' गाड्यांच्या टायर्सचा रंग काळा का असतो? वाचा यामागची थक्क करणारी कारणं – InMarathi

गाड्यांच्या टायर्सचा रंग काळा का असतो? वाचा यामागची थक्क करणारी कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवाच्या प्रगतीचे काही टप्पे मानले जातात. चाकाचा शोध ही त्यातील एक महत्वाची घटना म्हणावी लागेल. आज अगदीच सहज वाटणारी ‘टायर’ ही वस्तू अस्तिवातच आली नसती तर किती वेगळी परिस्थिती असली असती नाही का?

सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस हायवे तयार होत आहेत. ज्या गतीने आपण आधी गाडी चालवू शकत होतो आणि आज चालवू शकतो त्यात खूप मोठा बदल झाला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतात तरी या बदलाची नांदी होण्यासाठी खूप वर्ष लागली असं म्हणावं लागेल.

परदेशातील वाहतूक व्यवस्था आणि रोडवर गाडी चालवण्याची पद्धत बघितली की लक्षात येतं की, रोड वर पहिला अधिकार हा गाडीचा असतो आणि माणसांना चालण्यासाठी पर्यायी पादचारी मार्ग हे प्रत्येक रोडवर दिले गेले पाहिजेत.

 

car on road inmarathi

 

हे का गरजेचं आहे? तुम्ही जितकं गाडी थांबवत चालवता तितकं पेट्रोल जास्त खर्च होतं, वेळ जास्त लागतो, प्रवासाचा आनंद न घेता तो एक त्रास बनतो आणि सर्वात महत्वाचं आपल्या गाडीच्या टायर्सची झीज होते.

गाडीच्या टायर्सचा आपण तेव्हाच विचार करतो जेव्हा एक तर गाडी पंक्चर होते किंवा जेव्हा तुमच्या बाजूने जाणारी एखादी गाडी तुम्हाला खुणावून सांगतो की, “तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा कमी आहे”.

===

हे ही वाचाभारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या..

===

तुमचं असं होत नसेल आणि तुम्ही नियमित गाडीच्या टायर्सची सुद्धा काळजी घेत असाल तर चांगलंच आहे.

आपल्या गाडीच्या आणि पर्यायाने आपल्या प्रगतीच्या या चाकाबद्दल एक प्रश्न नेहमीच पडतो की याचा रंग काळा का असेल?

 

tyres inmarathi

 

काळा रंग चांगला नाही किंवा अशुभ असतो असं काही अंधश्रद्धा पसरवणारं मत मांडत नाही आहोत. पण, बघा ना गाड्यांमध्ये इतके रंग आले, ‘मल्टी कलर’ म्हणजेच अर्धी गाडी एका रंगाची आणि अर्धी दुसऱ्या हा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला.

टायर्स मात्र काळेच असतात, फार तर त्यावरून एक चांदीच्या रंगाचं एक आवरण काही वर्षांपासून वाढवण्यात आलं आहे, ज्यावर त्या कारची कंपनी आपली जाहिरात करत असते.

मग का नाही आपण लहानपणापासून खेळत असलेल्या या टायर्सला कधी रंगपंचमी खेळता आली?

“टायर्स काळे का असतात?” हा प्रश्न नवीन चौकस पिढी आपल्याला विचारेल आणि तेव्हा उत्तर माहीत नसेल त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत.

लाकडाच्या चाकाने सुरू झालेला हा प्रवास १८९५ पासून रबर टायर्स मध्ये परिवर्तन झालं. रबरचा मूळ रंग हा पांढरा असतो आणि म्हणून सुरुवातीला टायर हे पांढऱ्या रंगात असायचे. १८८० मध्ये ज्या कार तयार व्हायच्या त्यामध्ये टायर्स हे पांढऱ्या रंगात बसवले जायचे.

 

tyres 2 inmarathi

 

त्याकाळात आजच्या इतका प्रवास नक्कीच नसेल, म्हणून पांढरा रंग हा जास्त काळ टिकून रहायचा. कालांतराने टायर्स तयार करणाऱ्या कंपनीच्या हे लक्षात आलं की, पांढऱ्या रंगामुळे चाक हे कमी काळ त्याच्या मूळ स्वरूपात रहायचं.

चाकाचं आयुर्मान वाढवण्यासाठी त्यामध्ये काजळी समाविष्ट करण्याचा पर्याय संशोधनात समोर आला होता.

काजळी सोबतच कापसाचे धागे म्हणजेच ‘टायर कॉर्ड्स’ यांचा सुद्धा समावेश करण्यात आला ज्यामुळे टायर्सची शक्ती वाढली आणि उष्णता शोषून घेण्याचं प्रमाण कमी झालं.

