जगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पृथ्वी अनेक रंगछटांनी व्यापलेली आहे. पृथ्वीच्या अनेक प्रदेशांना त्या ठिकाणांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख, अस्तित्व आहे. कुठे निसर्गाने त्याची कलाकारी साकारली आहे तर कुठे मानवाने.
‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे निसर्ग आणि आपण मिळून विश्व अधिकाधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न सतत करत आलेलो आहोत. यात प्रत्येक पिढीने आत्तापर्यंत आपले मोलाचे योगदान दिले आहे. जे पुढच्या पिढीला प्रेरणादायी असते.
जगाचा मागोवा घेतला असता असे अनेक अदभूत, अकलनिय, रहस्यमयी घटक हे नेहमी सर्वसामांन्याना मोहिनी घालत असतात. समाजाच्या श्रध्दांचा, जिव्हाळ्याचे घटक त्यात आघाडीवर असतात.
नावीन्यपूर्ण, कुतूहल वाढवणाऱ्या, आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या या ठिकाणांची संख्या भारतात खुप मोठ्या प्रमाणात आहे.
सर्वात प्राचीन संस्कृती असणारा देश अशी पार्श्वभूमी असणाऱ्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणांमुळे भारताची एक वेगळी ओळख जगभरात निर्माण झाली आहे.
–
हे ही वाचा – या मंदिराच्या खांबांतून येतो आवाज. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार!
–
भारतातली संस्कृती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा, कला, क्रीडा, साहित्य या अनेक विषयात मोलाचे योगदान आहे. कारण जगातल्या रचनात्मक कार्याचा मुख्य प्रेरणास्त्रोत हा भारत आहे.
देशातील संस्कृतीचे प्रतिबिंब हे त्या देशाच्या समाजव्यावस्थेवर उमटत असते. अगदी तसेच विविधतेने नटलेल्या भारतात आपल्या संस्कृतीचे अनेक प्रतिबिंब अनेक माध्यमातून ठिकठिकाणी पाहावयास मिळते.
भारतभूमीला खेड्यांचा देश म्हणून जशी ओळख आहे तशीच त्या खेड्यातील मंदिराचा देश म्हणून वेगळी ओळख आहे.
गुप्तकाळापासुन म्हणजेच सुमारे चौथ्या शतकापासून भारतीय मंदिरांना इतिहास आहे. ही मंदिरे जगभरातील स्थापत्यशास्त्राचा अभ्यासाचा विषय सुद्धा आहेत.
या मंदिराच्या माध्यमातून निसर्ग, विज्ञान, भूगोल यांचा योग्य समन्वय साधून भारतात स्थापत्य कलेत अनेक नवनवीन अविष्कार झालेले आहेत, असे अविष्का पाहताना किंवा त्या बाबतीत ऐकतांना, वाचतांना आपण अवाक होऊन जातो.
–
हे ही वाचा – महाशिवरात्र – भगवान शंकर यांवरील “ही” कथा जीवनाला निश्चितच दिशा देऊ जाईल
–
भारतात अशी असंख्य मंदिरे असून त्यातल्या त्यात दक्षिण भारत आणि तिथले मंदिरे खूपच रंजक आहेत. दक्षिण भारतातली द्रविड स्थापत्यकला आणि विशेषता मंदिरे ही जगात लोकप्रिय आहे .
कर्नाटकपासून ते कन्याकुमारी पर्यंत अनेक ठिकाणीची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. मंदिराचे निर्माण, पुराणातील त्यांच्या आख्यायिका, कथा, त्याठिकाणची कल्पकता, चालीरीती या सर्व गोष्टी मन प्रसन्न करणारे आहेत.
आज आपण अशाच एका अद्भुत, विलक्षण, दुर्मिळ तसेच एका प्रसिद्ध मंदिराची माहिती घेणार आहोत. ते देखील मंदिराचे माहेरघर असणाऱ्या दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील.
कर्नाटक राज्यातील कोल्हार जिल्हा, या जिल्ह्यातील काम्मासांदरा हे छोटसं गाव, याठिकाणी देवांचा देव महादेव यांचे अतिप्राचीन असे मंदिर कोटिलिंगेश्वर धाम या नावानं प्रसिद्ध आहे.
