' भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत… – InMarathi

भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कांद्याची पात आपल्या सर्वांना माहीत असलेली पालेभाजी आहे. कांद्याची पात जवळपास वर्षभर उपलब्ध असते. पातीचा हिरवागार रंग लगेच आपल्याला आकर्षित करतो, पण अनेकांना ती आवडते असं नाही.

कांद्याच्या पातीचा वापर हा फक्त सजावटीसाठीच केला जात नाही, तर तिचे आरोग्यासाठी देखील तितकेच अधिक फायदे आहेत. पातीचा हिरवा रंग असलेला भाग आणि त्या बरोबरच पांढरा भाग देखील तितकाच आरोग्यदायी असतो.

कांद्याच्या पातीची विशेष अशी वेगळी चव नसते, आपण नेहमी जो कांदा खातो त्याहून कमी तिखट अशी त्याची चव असते. चायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत, आणि आजच्या लेखात आपण ते जाणून घेणार आहोत.

 

kandapaat-inmarathi

 

आपण अनेकदा पाहतो की चायनीज पदार्थांमध्ये कांद्याच्या पातीचा फार उपयोग केला जातो. ज्या प्रमाणे भारतात सजावटीसाठी कोथिंबीर वापरली जाते अगदी त्याप्रमाणेच चीनमध्ये कांद्याची पात वापरली जाते.

५००० हजार वर्षांपूर्वी कांद्याच्या पातीचा शोध चीनमध्ये लागला. अगदी तेव्हापासून कांद्याची पात त्यांच्या आहारामध्ये वापरली जाते. प्राचीन इजिप्तमध्ये तर कांद्याच्या पातीची पूजा केली जात असे.

कांद्याच्या पातीचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे कांदा आणि पात यांची पोषक तत्वे एकत्रितपणे मिळतात.

या कांदापातीचे काय काय फायदे होतात, ते माहीत असायलाच हवं. चला तर मग जाणून घेऊया.

कॅन्सरची शक्यता कमी होते

हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये सल्फरचे प्रमाण आधिक असते. त्यामुळे संपूर्ण शरीराचा विचार करता कांद्याची पात आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे. कांदापात कॅन्सरच्या सेल्सची वाढ होऊ देत नाही.

कॅन्सरशी लढण्यासाठी कांद्याची पात अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे आपण नियमित आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी कांद्याची पात खायला हवीच.

 

kandapat-inmarathi

 

ब्लड शुगर नियंत्रित करते

शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असणं फार गरजेचं असतं. जेव्हा शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात असते तेव्हा आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात.

कांद्याच्या पातीमध्ये सल्फर असल्यामुळे ते आपल्या शरीरातील इन्सुलिन निर्मिती वाढविते. इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे डायबीटीसचा धोका कमी होतो.

 

sugar-level-check-inmarathi

 

पचनासाठी उत्तम

कांद्याच्या पातीमध्ये फायबर असल्यामुळे कांद्याच्या पातीचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवा. फायबर हे पचन होण्यासाठी खूप उपयुक्त असतात. कच्ची किंवा शिजवलेली कशाही प्रकारे तुम्ही कांद्याची पात खाऊ शकता.

 

 

kandapaat-bhaji-inmarathi

 

दृष्टी उत्तम राहते

कांद्याची पात डोळ्यांसाठीदेखील अतिशय उपयुक्त आहे. याबरोबरच कांद्याची पात हे ‘विटामीन ए’चा देखील उत्तम स्त्रोत आहे. तुम्ही अगदी कांद्याची पात, गाजर आणि काकडी एकत्र करून उत्तम सलाड बनवू शकता.

 

cut-kandapaat-inmarathi

 

फ्लू आणि सर्दीवर गुणकारी

ऋतूत बदल झाला की अनेकांना व्हायरल सर्दीचा त्रास होतो. सर्दीमुळे थोडी कणकण येतेच. अशा वेळेस कांद्याची पात अतिशय गुणकारी ठरते. प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते.

 

cough-and-cold-inmarathi

 

सर्दीच्या व्हायरसला मारण्यासाठी कांद्याची पात फायदेशीर आहे. तसेच कांद्याच्या पातीमध्ये विटामीन सी आणि ए असते त्यामुळे ते प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जर तुमची प्रतिकार शक्ती उत्तम असेल तर तुम्ही व्हायरल आजारांपासून वाचू शकता.

हाडांना मजबूत ठेवते

विटामीन के आणि विटामीन सी कांद्याच्या पातीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत होण्यासाठी कांद्याची पात फार गुणकारी आहे.

