' ‘त्या’ ४ दिवसांमध्ये संपूर्ण कुटुंबाने स्त्रीसाठी या १० गोष्टी करायलाच हव्यात – InMarathi

‘त्या’ ४ दिवसांमध्ये संपूर्ण कुटुंबाने स्त्रीसाठी या १० गोष्टी करायलाच हव्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मासिक पाळी हा विषय तसा खासगी राहिला नाही, आता त्यावर सर्रास मोकळेपणाने चर्चा  केली जाते. अगदी काही वर्षांपूर्वी हा विषय फक्त बायकांपुरता मर्यादित होता मात्र आता या विषयात पुरुष देखील सहभागी होताना दिसून येतात. अगदी आपल्या अक्कि भाई ने सुद्धा पॅडमॅन चित्रपटात आपल्या बहिणीला राक्षबंधनाच्या दिवशी सॅनिटरी पॅड भेट म्हणून देतो.

मासिक पाळीत स्त्रीच्या योनीमार्गातून सलग ३, ४ दिवस रक्तस्त्राव होत असतो. दर २८ किंवा ३० दिवसांनी ही प्रक्रिया होत असते, काहींच्या बाबतीत थोडा उशीर ही होऊ शकतो.

 

periods inmarathi

हे ही वाचा – मासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

अशा दिवसांमध्ये शरीरात प्रचंड बदल होत असतात तसेच मानसिक त्रास होण्यास सुरवात होते. त्यामुळे या काळात जितकी विश्रांती घेता येईल तितके चांगले. परंतु आजची एकूण धावती जीवनशैली पाहता आज स्त्रिया चाकोरीबाहेरील कामं करतानाही दिसतात. त्यामुळे विश्रांती घेणे शक्य नसते त्यामुळे या काळात त्यांची काळजी घेणे जास्त गरजेचे असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कायम कुटुंबासाठी झटणा-या तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे.

खालील प्रकारे आपण तिची काळजी घेऊ शकतो :

कुछ मिठा हो जाये –

चॉकलेट हे मासिक ताणतणाव कमी करण्यास व हार्मोन्स सक्रिय करण्यास मदत करते. मासिक पाळीत अनेकदा मूड स्विन्ग्स होताना दिसून येतात म्हणून त्यांना त्यांच्या आवडीची मिठाई किंवा चॉकलेट्स द्या जेणेकरून त्यांना होणाऱ्या वेदना व मानसिक ताणतणाव त्या पासून त्या दूर राहतील.

 

deepika 1 inmarathi

 

संयमी वागा –

तिला होणाऱ्या वेदनांमुळे अनेकदा स्त्रियांची चिडचीड होते अनेकदा त्यांचा संयम सुटतो अशा वेळी आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.

 

hands inmarathi

 

त्यांना येणाऱ्या राग हा त्यांना होणाऱ्या वेदनांमुळे होत असतो.

 

तिला तिची स्पेस द्या

 

lonely time inmarathi

 

अशा काळात स्त्रियांना एकटे वाटत असते, काही करायची इच्छा नसते, अशा वेळी त्यांच्या मागे न लागत काही काळ त्यानं एकटे राहू द्या. काही काळानंतर त्यांच्याशी बोला.

तिला हसवा –

हसणे हे सर्वोत्तम औषध आहे असे डॉक्टर म्हणतात त्याच प्रमाणे अशा दिवसांमध्ये नैराश्य येऊ शकते म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला हसवायचा प्रयत्न करा. एखादा आवडता विनोदी सिनेमा एकत्र बसून बघा.

 

laughing inmarathi

 

फक्त ऐका

कोणीतरी आपले ऐकते ही भावना कितीतरी सुखकारक असते. त्यात अशा दिवसांमध्ये तर जास्तच चांगली गोष्ट आहे. अशा कालावधीत एकटेपणाची भावना जास्त निर्माण होते त्यामुळे त्यांना सवांद साधवासा वाटला तर त्याचे म्हणणे ऐका.

 

srk inmarathi

हे ही वाचा – मुलींची पहिली मासिक पाळी येथे चक्क “साजरी” केली जाते…

तिच्यासाठी सॅनिटरी पॅड खरेदी करा –

 

padman inmarathi

 

सॅनिटरी पॅड शिल्लक आहेत कि नाही ते पाहणे व ना सांगता घेऊन आल्यास, तिला ही वाटू शकते की आपली काळजी कोणीतरी घेत आहे.

तिला नाराज करू नका –

अशा दिवसांमध्ये शक्यतो तिला नाराज करू नका ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या नंतर नीट समजावून सांगा. जुने मुद्दे काढून भांडण करू नका.

sad inmarathi

 

तिच्या भावनांचा आदर करा –

कित्येक वेळा आपण नकळत बोलून जातो, त्यामुळे समोरचा दुखी होऊ शकतो. या काळात बोलताना सांभाळून बोला तिच्या भावनांचा आदर करा, आपले तिच्यावर प्रेम आहे हे दाखवा तिची काळजी घ्या. घरी आनंदी व सकारात्मक वातावरण ठेवा.

 

hug deepika ranveer inmarathi

 

शक्यतो तिला आराम करू द्या –

अशा दिवसांमध्ये काही वेळा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असतो, त्यामुळे साहजिकच थकवा जाणवू शकतो. अशा वेळी तुम्ही घरातील काम करण्याचा पुढाकार घ्या व तिला आराम करण्यास सांगा. श्रमाची काम करण्यास देऊ नका.

 

rest inmarathi

 

शरीर संबंधासाठी आग्रही राहू नका –

स्त्रिया आधीच अशा दिवसांमध्ये अनेक वेदना सहन करत असतात त्यात जर शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांना अधिक वेदना होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो शारीरिक संबंध टाळा.

या काळात तिच्यासोबत घालवलेले क्षण, तिला आवडणा-या गोष्टीतील तुमचा सहवास तिच्यासाठी जास्त महत्वाचा आहे.

 

indian couple InMarathi

 

निसर्गाने महिलांना दिलेली ही देणगी आहे. पाळी येणे म्हणजे सुदृढ शरीराचं लक्षण आहे, पाळी येऊन गेली की तुमचे शरीर शुद्ध होते. असे अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मासिक पाळीबद्दल अनेक वर्षपासून गैरसमज निर्माण आहेत. एकीकडे महिला सबलीकरण्याच्या गोष्टी करणारे आपण स्त्रीच्या ‘अशा’ दिवसांमध्ये आज ही आपण तिला वेगळे ठेवतो, आज ही अनेक घरांमध्ये हे चित्र दिसून येते. अशा दिवसांमध्ये आपण तिला वेगळं न ठेवता आपण तिच्यासोबत आहोत हे दाखवून दिले पाहिजे.

===

हे ही वाचा – मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?