कोटिलिंगेश्वर धाम हे ‘भक्ती शक्ती’ चा अनोखा संगम असून याबरोबरच त्या ठिकाणच्या स्थापत्य कलेसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
जगातल्या, विशेषतः भारतातल्या अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान शंकराचं सर्वात मोठ मंदिर असण्याचा मान कोटिलिंगेश्वर धाम या ठिकाणाला जातो.
हे मंदिर ओळखलं जातं ते तेथिल विशाल अशा शिवलिंगामुळे! या ठिकाणी भगवान शंकराचे शिवलिंग हे ते तब्बल १०८ फूट उंच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
जगात यापेक्षा कोणतेही शिवलिंग इतक्या उंचीचे आढळत नाही. १०८ फूट ही जगभरात जितके काही शिवमंदिर आहेत त्यातल्या सर्वात उंच शिवलिंग म्हणून याची ओळख आहे.
याबरोबरच भगवान शंकरासमोर असणारा नंदी हा देखील तितक्याच ताकतीचा आहे. सुमारे ३५ फूट उंच, ६० फूट लांब आणि ४० फूट रुंद अशा आकाराचा हा भव्यदिव्य नंदीही भगवान शंकरापुढे स्थापित झालेला आहे.
भगवान शंकराच्या महाकाय शिवलिंगावरून आपली नजर हटत नाही, मात्र त्यावेळी त्याच्या आजुबाजुला असलेली असंख्य शिवलिंग बघून आश्चर्य आणि आनंद अशा संमिश्र भावना अनुभवता येतात.
एकाच आवारात इतक्या प्रचंड संख्येने शिवलिंग कशी? कोणी निर्माण केली? त्यांची नेमकी संख्या काय? असे प्रश्न आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.
तर त्यामागील खरी बाब ही, की भक्त मनात अनेक इच्छा घेऊन या मंदिरात येतात. श्रद्धेने, भक्तीने शिवशंकराचे दर्शन घेतात. त्यानंतर आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपआपल्या क्षमतेप्रमाणे एक शिवलिंग या मंदिरात नेऊन ठेवतात.
–
हे ही वाचा – निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच
–
अनेकजण आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणूनही शिवलिंग अर्पण करतात.
एक ते तीन फुटापर्यंत शिवलिंग भक्तांना मंदिरात देता येते. या मंदिरात भक्तांची रीघ इतकी मोठी असते की दररोज मोठ्या संख्येने शिवलिंग दिली जातात.
सुमारे एक कोटी पर्यंत शिवलिंगाची स्थापना त्याठिकाणी केलेली आहे.
शिवलिंगासह दूर्गामाता, गणेश, कुमार स्वामी, ब्रह्मा-विष्णू, अन्नपूर्णादेवी ,वेंकटरमण, पांडुरंग स्वामी, पंचमुखी गणपती, राम-लक्ष्मण-सीता यांची अशी अनेक मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
या ठिकाणच्या वृक्षाला पिवळे धागे बांधले की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशा पद्धतीची धारणा येथील भक्तांची आहे, यामुळे यामुळे भक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
कोटिलिंगेश्वर संस्थान ही आपल्या भक्तांच्या सेवा सुविधांसाठी तत्पर आहे. याठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था या बरोबरच सामाजिक उपक्रम म्हणून अत्यंत नाममात्र शुल्कात या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलं जातं.
महाशिवरात्र हा कोटिलिंगेश्वर संस्थानाचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध सेवा सुविधा आणि भक्तिपर कार्यक्रमाची रेलचेल असते.
आपल्या नावीन्यपूर्ण, जग प्रसिद्ध अशा सर्वात उंच शिवलिंग असणाऱ्या कोटिलेश्वर धाम हे भारताच्या समृद्धीचं एक सुवर्णपान आहे आणि यामुळेच कर्नाटक पर्यायानं भारताची जगात सर्वात उंच शिवलिंग म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
या कारणांनी वर्षभर संशोधकांची, भक्तांची रीघ या ठिकाणी असते आपणही दक्षिण भारताच्या पर्यटनासाठी जायचा विचार करत असाल तर कौटिलिंगेश्वर याठिकाणी जरूर जा.
===
हे ही वाचा – शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.