यंदाच्या बजेटमध्ये नवे वेतन कोड आणि व्हीपीएफ (पीएफ) मध्ये झालेले बदल जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : शिवानी दाणी वखरे (अर्थविषयक सल्लागार)
(सोशिओ-इकॉनॉमी-पोलिटिकल अनॅलिस्ट, भाजप प्रवक्त्या, महाराष्ट्र)
===
बजेट २०२१-२२ सामान्य गुंतवणूकदारांसाठी काही बॅड न्यूज नाही घेऊन आली हीच काय ती गुड न्यूज समजायला हवी असे काही जाणकारांचे म्हणणे होते पण ह्या बजेट मध्ये काही सामान्य आणि उच्च उत्पन्न गटाच्या नागरिकांसाठी काहीसे नियम मात्र नक्कीच बदलवणारे असतील आणि भविष्यात ती गुड न्यूज असेल कि बॅड न्यूज असेल हे मात्र काळ ठरवेल.
आता काय आहे हे नवे वेतन कोड आणि काय बदल केले व्हीपीएफ म्हणजे पीएफ मध्ये ते जाणून घेऊया.
व्हीपीएफ अथवा पीएफ:
मुळात तुमचा पगार जेवढा पण असतो त्यात विविध हेड असतात. बेसिक पे, एचआरए, डीए, टीए, इतर भत्ते असे सगळे मिळून सगळ्यांची गोळा बेरीज केली तर आपला पगाराचा एकूण आकडा येतो. आणि ह्यात बहुतांश वेळी तुमचे टेक होम म्हणजे घरी येणारी रक्कम जी असते त्यात बेसिक पे हा खूप कमी असतो.
===
हे ही वाचा – इंग्रजांच्या सोयीसाठी भारतावर लादलेली ‘बजेट’ची प्रथा बदलण्यास ५० वर्षांचा काळ लोटला!
===
उदाहरण म्हणजे १ लाख असेल पगार तर त्या पैकी ३००००/४०००० केवळ बेसिक पे असतो बाकी मग एचआरए, इतर भत्ते मिळून तुमचा पगार १ लाख होत असतो.
आज जर या बेसिक पे ४०००० आहे तर त्याच्या किमान १२% हे पीएफ योगदान देणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्या पगारातून १२%, ४०००० चे म्हणजे ४८०० वजा होतील ते पीएफ योगदान म्हणून कटतील आणि बाकी पगार तुमच्या खात्यात जमा होईल.
आता तुम्हाला ४८०० योगदान देणे अनिवार्य आहे. पण जर का तुम्हाला अधिकचे पैसे पीएफ मध्ये भरायचे असतील कारण आकर्षक व्याजाचे दर असतात.
तर तुम्हाला ऐच्छिक जितकी रक्कम भरायची असेल त्याला व्हॉलेंटरी पीएफ म्हणजे व्हीपीएफ म्हणून तुम्ही योगदान देऊ शकता.
आता ह्यात नवी गोम ही आहे, की तुमचे वार्षिक योगदान २.५ लाख पर्यंत योगदान जे कराल त्यावर मिळणाऱ्या परताव्या वर कुठलेही कर लागणार नाही. पण वार्षिक २.५ लाखच्या वर जे पण योगदान तुम्ही कराल, पीएफ म्हणून किव्वा व्हीपीएफ म्हणून त्यावरील योगदानावर मिळणाऱ्या परताव्यावर कर लागणार.
२.५ लाख वार्षिक योगदान म्हणजे मासिक २.५ लाख भागिले १२ (महिने) = २०,८३३ रुपये मासिक योगदान (१२% बेसिक पेच्या) म्हणजे २०८३३ म्हणजे १२% तर एकूण बेसिक पे १७३६११ मासिक एवढा आहे.
१७३६११ बेसिक पे म्हणजे एकूण पगार हा वार्षिक ४० लाखाच्या वर असेल. हे आपण सगळे पी एफ बद्दल बोलतो आहे. व्हीपीएफ वर बोलतच नाही. ४० लाख वार्षिक पगार म्हणजे तुम्ही ३०% करप्रणाली मध्ये येतात.
