट. अखेर नानाचं नाव फायनल केलं गेलं आणि अनेकांनी मेहुलकुमारला सांगितलं की, तुझा चित्रपट कायमचा डब्यात जाणार. या दोघांच्या भांडणात चित्रीकरण पूर्ण झालं तरी खूप झालं.

===

हे ही वाचा इतर कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही, ते या ५ खास कारणांमुळे…

===

नानाला साईन करतानाच मेहुल कुमारनं त्याला वचन दिलं की जे स्क्रिप्ट त्याला देण्यात आलं आहे त्यात एका शब्दाचाही बदल करणार नाही. हीच गोष्ट त्यानं राजकुमारच्या समोर नानाला पुन्हा एकदा सांगितली जेणेकरून राजकुमारला हे समजावं.

यावर राजकुमारनं हसत हसत विचारलं की,” मी कधी स्क्रिप्टमधे नाक खुपसलंय आधी? मग पुढेही नाही लक्ष देणार”. यानंतर चित्रपट पूर्णही झाला, प्रदर्शितही झाला आणि हाऊसफ़ूल चाललाही.

 

tiranga inmarathi

 

रामानंद सागर हे खरं तर इंडस्ट्रीमधलं शांत, सज्जन माणूस म्हणून ओळखले जायचे. राजकुमारची आणि त्यांची मैत्रीही होती. दोन विरूध्द स्वभावाचे हे दोघे मित्र कसे? असा प्रश्न अनेकांना पडायचा.

एकदा एका चित्रपटाची ऑफर घेऊन रामानंद सागर राजकुमारकडे गेले. त्याला कथा ऐकवली. राजकुमारला काही ही कथा फारशी आवडली नाही.

त्यानं आपल्या पाळीव कुत्र्याला हाक मारली आणि विचारलं की, तुला ही कथा आवडली का? कुत्र्यानं त्याच्याकडे बघून मान हलवली आणि राजकुमार रामानंद सागरना म्हणाला,” ये रोल तो मेरा कुत्ता भी नहीं करना चाहता’.

अपमानित झालेले रामानंद तिथून जे निघून गेले ते त्यांनी कधीच आयुष्यात राजकुमारसोबत काम केलं नाही. या चित्रपटात त्यांनी नंतर धर्मेंद्रला घेतलं आणि चित्रपट तूफान चालला. चित्रपटाचं नाव होतं, आंखे!

राजकुमार यांनी नाकारून इतर कोणाच्या नावावर सुपरहिट सिनेमा जाणं याचं काही हे एकमेव उदाहरण नाही. जंजीरही आधी राजकुमारला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिला गेला होता.

मात्र प्रकाश मेहराचं तोंडही बघायला तयार नसणार्‍या राजकुमारने अर्थातच हा सिनेमा मोठ्या माजात नाकारला होता. हा चित्रपट नंतर अमिताभकडे गेला आणि एक इतिहास रचला गेला.

 

zanjeer inmarathi

 

राजकुमार यांचं लग्न एअर होस्टेस असणार्‍या जेनीफरशी झालं. राजकुमार हा खरंतर अगदी कुटुंबवत्सल असा माणूस होता. बायको मुलासोबत बागेत फिरायला जाणं, मुलाला शाळेत सोडायला जाणं, बायकोसोबत शॉपिंग करणं हे त्याला मनापासून आवडायचंही आणि तो प्रसंगी काम बाजूला ठेवून ते करायचाही.

गाड्यांचा त्याला कमाल शौक होता. शेवर्ले पासून मर्सिडीझ पर्यंत आणि फोक्सवॅगन पासून विली जीपर्यंत अनेक महागड्या कार्सनी त्याचं पार्किंग भरलेलं असायचं. मात्र त्याला बदल फारसे आवडायचे नाहीत.

अनेक कार पार्किंगमधे असल्या तरिही त्याची आवडती अशी एकच होती जी त्यानं थोडीथोडकी नाही तर तब्बल चाळीस वर्षं वापरली. इतकंच नाही तर टेलर, हेअर स्टायलिस्ट आणि ड्रायव्हर हा स्टाफही त्यानं कधीच बदलला नाही.

घोडेस्वारी आणि गोल्फ़ खेळणं त्याला आवडायचं. वर्षातून काही काळ तो लंडन आणि स्वित्झरलॅण्डमधे घालवायचा. याचबरोबर काही महिने कश्मिरमधे कुटुंबासोबत रहायला जायचा.

 

raj kumar 3 inmarathi

 

खर्‍या अर्थानं तो स्वत:च्या अटींवर जगला. कामाची फिकीर त्यानं कधीच केली नाही कारण तो राजकुमार होता आणि त्याच्यासाठी चित्रपट बनायचे, त्याला कधीच काम मागत फिरावं लागलं नाही. खर्‍या अर्थानं किंग साईझ आयुष्य जगलेला हा कलाकार म्हणजे एक अजब रसायन होतं.

===

हे ही वाचा रस्त्यावर सँडविच विकून बनला बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग – वाचा थक्क करणारा प्रवास!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?