' परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल! – InMarathi

परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत देश हा संत-महंत, देशसेवक, राजकारणी, गायक, नेते, अभिनेते, खेळाडू अशा अनेक दिग्गजांसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय विद्वान, हुशार लोक या भूमीत जन्माला आले. त्यांनी भारताचे नाव जगप्रसिद्ध केले. त्यांची कीर्ती जगाच्या नकाशावर आपण पहातो.

हे पाहताना अभिमानाने आपला ऊर भरून येतो. खूप पुण्य केल्यानंतर भारतात जन्म होतो असे म्हटले जाते. भारतभूमीत अशी काही नररत्ने जन्मली ज्यांनी भारताचे नाव जगभरात मोठे केले.

या नरवीरांनी खूप पराक्रम केले आहेत. लोकांसाठी, लोकांचे राज्य त्यांनी निर्माण केले आहे. शिवाजी महाराजांपासून सध्याचे पंतप्रधान मोदीजी यांच्यापर्यंत सर्वांची नावे परदेशात सन्मानाने घेतली जातात. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही हे लोक विख्यात आहेत. त्यांचे कार्य त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले आहे.

 

modi namskar inmarathi

 

खूप बुद्धिमान हिरे या भारतभूमीत जन्माला आले आणि आपले कोंदण आपण तयार करून ते लखलखत राहिले, त्यांच्या दिव्य तेजाने! या तेजाची आरती सर्व जगभर गायली गेली. सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले, स्तुती केली. विश्वविख्यात पदाचा मानाचा तुरा शिरपेचात खोवला.

आपल्याकडे सुद्धा काही परदेशस्थ व्यक्ती प्रसिद्ध आहेत. त्यांचा सन्मान आपण रस्ते, चौक, इमारती यांना नावे देऊन केला आहे. उदाहरर्णार्थ व्हीटी, मदर टेरेसा, जीम काॅर्बेट, भगिनी निवेदिता, व्हिजेटीआय, फर्ग्युसन!

अगदी असाच मान आपल्या उच्च विभूषित व्यक्तिमत्वांना परदेशात मिळाला आहे. आजही त्यांचं नाव परदेशातील रस्ते, चौक मोठ्या दिमाखात मिरवतात. कोण आहेत हे भारतीय? जाणून घेऊया.

१. महात्मा गांधी

हे जागतिक व्यक्तिमत्व सत्य ,अहिंसा या तत्वांवर चालणारे होते. त्यांनी असहकार चळवळ सुरू केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने भाग घेतला आणि जागतिक इतिहासात ते अजरामर झाले.

‘पापाचा द्वेष करा पण पापी माणसाचा द्वेष करू नका’ हे ते नेहमी सांगत असत. स्वदेश व स्वाभिमान या दोन गोष्टी जन्मभर सांभाळल्या.

बापू नावानं प्रसिद्ध असलेले गांधीजी साधी रहाणी व उच्च विचारसरणी या विचारांचे होते. त्यांचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून जगभर साजरा होतो. राष्ट्रपिता म्हणून ते विख्यात आहेत.

परदेशांमध्येही त्यांना बराच मान आहे यात शंकाच नाही. नेदरलँड, अमेरिका, जर्मनी, फिलीपिन्स, इराण, कॅनडा या देशातील कितीतरी ठिकाणांना महात्मा गांधीजींचे नाव देऊन गौरविण्यात आले आहे.

 

mahatma gandhi road featured inmarathi

 

२. स्वामी विवेकानंद

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून भारतात व अमेरिकेत स्वामी विवेकानंद प्रसिद्ध आहेत. शिकागोमधील जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी बंधू आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात करुन अमेरिकन लोकांची मने जिंकली होती.

त्यांनी अध्यात्म व वेदांताचा प्रचार आणि प्रसार केला. गरीबांना सहाय्य केले. समाज एकत्र आणला ‘उठा, जागे व्हा आणि लक्ष्य साध्य करा. तोपर्यंत थांबू नका’ असे ते सांगत. अमेरिकेत शिकागो येथील रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.

 

swami vivekanand road inmarathi

 

३. इंदिरा गांधी

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी समाजकार्याला प्राधान्य देत असत. त्या उच्चशिक्षित आणि विद्याविभूषित अशा महिला होत्या. आयर्न लेडी म्हणता येईल अशी स्त्री म्हणजे इंदिरा गांधी.

त्यांना लहानपणापासून राजकारणात रूची होती. बालचरखा संघ, वानरसेना या दोन संघटनांनी कॉंग्रेस पार्टीला असहकार चळवळीत मोलाची मदत केली होती.

त्या कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा, तर अनेक संस्थांच्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या. निसोदीया, दर एस सलाम येथील रस्त्यांना श्री. इंदिरा गांधी यांचे नाव दिले आहे.

