' ओळख, गाॅडफादर, प्रशिक्षण यापैकी काहीही नाही, प्रवास यशस्वी अभिनेत्रीचा… – InMarathi

ओळख, गाॅडफादर, प्रशिक्षण यापैकी काहीही नाही, प्रवास यशस्वी अभिनेत्रीचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दूरदर्शन जेव्हा भारतात चालू केलं, तेव्हा कुणालाही असं वाटलं नसेल, की पुढं जाऊन टीव्ही मालिका ही इंडस्ट्री होईल. कित्येक लोकांचे रोजगार सांभाळणारं मोठं साधन या सिरीयल्स ठरतील… सिनेमाच्या पडद्याइतकाच हा छोटा पडदा पण तितक्याच ताकदीने उभा राहील. असं सांगणाऱ्या लोकांना वेड्यात काढलं असतं.

छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारे बरेच कलाकार आपण पाहतो.. शाहरुख खान, इरफान खान, विद्या बालन, आशुतोष राणा हे सुरुवातीला टीव्ही मालिकांतील कलाकार होते, पण त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारा छोटा पडदा त्यांना सिनेमाच्या सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन गेला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही कलाकार असे आहेत जे दोन्ही ठिकाणी लीलया वावरत असतात. तेवढ्याच ताकदीने मोठ्या पडद्यावर वावरतात आणि छोटा पडदा ही गाजवतात.

अश्विनी काळसेकर हे एक तसंच नांव. दोन्ही पडद्यावर सहजावारी असणारा तिचा वावर! खलनायिकेचा रोलही सहजी करु शकते ती.. तशाच विनोदी भूमिका पण साकारते.

 

ashwini kalsekar inmarathi

 

तिचं गोलमाल मधलं काम बघा, किंवा खाकी मधील हवालदाराची बायको आठवा… त्याच बरोबरीने टीव्ही मालिकांतील तिच्या भूमिका पाहता अश्विनी हे एक आपलं नांव ठळकपणे लोकांसमोर आलेलं आहे.

२००६ ते २००९ या दरम्यान “कसम से” या मालिकेत “जिज्ञासा वालिया” हे निगेटिव्ह पात्र तिनं रंगवलं. अश्विनीला आता चित्रपट सृष्टीत येऊन २५ वर्षं झाली आहेत. विनोदी भूमिका, पाॅझिटिव्ह भूमिका हे करुनही अश्विनी लक्षात राहते ती निगेटिव्ह भूमिकांसाठीच. सीआयडी या प्रसिद्ध मालिकेत अश्विनी काळसेकरची भूमिका पाॅझिटिव्ह होती.

अश्विनीचा हा प्रवास कसा सुरु झाला?

 

ashwini kalsekar inmarathi1

 

२२ जानेवारी १९७० रोजी मुंबईत जन्मलेल्या अश्विनीने शिक्षण पूर्ण झाल्यावर एका एअरलाईन्स कंपनीत काम करत होती. ती केबिन क्रू मेंबर होती. दर शुक्रवारी तिला सुट्टी असायची. एके ठिकाणी आॅडीशन आहे असं समजलं म्हणून ती आपल्या मैत्रिणीसोबत तिथं  गेली.

त्यावेळी कबिर भाटिया यांनी तिला विचारलं, तुम्ही अभिनय कराल का? आणि अश्विनीला आपली पहिली सिरियल मिळाली “शांती”. मंदिरा बेदीची प्रमुख भूमिका असलेली ही सिरियल प्रचंड गाजली.

याचं श्रेय अश्विनी तिच्या आवाजाला देते. या सिरियलच्या शूटिंगसाठी दर शुक्रवारी अश्विनी जायची. नोकरी करत ती सिरियल पण करत होती. नंतर मात्र तिने ही नोकरी सोडून दिली आणि अभिनयालाच पूर्ण वेळ करिअर बनवलं.

पुढे सीआयडी ही मालिका तिला मिळाली. सोनी टीव्हीवर चालणारी ही मालिकाही प्रचंड यशस्वी ठरली.

 

ashwini kalsekar inmarathi3

हे ही वाचा – अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!

माणसाचं काम चांगलं असेल तर काम मिळायला कमी नसते. थोडी नशिबाची साथ आणि आपले भरपूर कष्ट यांनीच तर आयुष्यात यशस्वी होतात लोक. एक साॅलिड ब्रेक मिळणं हा त्याचाच एक भाग असतो. अश्विनीला असाच ब्रेक देणारी मालिका होती कसम से.. यातील तिची जिज्ञासा वालिया ही भूमिका!

