अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तारीख होती एप्रिल ३, १९८४, कुणाला माहित होते, की ही तारीख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिली जाणार आहे म्हणून! याच दिवशी “राकेश शर्मा” हा भारताकडून अवकाशात झेपावणारा पहिला अंतराळवीर ठरला.
भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जेव्हा त्याला विचारले की भारत अंतराळातून कसा दिसतो, तेव्हा त्याने जे उत्तर दिले ते आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरले गेले आहे. तो म्हणाला, होता “सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा”…
आज पुन्हा एकदा आपला ऊर अभिमानाने भरून येईल अशी एक घटना घडली आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती मोहन यांच्या नेतृत्त्वात NASA च्या महत्वाकांक्षी “मार्स रोव्हर पर्सिव्हरन्स” या यानाने “मंगळ” ग्रहावर यशस्वी “surface landing” केले. पर्यायाने NASA च्या आणि भारताच्या सुद्धा शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.
ह्यामागे त्यांची स्वतःची कामात झोकून देण्याची वृत्ती, अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी आणि ध्येयाचा ध्यास घेण्याची प्रवृत्ती या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे.
–
हे ही वाचा – भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…!
–
सुमारे ८ वर्षांपासून डॉक्टर स्वाती मोहन या “मार्स रोव्हर पर्सिव्हरन्स” प्रोजेक्टसाठी काम करत आहेत. त्यातही आणखी विशेष बाब म्हणजे या मोहिमेवर असताना “कंट्रोल अँड लँडिंग” ह्या महत्वाच्या जबाबदाऱ्या डॉक्टर स्वाती मोहन यांनी सांभाळल्या आहेत. म्हणूनच या सर्व यशाच्या त्या खऱ्या मानकरी आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
अशा या डॉक्टर स्वाती मोहन अवघ्या १ वर्षाच्या असताना भारतातून अमेरिकेत आल्या. त्या मूळच्या बंगलोरच्या. त्यांचे आजी व आजोबा आजही बंगलोरला राहतात. उन्हाळी सुट्टी लागली, की त्या भारतात हमखास येतातच.
त्यांची कर्मभूमी जरी अमेरिका असली तरी त्यांनी आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते आजही टिकून ठेवले आहे हे विशेष.
साधारणता ९ किंवा १० वर्षाच्या असताना त्यांनी “star trek” या मालिकेचा एक एपिसोड पाहिला. त्यात असे दाखवले होते Space Enterprise आकाशगंगेच्या एका टोकावर फेकले जाते आणि आकाशगंगेचे सुंदर चित्र दिसते.
हे दृश्य पाहून त्या भारावून गेल्या आणि मग त्यांच्या मनात विचार आला, की ‘मी जर आत्ता या enterprise वर असते, तर आकाशगंगेतल्या कितीतरी नवीन गोष्टी मी शिकू शकले असते”. त्यांच्या मनात “अंतराळ संशोधन या विषयाबद्दल आवड निर्माण झाली. या आवडीचे रूपांतर पुढे त्यांना एका उत्तुंग अशा शिखरावर नेऊन ठेवले.
“work hard in silence and let the success be the noise” या उक्तीप्रमाणे त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यांची पहिली इंटर्नशिप ही NASA Goddard Space Flight Center मध्ये होती. नंतर पुढील शिक्षणासाठी त्या “Carnel” ला गेल्या जिथे त्यांनी Jet Prapoltion Laboratory मध्ये बराच काळ व्यतीत केला.
या काळात त्यांची अनेक महत्वाच्या व्यक्तींशी ओळख झाली. “slow but steady, अशी वाटचाल करत त्यांनी Kennedy Space Center ची इंटर्नशिप मिळवली. पुढे NASA बरोबर काम करण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. याच काळात त्यांना अंतराळाबद्दल खूप काही शिकायला मिळाले, तसेच अंतराळ क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली.
NASA चे हे प्रोजेक्ट सोपे नक्कीच नव्हते. कदाचित म्हणूनच डॉक्टर स्वाती मोहन यांची निवड यासाठी झाली असावी. “India always like challenges”, असे बाहेरच्या देशात म्हटले जाते, ते काही खोटे नाही.
या सर्व प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या, कधी कधी नैराश्यसुद्धा आले, पण या सगळ्यावर मात करत त्यांनी आपला project समर्थपणे पार पाडला.
ज्यावेळी या यानाचा “touchdown” म्हणजे मंगळावर उतरण्याचा मार्ग यशस्वीरीत्या अधोरेखीत झाला, त्याचवेळी कॅलीफोर्नियामध्ये NASA च्या Misson Control Room मध्ये, मोठा जल्लोष करण्यात आला. या प्रोजेक्टमधील सगळ्यात अवघड आव्हान त्यांनी पार केले होते.
‘मंगळवार जीवसृष्टी आहे का?’ हा नेहमीच एक कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे.
जगातील अनेक देश याचे उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळ्या मोहीमा आखत असतात. एका देशाने केलेले संशोधन हे बाकीच्यांसाठी मार्गदर्शक ठरते आणि त्यातूनच नवीन माहितीचा उगम होतो.
Mars Rover Persiverance आता पुढील २ वर्षे मंगळवारचे फोटो काढून NASA कडे पाठवेल. मंगळावरील पृष्ठभाग खणून तिथे जीवसृष्टी होती का याचा अभ्यास करेल. यातून मिळणारी माहिती खूप मोलाची असणार आहे.
या एका प्रोजेक्टच्या यशामध्ये पुढील यशाची मुहूर्तमेढ नक्कीच रोवली गेली आहे. अशा या कामात एका भारतीयाचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे हे बघून प्रचंड अभिमान वाटतो.
===
हे ही वाचा – `ती’ची गगनभरारी भारतीयांसाठी आजही अभिमानास्पद आहे
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.