हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कधी प्रश्न पडलाय हॉटेलमध्ये वापरलेल्या, उरलेल्या साबणांचं काय करतात? वैयक्तिक ट्रिप, ऑफिससाठीचा प्रवास यामध्ये बऱ्याचदा रात्र ही हॉटेल मध्ये घालवली जाते.
चेक इन केलं की हॉटेल रूम मध्ये टॉवेल, साबण, टूथपेस्ट हे हातात टेकवले जाते. एका रात्रीपेक्षा जास्त स्टे असला तर टॉवेल आणि बेडशीट हे वेळच्या वेळी बदलले जाते.
नवीन साबण आणि शॅम्पू ठेवला जातो. चादरी आणि टॉवेल या ड्राय क्लीन करून त्या पुन्हा वापरल्या जातात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
एरवी आपला निवास संपला की आपण ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट तसेच सोडून निघून जातो. काय करायचं ते हॉटेल वाले बघून घेतील या मानसिकतेत आपण असतो.
पण कधी विचार केला आहे, की आपण मागे सोडून आलेल्या साबणाचे आणि तत्सम पदार्थांचे काय होत असेल? प्रथमदर्शनी ‘टाकून देत असतील’ असे उत्तर साहजिकच कोणीही देईल.
काही अंशी उत्तर बरोबर पण आहे. पण सगळेच टाकून देत नसतात. तर, आज बघूया याच टाकून दिलेल्या साबणाचे आणि इतर स्वछतेच्या वस्तूंचे काय होते.
दशकभरापूर्वी हे उरलेले सामान कचऱ्यातच जात असे. ज्यामुळे दिवसाला हजारो टन साबणाचा कचरा जमा होऊन पर्यावरणाला नुकसान पोहोचवायचे काम नित्यनेमाने चालू होते.
–
हे ही वाचा – शाम्पूची सवय वेळीच मोडा, या १५ गंभीर दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवा!
–
एका दिवसाला लाखो खोल्या मधून येणाऱ्या या साबणावर जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट जाहीर करून त्यावर उपाययोजना सुचवली.
एकीकडे शॅम्पु, साबण यांना केराची टोपली दाखवली जात असताना दुसरीकडे त्यांचाच परत उपयोग करून दारिद्र्य रेषेखालील सामान्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न निकालात लावला जाऊ शकतो.
२००९ साली एका एनजीओने केलेल्या सर्वेनुसार देशात १.५ लाख हॉटेलच्या खोल्यांमध्ये रोजच्या रोज प्रवाशांची वर्दळ असते. जिथून प्रत्येक खोली मधून एक या हिशोबार लाखो साबणच्या वड्या या फेकल्या जातात.
या रिपोर्टवर लक्ष केंद्रित करून ‘क्लीन द वर्ल्ड’ सारख्या संस्थांनी ‘ग्लोबल सोप ऑर्गनायझेशन’ सोबत एक प्रोजेक्ट लॉन्च केला. या प्रोजेक्ट अंतर्गत अर्ध्या वापरलेल्या साबणावर पुन्हा प्रक्रिया करून नवीन साबण बनवण्यात येऊ लागले.
जसं साबणावर ही प्रक्रिया सुरू झाली तशीच शॅम्पू, टूथपेस्ट, मॉइश्चरायझर यावर पण ही प्रक्रिया होऊ लागली.
या मोहिमेचा फायदा हा तिथल्या लोकांना होऊ लागला जिथे पाणी, स्वच्छता आणि सॅनिटायजेशन सारख्या सुविधांचा अभाव आहे.
एवढंच नव्हे तर गरीब देशात जिथे या वरील गोष्टींच्या अभावामुळे न्यूमोनिया, डायरिया सारख्या आजारांना बळी पडावे लागत होते, तिथे स्वछतेला चालना मिळत गेली.
क्लीन द वर्ल्डसारख्या संस्थांनी सुरू केलेल्या या प्रोजेक्टमुळे अनेक देशामधील सामाजिक संस्थांना प्रेरणा मिळाली.
त्यानुसार स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था या रोजच्या रोज हॉटेल मधून साबण, शॅम्पू चे उरलेले पाकीट आणि डब्बे गोळा करू लागले.
यांना जंतुविरहीत करून ते त्यांचे प्रोजेक्ट जिथे चालू आहेत तिथल्या गरिबांमध्ये वाटून टाकले जाऊ लागले. या वस्तू जंतूविरहीत करायला लागणारा खर्च सुद्धा कमी असल्याने या सामाजिक संस्थांना जास्त खर्च करावा लागत नाही.
कामत यांच्या ऑरचिड सारखे हॉटेल तर रिसायकल आणि जंतूविरहीत करूनच आपले स्वछतेचे साधन या संस्थांना देत आहेत.
कोरा वर याबाबतीत सर्च केले असता उत्तर मिळते, न वापरलेले साबण, शॅम्पू हे इतर येणाऱ्या प्रवाशांना देऊन त्याचा पुन्हा वापर केला जातो. ते अन्नपदार्थ नसल्याने त्याचा पुनर्वापर होऊन जातो.
काही वेळेला न वापरलेल्या वस्तू हे प्रवासी स्वतः सोबत घेऊन जातात. त्यामुळे काही वेळेस आम्हाला कमी जास्त प्रमाणात स्वछतेच्या वस्तू ह्या येणाऱ्या स्वयंसेवकाना द्यावे लागतात.
परंतु आजही अशी हॉटेल्स आहेत ज्यांचा या संस्थांशी संबंध नाही त्या आजही साबण आणि इतर स्वछतेच्या वस्तू फेकून देतात.
तसं बघायला गेलो तर साबण ही साधारण गोष्ट आहे, ५-१० रुपयांमध्ये सहज मिळणारी. पण ज्यांना पाणी आणि स्वछताच काय असतं ते माहीत नाही त्यांना साबण काय माहीत असणार?
स्वयंसेवी संघटना आणि हॉटेल यांच्या या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या समाजोपयोगी कार्याने आज अनेकांच्या स्वछतेचे प्रश्न हे मार्गी लागत आहेत.
===
हे ही वाचा – हॉटेलमध्ये राहताना नकळत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या ७ गोष्टी फायद्याच्या
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.