ही भूमिका इतकी गाजली की तिला कितीतरी अॅवाॅर्ड मिळाले. जिज्ञासाचा लुक खूप गाजला.

डार्क काजळ, मोठी टिकली, आणि नाकातील मोठी नोज पिन ही तिची सिग्नेचर स्टाईल ठरली.

 

ashwini kalsekar inmarathi2

 

ही सिरियल मिळाली तेव्हा अश्विनी के स्ट्रीट पाली हिल ही सिरियल करत होती. जिज्ञासाचं पात्र करण्यासाठी तिनं बराच विचार केला नव्हता. तिनं नेहमीसारखी मोठी टिकली तशीच ठेवली. कारण ती नेहमीच मोठी टिकली लावते. खुदा गवाह या सिनेमात श्रीदेवीनं मोठी नोज पिन वापरली होती ती तिला फार आवडली होती.. तिनं तशीच पिन जिज्ञासा वालिया या भूमिकेसाठी वापरली.

त्यानंतर तिला एकता कपूरच्या जोधा अकबर या सिरियलमध्ये माहम अंगा ही भूमिका मिळाली. हे पात्र थोडं कठोर होतं. लोकांनी त्याही भूमिकेचं कौतुक केलं.

मग अश्विनीला गोलमाल हा सिनेमा मिळाला. अतिशय विनोदी असलेला हा सिनेमा पण खूप चालला. मग तर गोलमालचे सिक्वेल निघाले. पुढे अश्विनीने काही हाॅरर सिनेमातही काम केलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अश्विनीनं अभिनयासाठी कसलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. ती सांगते, “माझा कुणीही मॅनेजर नाही, जे काही काम मला मिळालं ते मागायला मी कुणाकडंही गेले नाही. जे माझे मित्र होते त्यांनीच मला माझं काम मिळवून दिलं.

 

ashwini kalsekar inmarathi4

 

सिनेमात केलेलं कामही माझ्या मित्रांसोबतच केलं आहे. माझी काही एजन्सी नाही, जी माझं मार्केटिंग करेल. मी कोणत्याही बॅनरला काम मागितलं नाही, ना ते लोक थेट माझ्यापर्यंत आले.

जे काही काम मिळालं ते मित्र मैत्रिणींच्या सहाय्याने मिळालं. मोठे बॅनर माझ्याकडे का येतील? ते तर स्टार लोकांकडंच जाणार. पण मला तिथंही काम मिळालं..ते माझ्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून!

एका मुलाखतीत अश्विनी म्हणते, “आम्ही टीव्ही कलाकार इथं आलो, कामं केली, मिळवली ती आमच्या टॅलेंट आणि व्यावसायिकतेच्या जीवावर. याचं गोष्टींमुळे आम्ही आजही इथं टिकून आहोत. ना कुणी गाॅडफादर, ना मॅनेजर ना कुटुंबाची अभिनयाची पार्श्वभूमी. पण तरीही आज आम्ही कलाकार इथं आहोत.

प्रत्येक जण रोहीत शेट्टी नसतो.. प्रत्येक जण श्रीराम राघवन नसतो. मला अॅप्रोच होणं त्यांना सोपं वाटलं… शक्यही झालं… ही शक्यता इतरांबाबत थोडी कमी असेल. इतरांना अॅप्रोच होणं त्यांना जमेल असंही नाही. पण ते माझ्याबाबतीत झालं.

कोणत्याही मोठ्या प्रोड्युसरचं, बॅनरचं नांव न घेता अश्विनीने इथं एक मोठी गोष्ट सांगितली आहे.. मोठे प्रोड्युसर, मोठे बॅनर मोठ्या कलाकारांनाच घेतात. रोहीत शेट्टी, राघवन यांचा फोन आला तर अश्विनी सिनेमासाठी कधीही नकार देत नाही. रामगोपाल वर्मा, एकता कपूर यांचंही मोठं योगदान आपल्या फिल्मी करिअरला आहे असं ती सांगते.

अश्विनी आता ५० वर्षांची आहे. ती वेबसिरीजपण करते आहे. झी-५ वरील हुतात्मा या सिरीजमध्ये तिनं काम केलं आहे. इतरही मराठी मालिका ती करते आहे.

काही असो, पण आज अश्विनी काळसेकर हे नांव आहे.. कामासाठी असलेलं समर्पण माणसाला किती चांगल्या गोष्टी देतं हेच अश्विनीकडं पाहून समजतं…नाही का?

===

हे ही वाचा – अभिनय, दमदार फाईट-सीन्स ने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?