 

indira gandhi street dar es salaam inmarathi

 

४. रविंद्रनाथ टागोर

बंगाली कविश्रेष्ठ रविंद्रनाथ टागोर जन गण मन या राष्ट्रगीताचे कवी आहेत. त्यांचे साहित्य, संगीत आजही भारतात आणि भारताबाहेर प्रसिद्ध आहे. त्यांनी ३ वेळा जर्मनीला भेट दिली आहे. तेथे त्यांची थोर शास्त्रज्ञ अलबर्ट आईन्स्टाईन यांच्या बरोबर भेट झाली.

टागोरांच्या १०० व्या जयंती निमीत्त जर्मनीतील बर्लिन शहरातील एका रस्त्याला रविंद्रनाथांचे नाव देण्यात आले.

 

rabindranath tagor street inmarathi

 

५. ए.आर .रेहमान

ऑस्कर पुरस्कार विजेता महान संगीत रचनाकार ए.आर रेहमान यांचे नाव भारतात नाही तर जगभर प्रसिद्ध जय हो या गाण्यासाठी त्याला ऑस्कर हा जगविख्यात पुरस्कार मिळाला आणि रेहमान जगभर प्रसिद्ध झाला. कॅनडातील एका रस्त्याला अल्लारखाँ रेहमान हे नाव देण्यात आले आहे.

 

allah rakha rahman street inmarathi

 

६. जवाहरलाल नेहरू

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे रशियात सुद्धा प्रसिद्ध होते. रशियन लोक त्यांचे चाहते होते. म्हणून रशियातील मास्को शहरातील एका चौकाला ‘जा स्क्वेअर’ असे नाव दिले आहे. तेथील लोकांना नेहरु शब्द उच्चारणे कठीण जात असल्याने असे नाव दिले आहे.

 

square named after nehru inmarathi

 

७. क्रांतीवीर भगतसिंग

हे जगप्रसिद्ध क्रांतिकारक होते. भगतसिंग यांना जेथे शिक्षा देण्यात आली ती जागा पाकिस्तानातील लाहोर येथे आहे. त्या जागेला शडमान चौक असे म्हटले जात असले, तरी त्याचे खरे नाव भगतसिंग चौक असे होते. इस्लामिक जिहाद्यामुळे या नावाला स्टे आला होता.

हे ही वाचा – विदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय!

 

bhagat singh chowk pakistan inmarathi

 

८. राजकपूर

प्रसिद्ध अभिनेते, सिनेनिर्माता, दिग्दर्शक म्हणून सर्व जगावर अधिराज्य गाजवणारे राज कपूर हे उत्तम पियानो वादक होते. आजही भारतीय चित्रपट सृष्टीवर त्यांचे नाव शोमॅन म्हणून घेतले जाते. खरा माणूस म्हणून ते जगले.

 

raj-kapoor-inmarathi

 

कितीतरी फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले होते. भारतीय सिनेमाचे शोमॅन म्हणून ते प्रसिद्ध होते. सिटी ऑफ बॉर्मटन (Brampton) कॅनडा येथील क्रिसेंटला राज कपूर यांचे नाव मृत्यूपश्चात देण्यात आले.

९. द्वारकानाथ कोटणीस

महाराष्ट्रात जन्माला आलेले श्री कोटणीस चीनमध्ये मेडिकल गटाबरोबर डॉक्टर म्हणून मदतीसाठी गेले होते. दुसऱ्या सिनोजपान युद्धाच्या वेळी चायनीज नेता माओ झिडाँगने डॉक्टर कोटणीस यांनी अडचणीच्या वेळी खूप मदत केली, म्हणून त्यांची स्तुती केली होती.

डॉक्टर कोटणीस यांचे अचानक निधन झाले. एक मदतीचा हात निघून गेल्याने खूप नुकसान झाले आहे असे झिडाँग त्यावेळी म्हणाले. शिजियाझुंग, चीन येथे डॉ. कोटणीस यांचा मोठा पुतळा उभारण्यात आला आहे.

 

dr kotnis statue inmarathi

 

१० .सुनील गावस्कर

न्यूझीलंडची राजधानी वेलींग्टनमध्ये लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे नाव एका रस्त्याला देण्यात आले आहे. ‘गावस्कर प्लेस’ असे त्या जागेला संबोधले जाते. हा रस्ता ज्या भागात आहे तो भाग खंडाळा म्हणून ओळखला जातो. न्यूझीलंडवर भारताचा किती प्रभाव आहे हे यातून दिसते.

 

gavaskar place inmarathi

 

कुणाचा जन्म कुठे व्हावा हे कुणाच्याही हातात नसते. पण असामान्य कर्तृत्व करुन माणसं जगप्रसिद्ध होतात आणि केवळ आपलाच देश नाही तर परदेशातही त्यांची नांवे अशी अमर होतात.

===

हे ही वाचा – या १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?