जीजसमुळे हिंदू देवांचं महत्त्व कमी होतंय का? केरळ सरकारचा ‘अजब’ सवाल… वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य, शांत समुद्रकिनारे, यामुळे आज पर्यटनामध्ये केरळ अग्रेसर राज्य आहे पण हेच राज्य पर्यटन बरोबरीने इतर गोष्टीमुळे कायम चर्चेत राहणारे राज्य आहे.
ते डाव्यांचे राजकारण करणे असो, कोरोनाचा भारतातील शिरकाव किंवा नुकताच आलेला ‘बर्ड फ्लू’सारखा संसर्गजन्य रोग असो, हे राज्य कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येते.
God’s own country अशी टॅगलाईन असलेल्या केरळ राज्यात नुकताच हिंदू धर्माविषयीचा एक प्रश्न उफाळून आला आहे, ज्यामुळे अनेक हिंदू लोकांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
नक्की प्रकरण काय?
केरळ राज्य इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (केलट्रॉन)ने केरळ सरकारने तिरुअनंतपुरमच्या आधारे घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नावलीवर प्रश्न पडला होता, तो असा होता की,
‘येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतर कोणत्या देवताचे महत्व कमी झाले ?’
ब्रह्मा, विष्णू, महेश्वरन, इंद्र असे ४ पर्याय देण्यात आले होते.
या प्रश्नामुळे नक्कीच हिंदू धार्मिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच हिंदु समुदायाने आक्रोश व्यक्त केल्यामुळे, परीक्षेला आलेल्या उमेदवारांनी तसेच अनेक सामान्य नागरिकांनी, प्रश्नोत्तराच्या एजन्सीला दोषी ठरवले.
–
हे ही वाचा – हिंदू युग ‘लक्ष’ वर्षांचे असूनही राम-कृष्ण हजार वर्षांपूर्वीचे? वाचा या प्रश्नाचे उत्तर
–
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली. या चाचणीच्या निकालाच्या आधारे पास झालेल्या उमेदवारांना अक्षय केंद्रांच्या फ्रँचायझी देण्यात येतील.
यावर केलट्रॉनच्या कोल्लम युनिटने सांगितले की, ‘हे प्रश्न तिरुअनंतपुरम हेड ऑफिसने तयार केले आहेत,तसेच त्यांचे पुढे असे ही म्हणणे आहे की परीक्षेला उपस्थित असलेल्या लोकांनी परीक्षेमध्ये अशा ‘हास्यास्पद’ प्रश्नांचा समावेश केल्याने त्यांनी निषेध नोंदविला.
इतर वाद :
आसामच्या उपनिरीक्षकांसाठी सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे आढळल्याने रद्द करण्यात आल्या. पेपर गळतीसाठी कोणालाही जबाबदार धरले गेले नाही.
गेल्या वर्षी आमदार पीटी थॉमस यांनी केरळ प्रशासकीय सेवेच्या (केएएस) प्राथमिक परीक्षेसाठी प्रश्न तयार करताना पीएससीने (पब्लिक सर्विस कमिशन) पाकिस्तानच्या २००१ च्या नागरी सेवा परीक्षेतील प्रश्न चोरल्याचा आरोप केला होता. पीएससीचे अध्यक्ष एम. के. सकीर हे स्पष्टीकरण घेऊन बाहेर आले आणि त्यांनी हा आरोप ‘सब-स्टँडर्ड’ असल्याचे जाहीर केले.
सध्याच्या पिनारायी विजयन सरकारचा कार्यकाळ तीन महिन्यांत संपुष्टात येणार होता, तेव्हा डाव्या बाजूच्या कामगार संघटनांच्या दबावाखाली केलट्रॉन येथे २९६ तात्पुरत्या कामगारांना कायम नियुक्ती देण्यात आली होती – या प्रथेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला.
केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या केडरचे वर्चस्व आहे. त्यानंतर जन्मलेल्या (हिंदू धर्मात परिवर्तित) ख्रिश्चन लोकांचेही वर्चस्व आहे.
साहजिकच हिंदू देवी-देवतांचा अपमान करणे आणि त्यांची बदनामी करणे हे प्रकार चालू झाले आहेत. केरळमधील निवडणूक लवकरच होऊ घातली आहे त्यात असे धार्मिक वाद उफाळल्यास त्याचा फटका निवडणुकीत दिसून येईल.
===
हे ही वाचा – प्रभू ‘येशूचा’ जन्म आणि मृत्यू म्हणजे आजही बुचकळ्यात टाकणारं एक ‘रहस्य’ आहे
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.