२० व्या शतकात तंत्रज्ञानात अजून सुधारणा झाली आणि काजळीला ‘कार्बन ब्लॅक’ या रंगाने बदलून टाकलं. त्याआधी ‘झिंक ऑक्साईड’ हे टायर मध्ये वापरलं जायचं ज्यामुळे टायरचा रंग हा पांढरा रहायचा.

कार्बन ब्लॅकचा समावेश केल्यानंतर टायर्स हे आधीपेक्षा किती तरी जास्त काळ म्हणजेच जास्त किलोमीटर्स पर्यंत त्यांच्या ग्राहकांना साथ देऊ लागले.

टायर्स स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा टायर्सचा काळा रंग हा जास्त पसंत केला जाऊ लागला. पांढरे टायर्स स्वच्छ ठेवणं आपल्यालासुद्धा खूप अवघड गेलं असतं. पण, हे एकच कारण नाहीये ज्यामुळे टायर्सचा रंग हा काळा ठेवण्यात आला.

कार्बन ब्लॅक हे टायर्सची सूर्याच्या अल्ट्राव्हॉइलेट म्हणजेच अतिनील किरणांपासून सुरक्षा करणारं ‘कवच’ म्हणून काम करत असतं. वातावरणातील ओझोन आणि अतिनील किरणे ही रबरला वितळवू शकतात. या दोन्ही पासून टायर्सची सुरक्षा ही कार्बन ब्लॅक मुळे होत असते.

 

carbon black inmarathi

 

१९६० मध्ये गुडइयर टायर्स ने “कधीही न घडलेला” प्रयोग म्हणून टायर्सला विविध रंगात आणण्याचा प्रयत्न केला होता. या टायर्सना ‘निओथेन टायर्स’ हे नाव देण्यात आलं होतं जे की निळ्या, लाल, सोनेरी अश्या विविध रंगात बाजारात आणले जाणार होते.

पण, हे टायर्स त्यांच्या टेस्टच्या पहिल्या फेरीतच बाद झाले कारण गती, वातावरण, उष्णता यासमोर टायर्सचा बचाव करण्यास हे रंग असमर्थ होते. त्यानंतर असा प्रयोग कोणीही करून बघितला नाही.

‘पिरेली’ या कंपनीने टायर्सच्या बाजूने एक आपल्या आवडीच्या रंगाची पट्टी देण्याचं काम सुरू केलं. पण, त्याला प्रतिसाद मिळाला तो फक्त ‘फेरारी’ मोटर शर्यतीच्या स्पर्धकांकडून ज्यांना खेळाडूच्या युनिफॉर्म च्या रंगाचे पट्टे गाडीच्या टायर वर लावून घेता आले.

कार्बन ब्लॅकचा अजून एक फायदा म्हणजे त्यामुळे गाडी जास्त सुरक्षित राहते. कार्बन ब्लॅकमुळे टायरची रोडवरची ग्रीप चांगली होती. या कार्बन ब्लॅकमुळेच सिनेमात आपल्या ‘बाजीराव सिंघम’ ला चालू गाडीतून उतरून व्हिलनला गोळी मारतांना बघता आलं.

 

singham inmarathi

 

मॅचिंग रंगाबद्दल सध्या सतर्क असलेल्या लोकांना काळा रंग हा यासाठी सुद्धा आवडतो की तो कोणत्याही रंगासोबत चालतो. गाडीचा रंग कोणताही असेल तरी टायरचा काळा रंग हा त्यामुळे कधीच विजोड दिसत नाही.

स्कॉर्पिओ वापरणारे पुढारी असो किंवा दुचाकीवर जाऊन होम डिलिव्हरी देणारा व्यक्ती असो, टायर्सचा एकच रंग हा काही बाबतीत तरी ‘विषमता’ कमी करतो असं म्हणता येईल.

===

हे ही वाचावेगात धावणारी रेल्वे मध्येच थोडीशी ‘उडते’ पण घसरत नाही – विज्ञान जाणून घ्या!

===

आपल्या गाडीच्या इंजिनला जर हृदय म्हंटलं तर टायर्सला नक्कीच गाडीचे पाय म्हणता येईल. ज्याप्रकारे टायर्स गाडीला रोडवर चालवतात त्यांचं कार्य हे गती नियंत्रणात ठेवणे आणि योग्य वेळी गाडीला थांबवणे हे सुद्धा असतं.

आपल्याला जगभरात कुठेही सहजपणे फिरु देणाऱ्या टायर्सबद्दल ही माहिती तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असेल तर ती नक्कीच शेयर करा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?