 

Pain in leg

 

कांद्याची पात तुम्ही जेवताना तोंडी देखील लावू शकता. चाळीशी नंतरच्या महिलांनी तर नक्कीच कांद्याची पात खावी. त्यामुळे त्यांना हात, पाय दुखणे अशा समस्या निर्माण होत नाही.

हे सुद्धा वाचा – उतारवयात हाडांचा त्रास होऊ नये, म्हणून आजपासूनच या गोष्टी पाळा!

पोटाच्या समस्या दूर करते

अनेकदा पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळेस कांद्याची पात उपयुक्त ठरते. कारण कांद्याच्या पातीमध्ये अँटी व्हायरल गुण असतात. तसेच फायबरदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कांद्याची पात उपयुक्त आहे. फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचन खूप जलद होते. गॅस होणे, पचन क्रिया बिघडणे अशा समस्या उद्भभवत नाही.

 

indigestion feature inmarathi

 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अनेकांना वजन कमी करणे म्हणजे महादिव्य वाटतं. वजन कमी करण्यासाठी सलाड खाण्याचा सल्ला दिला जातो. सलाड आरोग्यासाठी खूप उत्तम असते.

 

salad inmarathi

 

तुम्ही सलाडमध्ये कांद्याच्या पातीचा देखील उत्तम उपयोग करू शकता. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा कांद्याची पात अतिशय उपयुक्त आहे. काही लोकांना ब्लड प्रेशरचा देखील खूप त्रास असतो अशा लोकांसाठी देखील कांद्याची पात उपयुक्त ठरते.

केस गळण्याची समस्या करा दूर

अनेकांना केस गळण्याची खूप समस्या असते. केसांसाठी कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्या बरोबरच कांद्याची पात सुद्धा केसांसाठी गुणकारी आहे. कांद्याची पात खाल्ल्यामुळे केस मजबूत होतात.

 

hair spa inmarathi

 

केसांच्या मजबूतीसाठी जी पोषक तत्वे गरेजेची असतात ती तुम्हाला कांद्याच्या पातेतून मिळतात. हिरवी पात व कोवळा कांदा यांचा जर रस काढून जर तुम्ही केसांना लावला तर नक्कीच तुम्हाला केस गळती पासून थोडीशी सुटका मिळू शकेल. त्याबरोबरच तुम्ही त्याचा लेप देखील लावू शकता.

चेहऱ्यांवरील सुरकुत्यांना बोला बाय बाय

आपले कितीही जरी वय झालं, तरी प्रत्येकाला वाटत असतं की आपला चेहरा हा चिरतरुण आणि सुंदर दिसावा. त्यावर सुरकुत्या असू नयेत. काही लोकांना फार कमी वयात चेहऱ्यावर सूरकत्या पडतात. कांद्याच्या पातीच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

हिरव्या पाल्याभाज्यांचा आहारामध्ये सामावेश केल्याने चेहऱ्यावर तेज येतं आणि चेहऱ्याची त्वचा निरोगी राहते. कांद्याच्या पातीमध्ये विटामीन ए आणि के असते त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. तुम्ही नेहमी चिरतरुण राहता.

 

green-leafy-vegetables-inmarathi

 

रक्ताभिसरण क्रिया सुधारते

शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कांद्याची पात अतिशय उपयुक्त आहे. शरीरातील रक्ताभिसरण क्रिया कांद्याच्यापातीमुळे अतिशय जलद होते.

 

blood circulation inmarathi

 

थंडीच्या दिवसामध्ये कांद्याची पात मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असते. कांद्याच्या पातीचा उपयोग आपण वेगवेगळ्या पदार्थमध्ये शकतो. कांद्याची पात ही फक्त सजावटीसाठी नसून तिचे अनेक गुणकारी फायदे आहेत हे आपण समजून घ्यायला हवं.

अशा कांद्याच्या पातीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. सजावटीसाठी किंवा वेगवेगळ्या सूपमध्ये तसेच कांदा, बटाटा वापरुन तुम्ही सुंदर मिक्स भाजी देखील बनवू शकता. याबरोबरच जेव्हा तुम्ही ऑमलेट बनवीता तेव्हा तुम्ही कांद्याची पात त्यावर घालू शकता.

कांद्याची पात, भिजवलेली डाळ यांची मीठ, लाल तिखट घालून तुम्ही चविष्ट भाजी बनवू शकता. गरम गरम परतलेली भाजी आणि त्या सोबत झकासपैकी भाकरी तुम्ही खाऊ शकता. त्याची चव तुम्हाला निराळीच लागेल.

 

kandapaat-dal-bhaji-inmarathi

 

काय मग मंडळी, यापुढे कांदापात आवडीने खाणार ना? तुमच्या लाडक्या मंडळींना, हे आरोग्यदायक फायदे सांगायला विसरू नका. त्यासाठी हा लेख शेअर नक्कीच करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?