' डिजीटल इंडिया हवेत: इथे मंत्री साधा कॉल करण्यासाठी आकाशपाळण्यात बसत आहेत! – InMarathi

डिजीटल इंडिया हवेत: इथे मंत्री साधा कॉल करण्यासाठी आकाशपाळण्यात बसत आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

डिजीटल इंडिया, मेरा देश पढ रहा, आगे बढ रहा है, कागजी काम होगा कम-डिजीटल होगा देश का हर जन…अगदी लहान मुलांनाही तोंडपाठ असणाऱ्या या घोषणा.

भारताला ‘डिजीटल इंडिया’ करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारने आपला हा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रसिद्धीची पुरेपुर काळजी घेतली.

 

modi gov inmarathi

 

 

आपल्या महत्वकांक्षी योजनांपैकी असणारा हा प्रकल्प म्हणजे जणू काही भारताचं भविष्य आहे असंही स्वप्न सरकारने काही वर्षांपुर्वी दाखवलं. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेतून जागं होतं त्यासाठी परिश्रम करावे लागतात याचा मात्र सरकारला विसर पडलेला दिसतो.

थांबा, हे आम्ही म्हणत नाही, या देशाची जनताही म्हणत नाही ना विरोधी पक्ष म्हणतोय. हे वक्तव्य वा टिका नसून एक दुर्दैवी वास्तव आहे.

विश्वास बसत नाहीये? मग नेमकं हे वास्तव काय आहे? मोदी सरकारच्या घोषणा किती फोल ठरत आहेत हे पहायचं असेल तर आपल्याला मध्यप्रदेशमधील अशोक नगर भागात जावं लागेल.

मध्यप्रदेश सरकारच्या मंत्रीमंडळातील भाजप नेते बृजेंद्र सिंह यादव हे मुळचे मुंगावलीच्या सुरेल गावचे. गावात भागवत कथा सप्ताहाचे ते मुख्य आयोजक असल्याने सध्या काही दिवसांसाठी त्यांचा मुक्काम याच गावात आहे.

 

brujendra yaadav inmarathi

 

भाजपचेच सरकार असलेल्या या गावाला डिजीटल सेवा तर ठाऊकच नाहीत. जिथे मोबाईलची रेंज ही किमान अपेक्षाही पूर्ण होत नाही तिथे ऑनलाईन पेमेंट सारख्या सेवा मिळण्याचा विचारही अवघड.

तर या गावातील नागरिकांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे मोबाईल रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत, मात्र सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया न मिळाल्याने आजही या गावातील नागरिक रेंजच्या शोधात झाडावर चढून बसलेले आढळतात.

तुम्ही कधी या गावात गेलात आणि झाडाझाडांवर चढलेली लोकं दिसली तर नवल वाटू नये, कारण रेंजच्या शोधात भटकण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न इथे रोजचाच आहे.

मात्र यापुर्वी नागरिकांची ही व्यथा फारशी कुणाला ठाऊक नव्हती, मात्र जेंव्हा याच परिस्थितीत भाजपचे नेते अडकले तेंव्हा मात्र हे वास्तव ‘न्युज’ म्हणून व्हायरल होवू लागले.

झालं असं, भागवत कथा सप्ताहासाठी गावात आलेल्या मंत्री महोदयांना आपली अनेक प्रलंबित कामं मार्गी लावायची होती. महोत्सवाच्या आयोजनासह गावक-यांच्या समस्या ऐकून त्या अधिका-यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, आणि या सगळ्या कामांसाठी मोबाईलला पर्याय नव्हता.

मंत्री महोदयांनी गावातील प्रत्येक ठिकाणी जात नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे सगले प्रयत्न फोल ठरले.

एकीकडे नेटवर्क अभावी कामं खोळंबल्याने बृजेंद्र यादव अस्वस्थ होत असतानाच अखेरिस एका गावकऱ्याने गावातील आकाशपाळण्याकडे बोट दाखवले.

जत्रेसाठी गावात आणलेल्या आकाशपाळण्यात बसण्याचे धाडस दाखवत मंत्रीमहोदयांसाठी पाळणा सुरु करण्यात आला, पाळणा उंचीवर गेला असता मंत्र्यांच्या मोबाईलाला नेटवर्क मिळाले. त्यामुळे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पाळणा याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय खुद्द मंत्री महोदयांनीच घेतल्याने गावकऱ्यांना पर्याय नव्हता.

 

akashpalna inmarathi

 

अखेरिस ५० फुटांवर तब्बल तीन तास ‘वर्क फ्रॉम आकाशपाळणा’ केल्यानंतर मंत्र्यांच्याच आदेशाने पाळणा खाली उतरवण्यात आला.

या कालावधीत आकाशपाळण्यातून काम करणारे मंत्री वाऱ्याच्या वेगात व्हायरल झाले होते.

हा प्रसंग म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणा-या सरकारच्या फसलेल्या योजनांचा आरसाच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिथे प्राथमिक गरजांसाठी खुद्द मंत्र्यांचीच ओढाताण होतीय तिथे सर्वसामान्य जनतेची व्यथा कोण जाणणार हा प्रश्न आहेच.

एरव्ही जनतेचे प्रश्न सरकारच्या कानांपर्यंत पोहोचत नसले तरी आता प्रत्यक्ष मंत्र्यांनाच आलेल्या अनुभवामुळे तरी गावातील परिस्थिती सुधारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?