त्यामुळे तुम्ही २.५ लाखाच्या वर जे पण काही योगदान कराल त्यावर एकतर परताव्यावर कर लागेल आणि इफेक्टिव्ह दर जर बघितला तर असे लक्षात येते जेवढे आधीक योगदान द्याल तर तुम्हाला मिळणारे इफेक्टिव्ह व्याजाचे दर कमी पडतील.
हा जो खाली तक्ता दिला आहे.
याद्वारे हे सिद्ध होते की ज्या नागरिक गलेलठ्ठ पगार आहे, ते वार्षिक २.५ पर्यंत करतील योगदान त्यावरील परताव्या वर काही कर लागणार नाही, वर अजून जास्त पगार असेल आणि १२% अनिवार्य योगदान असेल तर मिळणार परतावा कमी होईल.
जर का काही नौकरदार वर्ग ज्यांचे १२% म्हणून २ लाख योगदान होत असेल आणि ते व्हीपीएफ अधिकचा १ लाख भरत असतील तर एकूण पहिल्या २.५ लाखावर वरील नियमानुसार काही परताव्यावर कर लागणार नाही. पण पुढे लागेल ज्यामुळे इफेक्टिव्ह व्याज कमी मिळेल.
नवे वेतन कोड
हा सुद्धा विषय ह्याच लेखात घेण्याचा हेतू हा, कि ह्या मुळे पीएफ वर असर पडणार आहे. अगदी काल पर्यंत आणि आज सुद्धा एकूण पगाराच्या बेसिक पे हे अगदी तुटपुंज असत.
आणि ज्यामुळे अनिवार्य पीएफ योगदान १२% हे सुद्धा कमी येणं अनुक्रमे आहे. आता नवा वेतन कोड म्हणतो. तुमचे बेसिक पे तुमच्या एकूण पगाराच्या ५०% असणे अनिवार्य आहे.
===
हे ही वाचा – नोकरदार वर्गाचा भविष्यातला सोबती “प्रॉव्हिडंट फंडचा” बॅलन्स एका क्लिक वर समजू शकतो!
===
नवीन वेतन कोडमुळे पीएफचा योगदान वाढेल नवीन वेतन कोड अंतर्गत मूलभूत पगार एकूण उत्पन्नाच्या ५० % असणे आवश्यक आहे. जर मूलभूत वेतन वाढविले गेले तर आपोआप पीएफचे योगदान समान प्रमाणात जाईल.
उत्पन्न विद्यमान रचना नवीन व्हेज कोड नंतर :
हा तक्ता साफ दाखवतो आधीचे आणि आता बदलणारे चित्र. आधी ८४००० बेसिक पे असताना केवळ १२०९६० इतके वार्षिक अनिवार्य योगदान म्हणून करायचे, पण आता एकूण पगार २३०००० असेल तर त्याच्या ५०% बेसिक पे असणे अनिवार्य असेल जे कि होईल ११५००० रुपये. आणि ह्याचे १२% म्हणजे वार्षिक १६५६०० रुपये योगदान अनिवार्य योगदान म्हणून द्यावे लागेल.
आता नवीन वेतन आयोगामुळे पगार तेवढाच असेल पण पीएफचे योगदान वाढेल आणि सरकारला जास्त पैसे पीएफ मधून मिळेल. ह्यात सुद्धा व्हीपीएफ साठी पुन्हा २.५ लाख पर्यंतचा वरील नियम आहे तो आहेच.
हे आहेत दोन महत्वाचे बदल ह्या बजेट मधले. रिस्क फ्री रिटर्न म्हणून पीएफ आणि व्हीपीएफ कडे बघितले जाते. त्यात कर नियोजन योग्य करता आले तर कदाचित पीपीएफ सुद्धा एक चांगला पर्याय राहू शकतो.
ह्यात काही माहिती जाणून घ्यायची असल्यास कमेंट्स मध्ये कळवा. आणि मित्रांनो, नवीन वेतन कोड मुळे थोडा कमी पगार हातही येईल ह्याची तयारी करून ठेवा…. बघा पटतंय का??
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.